आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात या 5 भाज्यांचा समावेश असायलाच हवा…

कॅन्सर होऊ नये यासाठी आहारात काही भाज्यांचा रोज समावेश करा. शिवाय ज्यांना अगोदरच कॅन्सर झाला आहे अश्या लोकांनी सुद्धा ह्या भाज्या आहारात घ्यायलाच हव्या. या भाज्यांमध्ये कॅन्सरसोबत लढणाऱ्या अँटीऑक्सिडेंट्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जे कॅन्सरच्या संभाव्य धोक्याला कमी करण्यास मदत करतात.

कॅन्सर

चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाज्या?

1) हिरवी बीन्स

या भाज्यांमध्ये सर्वांत पहिली आणि उपयोगी भाजी आहे ती म्हणजे हिरवी बीन्स. हिरव्या बीन्स मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. संशोधक सांगतात की, हिरव्या बीन्सच्या सेवनाने कोलोरेकटल कॅन्सर कमी होतो. हफ्त्यात 3/4 वेळेस हिरव्या बीन्सची भजी नक्कीच खायला हवी. याशिवाय सलाद आणि ईतर डिशमध्ये तुम्ही बीन्सचा वापर सुद्धा करू शकता.

2)ब्रोकली

कॅन्सर

ब्रोकली ही जगातील सर्वांत आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. कॅन्सरपासून वाचण्यासाठी ब्रोकली सर्वांत जास्त चर्चेत असते. ब्रोकलीमध्ये एक खास कंपाउंड मिळतो जो आयसोथायसोनेट या नावाने ओळखल्या जातो. हे तत्व कॅन्सरला वाढण्यापासून रोखण्याचे काम करतो. शिवाय ब्रोकली शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेटला सुद्धा कमी करतो. ब्रोकलीमध्ये “सल्फोराफेन” नावाचे एक केमिकल असते जे टॉक्सिनला शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करते.

3)गाजर

गाजरामध्ये मोठ्या प्रमानात विटॅमिन आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात.गाजर विटॅमिन ए . विटॅमिन केचा मोठ्या प्रमाणत
स्त्रोत असतो. अलीकडेच झालेल्या झालेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे कि गाजरातातील घटक काही खास प्रकारच्या कॅन्सरपासून वाचवण्यास मदत करतात. शिवाय गाजराच्या नियमित सेवनाने पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता २६% पर्यंत कमी होते.कॅन्सर

 ४) लसून

लसूनमध्ये सल्फर असतो जो इम्यून सिस्टमला नियंत्रित करत असतो. जर तुमचा इम्यून सिस्टम चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर, तुम्ही कॅन्सरसोबतच अन्य छोट्या मोठ्या रोगांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. तसेच लसूनमध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट्स आणि सल्फर ट्युमरला वाढण्यापासून थांबवतात.

५) टोमॅटो

कॅन्सर

टोमॅटो हा “लाईकोपीन” चा खूप मोठा स्त्रोत आहे. लाईकोपीन एक विशिष्ट एंटीऑक्सीडेंट असतो जो,अल्फा कैरोटिन ,बीटा कैरोटिनआणि विटामिन ईपेक्षाही जास्त फायदेमंद आहे.आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जरूर सामील करा. याशिवाय कच्चे टोमॅटोचे सलाद सुद्धा खावे. टोमॅटोतील घटक अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव करतो. जसे कि ,पोटाचा कॅन्सर,प्रोस्टेट कॅन्सर आदी.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here