आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हे दरवाजे उघडले गेले तर जगाचा नाश होईल…


जगातील वेगवेगळे आश्चर्य आपण नेहमीच ऐकत असतो किंवा वाचत असतो. त्यातील काही गोष्टी वरती आपण विश्वास ठेवतो तर काही गोष्टी खोटे आहेत असे मानतो.जगामध्ये खूप काही अश्या गोष्टीने भरलेले आहे. काही गोष्टींचे रहस्य आज पर्यंत उघडलेली नाहीत .आज आपण जाणून घेणार आहोत जगातील अत्यंत भयानक रहस्याने भरलेल्या दर्वाज्यांबद्दल .

जगामध्ये असे खुप सारे दरवाजे आहेत जे खूप वर्षापासून बंद आहेत. या दरवाजांना आजपर्यंत कोणी उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचे अत्यंत त्रासदायक पद्धतीने किंवा दुर्मिळ रोगाने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यानंतर त्या दरवाजांना उघडण्याचा आजपर्यंत कोणीही प्रयत्न केलेला नाही.

ताजमहाल गुपित दरवाजा

 दरवाजे

मुगल राजा शहाजहान यांनी त्यांच्या पत्नी मुमताज साठी ताजमहाल बांधला होता.ताजमहाल हे जगातील आठ आश्चर्यापैकी एक मानले जाते .ताज महाल मध्ये एकूण १०८९ खोल्या आहेत यातील २२ खोल्या आजही बंद आहेत.
असे म्हटले जाते की राजा शाहजहान ने बेगम मुमताज च्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराला ‘ममी’ बनवून त्यांना एका गुप्त खोलीमध्ये ठेवले होते .

त्यांचे हे कार्य इस्लाम धर्मानुसार चुकीचे आहे असे म्हटले जाते. या गोष्टीचा कुणाला ठावठिकाणा लागू नये यासाठी त्यांनी ही खोली कायमस्वरूपी बंद ठेवली. राजाच्या सैन्यांनी अनेक लोकांवर खूप अत्याचार केले. त्यांचा आत्मा आजही खोल्यांमध्ये भटकत असतो असेही म्हणले जाते. त्याच बरोबर बेगम मुमताज यांचा आत्मा त्या गुपित खोलीत आहे असे मानले जाते.

बँट स्प्रिंग हॉटेल रूम नंबर ८७३

 दरवाजे

हे हॉटेल कॅनडामध्ये आहे .या हॉटेलच्या आठव्या मजल्यावर असणाऱ्या रूम नंबर ८७३ ला कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. नेमके असे काय घडले असे काय कारण असू शकते की हॉटेलला या खोलीला कायमचे बंद करणे भाग पडले. यांनी त्या रूमला फक्त बंद केले नाही तर एका मोठ्या भीतीच्या पाठीमागे लपवण्यात आले आहे . काही वर्षापूर्वी या हॉटेलमध्ये एक कुटुंब आपल्या मुलीसोबत सुट्टीच्या दिवसांमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते कुटुंब हॉटेलच्या रूम नंबर ८७३ मध्ये थांबले होते,परंतु त्या रात्री असा अचानक काय घडलं त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि मुलीला मारून टाकलं आणि स्वतःही आत्महत्या केली. त्याने असे करण्यामागचे कारण आजपर्यंत समजू शकलेले नाही.
हॉटेल व्यवस्थापन विभागाने या खोलीला थोडस नवीन बनवून लोकांना राहण्यासाठी द्यायला सुरुवात केली परंतु त्या खोलीत राहणाऱ्या लोकांना खोलीच्या भिंतीवरती रक्ताने लतपत हाताचे ठसे दिसायला सुरुवात झाली. खोलीमध्ये रात्री निराळ्या प्रकारचे आवाज यायला सुरवात झाली. रक्ताने भरलेले हाताचे ठसे खोली घेणाऱ्या लोकांच्या शरीरावरती ही दिसू लागले. या सर्व प्रकारची गंभीरता लक्षात घेऊन ही कोली कायमस्वरूपी बंद करण्यात आले.

पद्मनाभस्वामी मंदिर

 दरवाजे

 

पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील प्रसिद्ध आणि रस्त्याने भरलेल्या काही मंदिरापैकी एक आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये मंदिर आहे. मंदिराला एका ट्रष्ट मार्फत चालवले जात होते. २०११ मध्ये एका भक्ताने सुप्रीम कोर्टामध्ये मंदिराच्या चुकीच्या व्यवस्थापना बद्दल तक्रार केली . त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सात लोकांची टीम बनवून मंदिराची माहिती घेण्यासाठी त्यांना पाठवले.

मंदिरामध्ये ६ गुप्त दरवाजे आहेत असे आढळून आले. एक एक करून सारे दरवाजे उघडण्यात आलेत .तेव्हा तिथे सोन्याची नाणी, देवांच्या सोन्याच्या मुर्त्या, हिरे मौल्यवान मोती, रत्नजडित पोशाख अशा अनेक गोष्टी सापडल्या .या सर्व गोष्टींची किंमत करोड मध्ये होती. येथे भेटलेली भगवान विष्णूची मूर्ती जवळपास बावीस अब्ज रुपये इतकी आहे. पण आतापर्यंत फक्त पाच दरवाजे उघडण्यात आले होते.सहावा दरवाजा बाकी होता कारण या दरवाजावर कोणत्या प्रकारचे कुलूप किंवा कुठेही चावी लावण्यासाठी जागा नव्हती.

तिथल्या लोकांचे असे म्हणणे आहे की या दरवाजाला एका शुद्ध साधू कडून गरुड पुराण मंत्राचा जप करून उघडले जाऊ शकते परंतु असा कोणताही व्यक्ती या पृथ्वीतलावर नाही. हा दरवाजा पूर्णपणे सोन्याचा बनलेला आहे. त्याच्यावरती दोन कोब्रा सापांचे चित्र आहे. या दरवाजाबद्दल माहिती गोळा करणारे लोक अचानक आजारी पडू लागले व त्यांचे वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होऊ लागला.त्यामुळे कोर्टाने सुरू असलेली ही कारवाई बंद केली आणि हा दरवाजा कायमस्वरूपी बंद केला.

हॉल ऑफ रेकॉर्ड

 दरवाजे

इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगात आपल्या विशिष्ट बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन इजिप्तच्या प्रत्येक गोष्टी अनेक रहस्याने भरलेले आहेत. वैज्ञानिक सांगण्यानुसार ईजिप्तच्या पिरॅमिड व अनेक तेथील मूर्तीखाली खूप सारी रहस्य दडलेलीआहेत. याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की या मूर्तीच्या खाली काही गुपित दरवाजे आहेत. मात्र इजिप्त सरकारने हे दरवाजे उघडण्यास सक्त मनाई केली आहे.

महान पिरॅमिड आणि तेथे असलेल्या भल्यामोठ्या मूर्तीं कोणी बनवल्या हे आजही एक रहस्य म्हणून राहिले आहे .आज उपलब्ध असलेली मॉडर्न टेक्नॉलॉजी सद्दाम असे पिरॅमिड बंधू शकत नाही. असे म्हणले जाते की पिरॅमिडच्या दरवाजाच्या पाठीमागे अशी गोष्ट असू शकते की ज्याचा मानवजातीने कधी विचारही केला नसेल .त्यांच्या म्हणण्यानुसार येथे एलियन ,अटलांटिक ,किंवा असे काही प्राणी असतील की जे मनुष्याने कधी पाहिलेले नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here