आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जगातील असा देश जिथे घटस्फोटाची तरतूद नाही, पती-पत्नी मृत्यूनंतरच वेगळे होऊ शकतात.

जगातील सर्वच देशांमध्ये घटस्फोटाची परंपरा आहे आणि त्यासाठी वेगवेगळे कायदेही अस्तित्वात आहेत. इतर देशांप्रमाणेच आपल्या देशातही घटस्फोटांच्या संखेमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. व्यावाहिक जीवनात काही समस्या आल्या तर लोकं घटस्फोटाचा पर्याय निवडून आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करतात.

घटस्फोट घेण्यासाठी प्रत्येक देशात त्यासंबंधी कायदा बनवण्यात आला आहे. पण जगात एक असाही देश आहे जिथे घटस्फोटाची तरतूद नाही. तो एकमेव देश आहे फिलिपिन्स.

घटस्फोट

 

फिलिपिन्स हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे घटस्फोट घेतल्या जात नाही. फिलिपिन्स हा कॅथोलिक देशांच्या समूहाचा एक भाग आहे. कॅथोलिक चर्चच्या प्रभावामुळे या देशात घटस्फोटाची तरतूद नाही. २०१५ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी फिलीपिन्सला भेट दिली असता, त्यांनी देशातील धार्मिक नेत्यांना घटस्फोट घेणार्‍या कॅथलिकांविषयी सहानुभूतीशील दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले होते. परंतु फिलिपिन्समध्ये ‘घटस्फोटित कॅथोलिक’ असणे अपमानजनक मानले जाते.

फिलीपिन्सच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी पोप फ्रान्सिस यांनी केलेल्या उपदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खरं तर, त्यांना आता अभिमान आहे की फिलिपिन्स हा जगातील एकमेव देश आहे जेथे घटस्फोट घेता येत नाही. फिलिपिन्समध्ये घटस्फोटाला कायदेशीर करण्याचे विधेयक आधीपासूनच आहे. परंतु राष्ट्रपती बेनिनो एक्विनो यांच्या समर्थनाशिवाय कायदा अस्तित्वात आणणे कठीण आहे.

(हेही वाचा..या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाहीये)

एकेकाळी घटस्फोट हा कायदेशीर होता परंतु कालांतराने हा कायदा संपुष्टात आला.

घटस्फोट

फिलिपिन्सवर सुमारे चार शतके स्पेनची सत्ता होती. यावेळी, तेथील बहुतेक लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. याचवेळी कॅथोलिक ऑर्थोडॉक्स नियमांची पायमुळे समाजात खोलवर पसरली होती.  परंतु सन १८९८ मध्ये जेव्हा स्पेन-अमेरिका युद्ध झाले आणि फिलिपिन्सवर अमेरिकेचे शासन आले, तेव्हा याठिकाणी घटस्फोटासाठी एक कायदा बनवण्यात आला होता.

सन १९१७ च्या कायद्यानुसार लोकांना घटस्फोट घेण्याची परवानगी होती. परंतु त्यासाठी एक अट होती. अट अशी होती की जर एखाद्या जोडीदाराने व्यभिचार केल्याचे आढळले तर घटस्फोट घेता येईल.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फिलिपिन्सनवर जपानने कब्जा करण्यासोबतच त्यांनी घटस्फोटासाठी नवीन कायदा देखील आणला गेला होता. परंतु हा नवीन कायदा फक्त काही वर्षे टिकला आणि जेव्हा १९४४ मध्ये अमेरिकेची सत्ता परत आल्यावर जुना घटस्फोट कायदा लागू झाला. सन १९५० मध्ये फिलिपिन्स अमेरिकेच्या ताब्यातून मुक्त झाला तेव्हा चर्चच्या प्रभावाखाली घटस्फोट कायदा मागे घेण्यात आला. त्यावेळी जी घटस्फोटावर बंदी लावण्यात आली ती आजपर्यंत चालूच आहे.

मुस्लिम घटस्फोट घेऊ शकतात:

घटस्फोट

फिलीपिन्समध्ये घटस्फोट न घेण्याचा प्रतिबंध केवळ ख्रिश्चनांवर बंधनकारक आहे. येथील ६ ते ७ टक्के मुस्लिम लोक त्यांच्या पर्सनल लॉ नुसार घटस्फोट घेऊ शकतात. मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक नियमांनुसार असे करण्याची परवानगी दिलेली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here