आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या दोन कारणामुळे वस्तूच्या किमती 99, 499, 999 अश्या ठेवल्या जातात…

जर तुम्ही कोणत्याही दुकानांमध्ये, मॉलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला असंच एक रुपया कमी किंमत असलेल्या वस्तू जास्त करून पाहायला मिळतील. याला म्हणतात मानसिक दृष्ट्या ठेवलेली किंमत(सायकॉलॉजिकल किंमत) .आपल्यामध्ये भ्रम तयार करण्यासाठी अशी किंमत ठेवलेली असते. आपला मेंदू याच प्रमाणे काम करत असतो.

वस्तू

समजा मी एक मोबाईल खरेदी केला. त्याची किंमत १५४०० रुपये आहे पण जेव्हा कोणी मला विचारलं की हा मोबाईल किती रुपयाला घेतला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच किंमत येईल ती म्हणजे १५०००.म्हणजे वरचे चारशे रुपये आपला मेंदू जास्त करून लक्षात ठेवत नाही. ज्या किंमत “राउंड फिगर” असतात त्याच आपण जास्त लक्षात करून ठेवतो.

मार्केटमध्ये आपल्या याच गोष्टीचा फायदा घेतला जातो. जर तुम्ही एखादी जीन्स पॅन्ट खरेदी करायला गेला आणि त्याची किंमत एक हजार रुपये अशी सांगितली तर आपल्याला वाटते की किंमत तर चार अंकी झाली, पण माझं बजेट तर ९०० रुपये पर्यंत आहे. मग जेव्हा किंमती ९९९ रुपये सांगितले जाते तेव्हा आपल्याला ती किंमत ९०० रुपयेच्या आसपास वाटते. आपला मेंदू अशाच प्रकारे काम करत असतो. एकंदरीत त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी या सर्व टेक्निक ते वापरतात.

वस्तू

हे झालं याच एक कारण, याचं दुसरं कारण आहे काळा पैसा. यामुळे काही प्रमाणात काळा पैसा जमा होतो. समजा आपण एखादी वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये गेलो. त्याची किंमत आहे ९९९रुपये. आपण त्याला १००० रुपयाची नोट दिली आणि तुम्ही त्याला म्हणाला राहू द्या एक रुपये तुमच्याजवळ ठेवा. काहीवेळा दुकानदारही कारण देतात की पैसे सुट्टे नाहीत तेव्हा आपण हि या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही.

आपण जर एक हजार रुपये वस्तू घेतोय तर आपण एक रुपयाचा जास्त विचार करत नाही.

मार्केटमध्ये जवळपास ६० ते ७० टक्के लोक एक रुपया सोडून देतात. आता विचार करा तुम्ही तर एक रुपया सोडून दिला. तो गेला त्या दुकानदाराकडे परंतु त्याने रेकॉर्डला त्या वस्तूची नोंद केली मात्र ९९९ रुपयाची कारण ती वस्तू त्यात किमतीची होती. तो एक रुपया गेला त्या दुकानदाराच्या खिशामध्ये.

वस्तू

विचार करा त्याच्याकडे दिवसाला किती ग्राहक येत असतील. समजा दिवसाला त्याच्याकडे २०० ग्राहक गेले ,तर त्याला दिवसाला २००रुपये भेटू लागले. असे महिन्याचे एकूण झाले ६००० रुपये . हे सहा हजार रुपये फक्त आणि फक्त त्या एका रुपये मुळे झाले आहेत जे की आपण सहज सोडून दिले होते.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)

आता तुम्हाला थोडफार समजल असेल. आता विचार करा की हे झाले त्या एका दुकानांच फक्त एका महिन्याच. तर भारतामध्ये एकूण किती दुकाने असतील. सगळ्याच वस्तूंची किंमत जवळपास ९९,१९९,२९९,९९९ अशीच असते. आपण जो एक रुपया सोडून देतो त्याची कोणत्याही प्रकारे नोंद होत नाही. तो पैसा जसाच्या तसा दुकानदाराच्या खिशामध्ये जातो.

वस्तू

जर सगळेजण आता एक रुपया सोडू लागले तर विचार करा पूर्ण भारतामध्ये असा किती पैसा आहे काहीही कारण नसताना जमा होत असतो.एवढ्यावर तुम्हाला समजले असेल की इथून पुढे कोणतेही दुकानावरती तुम्ही खरेदी करण्यासाठी गेला तर अशा पद्धतीने एक रुपया सोडायचा नाही.

एकतर तुम्ही सुट्टी पैसे घेऊन जा किंवा त्या दुकानदाराकडून तो एक रुपया परत मागा. पण त्या दुकानदार जवळ तो एक रुपया अजिबात सोडून नका. याच्यातून एक पर्याय असा आहे की जर पैसे सुट्टी नसतील तर आपण डिजिटल पेमेंट करू शकतो. आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा आपण फोन पे, गुगल पे अशा अनेक मार्गाद्वारे आपण पैसे देऊ शकतो. यामुळे आपला एक रुपया जास्त ही जात नाही आणि वस्तूही खरेदी होते.

तर हि होती मार्केटमधील वस्तूंची किंमत ९९, ९९९, ४९९ अश्या अंकात ठेवण्याची महत्वाची करणे. पहिले म्हणजे  सायकॉलॉजिकल किंमत आणि दुसरे ब्लॅक मनी.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here