आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कोरोनामुळे एकही मृत्यू न झालेला देश…

कोरोना व्हायरस गेल्या ७/८ महिन्यापासून जगभर हाहाकार माजवतोय. अनेक देशांत लाखो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.  एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. जर सद्य स्थितीला कोरोनामुळे एकही मृत्यू न झालेला देश सुद्धा आहे अस सांगितल तर तुम्ही आच्छर्यचकित व्हाल. परंतु हे सत्य आहे.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या मृत्युपैकी एकही मृत्यू न झालेला देश आहे तो म्हणजे “व्हिएतनाम”.
जवळपास साडे नऊ करोड लोकसंख्या असलेला हा देश कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाला आहे. योग्य नियोजन आणि वेळेवर मिळणारे उपचार यामुळेच या देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकसुद्धा मृत्यू झाला नाहीये.

व्हिएतनाम हा चीनचा शेजारी देश आहे. येथे साम्यवादी पार्टीचे सरकार आहे. साम्यवादी पार्टीचे नेता हो ची मिन्ह हे जगातील मोठमोठ्या नेत्यांपैकी एक होते. व्हिएतनाम सिंगापूर तैवान आणि दक्षिण कोरिया सारखा संपन्न देश तर नाहीये परंतु, त्यांनी ज्या प्रकारे कोरोनाचा मुकाबला केला आहे तसा मुकाबला अन्य कोणताही देश  कोरोनाला देऊ शकला नाहीये. जानेवारी २०२० पासून आतापर्यंत या देशात २७० कोरोना केस समोर आल्या आहेत. आणि त्यातील २२० बरे सुद्धा झाले आहेत. ५० जणांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना

महत्वाच म्हणजे व्हिएतनाम पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या युरोपीय देशात हजारो लोक कोरोनामुळे मरत आहेत.आणि लाखो लोकांना कोरोना व्हायरस आपल्या जाळ्यात ओढत आहे. अशा स्थितीत सुद्धा व्हिएतनाम ने संपूर्ण  लॉकडाऊन न करता योग्य नियोजन करून आपल्या लोकांना कोरोनापासून वाचवले आहे.

अशा पद्धतीने थांबवले कोरोना व्हायरसला…

व्हिएतनाममध्ये चीनवरून आलेल्या दोन व्यक्तींना २३ जानेवारीला कोरोनाचे लक्षण सापडले होते. सरकारने त्या अगोदरच लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरवात केली होती. तेव्हापासूनच लोक स्वतःहून मास्क, सामजिक दुरी ( social distancing) ,सॅनीटायझर चा वापर करत होते.

जवळपास याच तारखेला आपल्या देशातील केरळमध्ये कोरोनाचा एक नवा पेशंट सापडला होता. परंतु या गोष्टीला गांभीर्याने न घेता सरकारने साफ दुर्लक्षित केले. जर आपली केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकार जानेवारी मधेच
सतर्क झाले असते तर आज आपण कोरोनाला नक्कीच थांबवू शकलो असतो.

व्हिएतनाम कोरोनवर यामुळे मात करू शकला कारण. विदेशातून येणारा एकजण अथवा त्यांच्या संपर्कात आलेला कोणीही सरकारपासून लपून बसला नाही. कम्युनिष्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन अश्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

कोरोना

व्हिएतनाममध्ये एक पक्ष सरकार असल्यावर सुद्धा चीन सारखे इंटरनेट आणि मिडियावर  सरकारची सक्ती नाहीये. सरकारने गल्लीबोळात आणि घरोघरी पोस्टर लाऊन ,रेडिओ टीव्हीवरती जाहिराती करून लोकांना कोरोनापासून सावधान केले.

अनेक गावात आणि शहरात थोड्या कालावधीसाठी जबरदस्ती लॉकडाऊन जरूर केला परंतु संपूर्ण देश बंद होऊ दिला नाही. वेळेवर केलेल्या उपाययोजना आणि योग्य वेळी घेतलेली काळजी यामुळेच आज व्हिएतनाममध्ये कोरोना केसेस अत्यंत कमी असून एकसुद्धा मृत्यू झालेला नाहीये.हळू हळू व्हिएतनाम आता पूर्ववत होत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… देवदाशी प्रथेचा अंत या महिला डॉक्टरने मोठ्या प्रयत्नाने केला होता.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here