आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हि महिला राफेल उडवणारी पहिला महिला पायलट बनतेय.

नव्यानेच भारतीय वायूसेनेत सामील झालेले लढाऊ विमान “राफेल” वायुसेनेसाठी एक मोठे वरदान समजल्या जात आहे. युद्धात अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या  राफेलच्या सामवेशामुळे भारतीय वायूसेनेची ताकत वाढली आहे. अश्यातच आता एक नवीन आनंदाची बातमी उत्तरप्रदेशच्या वाराणशीकरांना आनंदून टाकत आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये असलेल्या युद्धविमानाची पायलट एक महिला बनत आहे. हा सर्व महिलांसाठी एक
आनंदाचा क्षण आहे. पुरुषाप्रमाणेच आता महिलाही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हेच यावरून सिद्ध होत आहे.

महिला राफेल

उत्तर प्रदेशाच्या वाराणशी मध्ये राहणारी शिवांगी सिंह फरेल उडवणारी पहिला महिला पायलट बनत आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या घरच्या आणि उत्तरप्रदेशच्या लोकांमध्ये आनंदाच वातवरण आहे आणि सगळे शिवांगीवर शुभेच्छाच्या वर्षाव करत आहेत.

 

उत्तरप्रदेशच्या वाराणशीत राहणाऱ्या शिवांगी यांच्या आईवडीलानी सांगितले कि, आपल्या सर्वांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे. शिवांगीने अत्यंत कठोर मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिला मिळाले. आम्ही सुद्धा तिला प्रत्येक वेळी योग्य साथ दिली.

महिला लडाउ पायलटच्या दुसऱ्या तुकडीचा हिस्सा असलेली शिवांगी सिंह २०१७ मध्ये भारतीय वायुसेनेत सहभागी झाली होती. वाराणशी जिल्ह्यातील रहिवासी असलेली शिवांगी सध्या ट्रेनिंग घेत आहे. शिवांगीने २०१३-१६ पर्यंत बीएचयुच्या एनसीसीचे प्रशिक्षण घेतले होते.

महिला राफेल

राफेल स्क्वाड्रनची पहिला महिला फायटर पायलटफ्लाईट लेफ्टीनेंट शिवांगी सिंह वाराणशीमध्ये माध्यमिक शिक्षणानंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिकण्यास आली होती.

‘गॉल्डन एरोज’ स्क्वैड्रन मध्ये भाग घेणार शिवांगी.

लवकरच शिवांगी सिंह कन्व्हर्जन ट्रेनिंग पूर्ण करून वायुसेनेच्या अंबाला बेस वर  “गॉल्डन एरोज” स्क्वैड्रनमध्ये ओपचारिक एन्ट्री घेणार आहे.कारण सर्वच पायलटला एका फायटर जेटवरून दुसऱ्या फायटर जेटवर  बदली होण्यासाठी “कन्व्हर्जन ट्रेनिंग” घ्यावी लागते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here