आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जेलमध्ये लेख लिहून आपले क्रांतिकारी विचार आपल्या साथीदारापर्यंत पोहचवणारा क्रांतिकारक..


इंग्रजांच्या जुलमी राजवटीला तडा लावण्याचे मोठे काम शहीद भगतसिंह यांनी केले होते. आज जाणून घेऊया शहीद भगतसिंग यांच्या अनमोल विचारांबद्दल आणि त्यांच्या शौर्यपूर्ण जीवनाबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टीबद्दल.

 भगतसिंग यांचा स्वतंत्रता क्रांतीपर्यंतचा प्रवास..

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला लायलपूर जिल्ह्यातील “बंगा” येथे झाला होता. प्रत्येक भारतीयांसारखा भगतसिंग  यांचा परिवार सुद्धा इंग्रज राजवटीच्या जुलमांच्या विरोधात मनात राग धरून होता. त्यांचे चुलते अजित सिंग आणि श्वान सिंग  हे अगोदरच इंग्रजांविरुद्ध बंड करू पाहत होते. आपल्या घरातील क्रांतिकारी लोकांचा भगतसिंग यांच्यावर मोठा प्रभाव पडला. या दोघांच्या प्रभावामुळे भगतसिंग यांच्या मनात लहानपानापासूनच इंग्रजांविरुद्ध राग निर्माण झाला होता.

(हे हि वाचा…   टिपू सुलतान कोण होता? नायक कि खलनायक?)

वयाच्या 14व्या वर्षी भगतसिंग यांनी सरकारी शाळेचे पुस्तके आणि गणवेश जाळून टाकला, त्यानंतर भगतसिंग यांचे पोस्टर गावोगावी लागले गेले. 13एप्रिल 1919 ला जालियन वाला बाग हत्याकांडने भगतसिंग यांच्या जीवनावर एक वेगळा छाप उमटवला. भगतसिंग यांनी कॉलेज सोडून महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या चळवळीत भाग घेतला. या आंदोलनात महात्मा गांधी विदेशी वस्तूचा बहिष्कार करत होते.

लवकरच भगतसिंग ह महात्मा गांधी यांच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या अहिंसा आंदोलनाचे सदस्य बनले.परंतु जेव्हा 1921 मध्ये झालेल्या “चौरा -चौरा हत्याकांडात” हिंसेत सामील असलेल्या सत्याग्रहींना गांधीजीने साथ दिली नाही, तेव्हा भगतसिंग  यांचे गांधीजोसोबत मतभेद झाले.  त्यानंतर इंग्रजांच्या विरोधातील आंदोलनात भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात बनलेल्या “गदर दल” मध्ये सामील झाले.

क्रांतिकारी

9 ऑगस्ट1925मध्ये लुटल्या गेलेल्या सरकारी खजिण्याच्या मागे सुद्धा भगतसिंग  यांचा मोठा सहभाग होता. ही घटना इतिहासात “काकोरी कांड” नावाने प्रसिद्ध आहे. ज्यात भगतसिंग यांच्यासह, रामप्रसाद बिश्मील, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे अनेक क्रांतिकारी सहभागी होते.

भगतसिंग यांनी राजगुरू सोबत मिळून 17डिसेंबर1928 ला लाहोरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक राहिलेले अधिकारी जे. पी. सांडर्स यांची हत्या केली होती. ही हत्या करण्यास चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना पूर्ण मदत केली होती. इंग्रजांच्या सरकारला झोपेतून उठवण्यासाठी त्यांनी 8 एप्रिल 1929ला केंद्रीय भवनात बॉम्ब फेकले होते.

 (हेही वाचा.. स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्याबाबतच्या 5 खास माहिती नसलेल्या गोष्टी…)

लाहोर षडयंत्र केसमध्ये पकडल्या गेलेल्या भगतसिंग , राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर बटुकेश्वर दत्त यांनी अजन्म करावासाची शिक्षा देण्यात आली. भगतसिंग यांना 23 मार्च 1931ला राजगुरू आणि सुखदेव यांच्यासोबत फाशी देण्यात आली. तिघांनीही हसत-हसत देशासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले.

लेखक सुद्धा होते भगत सिंह..

क्रांतिकारी

भगतसिंग हे फक्त क्रांतिकारी लढ्यातील क्रांतिकारीच नव्हते तर त्यासोबतच एक चांगले वक्ता, लेखक, आणि वाचक होते. ते हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पंजाबी उर्दू, बांगला भाषेचे मोठे विद्वान होते. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी आयर्लंड, फ्रांस आणि रुईसच्या क्रांतीचा मोठा अभ्यास केला.भगत सिंह यांना भारतात समाजवादाचा पहिला प्रवक्ता मानले जाते.

भगतसिंग यांनी आपल्या जीवनाचे जवळपास 2 वर्ष जेलमध्ये घालवले. त्यावेळी त्यांनी अनेक पुस्तके वाचून काढली. ते जेलमध्ये लेख लिहून आपले क्रांतिकारी विचार आपल्या साथीदारापर्यंत पोहचवत असतं. त्यांच्याद्वारे लिहलेले लेख आणि घरच्यांनी लिहलेली पत्र आजसुद्धा तांच्या विचारांची महानता दर्शवतात.

भगतसिंग हे ‘अकाली’ आणि ‘कीर्ती’ या दोन वृत्तपत्रांचे संपादकपद सुद्धा भूषवले होते. त्यांच्या कार्यांचे अनेक संपादन प्रसिद्ध आहेत. त्यात एक शहीद की जेल नोटबुक, शहीद भगतसिंग :पत्र आणि दस्तावेज, भगतसिंग संपूर्ण दस्तावेज हे प्रमुख आहेत.

देशाच्या क्रांतिकारी इतिहासात अजरामर झालेल्या शहीद भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here