आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्याबाबतच्या 5 खास माहिती नसलेल्या गोष्टी….
भारताची गानकोकीळेचा आज ९० वा वाढदिवस .त्यांनी आजपर्यंत सत्तावीस हजारापेक्षा जास्त गीते ही ३६ प्रांतीय आणि परप्रांतीय भाषेमध्ये गायली आहेत. हे दुसरे-तिसरे कोणी नसून या आहेत महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर.भारतीय संगीत विश्वात त्यांना लता दीदी म्हणून ओळखले जाते.त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.
स्वरसम्राज्ञी भारताची गानकोकिळा अशा अनेक उपमा त्यांना देण्यात आले आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.”डफली वाले”, “प्यार किया तो डरना क्या “, “दिल तो पागल है”,” ये मेरे वतन के लोगो” अशा अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले आहे.
यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत
लतादीदींची गाण्याची आवड त्यांच्या वडिलांना कशी समजली…
लतादीदींचा जन्म मध्यप्रदेशातील इंदोर या शहरात झाला.त्यांचे वडिल दिनानाथ मंगेशकर एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक व नाट्यकलाकार होते . त्यांच्या आईचे नाव माई मंगेशकर असे होते. लतादीदी ह्या त्यांच्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या.
आशा, मीना,उषा आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची भावंडे आहेत. एकदा दिनानाथ मंगेशकर यांचा शिष्य चुकीचा चालीने गात होता तेव्हा लहान असणाऱ्या लतादीदींनी त्याला त्यात सुधारणा करायला सांगून हे असे गायचे सांगितले.तेव्हा त्यांच्या वडिलांना लतादीदी मध्ये गायनाचे कौशल्य दिसून आले. तेव्हापासून घरातच लतादीदींचे गायनाचे शिक्षण सुरू झालं.
कसे झाले संगीत क्षेत्रात पदार्पण?
१९४२ मध्ये लतादीदी अवघ्या तेराव्या वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
“किती हसाल ” या मराठी चित्रपटांमध्ये लतादीदींनी “नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी” हे गाणे गायले परंतु दुर्देवाने हे गाणे या चित्रपटातून वगळण्यात आले.
लतादीदींनी त्यांच्या ज्या गाण्यातून संगीत क्षेत्रामध्ये पदार्पण केले ते होते “नटली चैत्राची नवलाई”. हे गाणे ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात दादा चांदेकर यांनी स्वरबद्ध केले होते. इथूनच त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली.
(हे हि वाचा… टिपू सुलतान कोण होता? नायक कि खलनायक?)
त्यांनी चित्रपटांमध्येही केले काम..
वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. यातूनच त्यांनी मास्तर विनायक यांच्या कंपनीद्वारे काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना चित्रपटांमध्ये काम करना आवडत नसायचे. एकदा तर शूटिंग नंतर घरी आल्यावर त्या मोठ्याने रडायला लागल्या पण त्यांना माहीत होते की घरांमध्ये लहान भावंडे आहेत,त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे काम तर करावेच लागेल.
सन१९४८ मध्ये मास्तर विनायक यांचा मृत्यू झाल्यानंतर संगीतकार ‘गुलाम हैदर’ यांनी लतादीदींना मार्गदर्शन केले. ‘शहीद’ या चित्रपटाचे निर्माते शशिधर मुखर्जी यांची ओळख गुलाम हैदर यांनी लतादीदींची करून दिली. तेव्हा त्यांनी लताचा आवाज ‘अतिशय बारीक’ आहे असं सांगून नकार दिला. त्यावेळी गुलाम हैदर यांना खूप राग आला व ते म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये चित्रपटांमध्ये गाण्यासाठी दिग्दर्शकांना लताजींची पाय धरावे लागतील.सन १९४८ मध्ये हैदरांनी लतादीदींना मजबूर ह्या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा’ हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
त्यांच्यावर विषप्रयोग ही झाला होता…
१९६० च्या दशकांमध्ये लतादीदी एक सुप्रसिद्ध गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या.प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांची गाणी असत .एक दिवस त्यांची तब्येत खूप खराब झाली. त्यांची तब्येत इतकी खराब झाली होते की त्या मरता मरता वाजल्या होत्या .डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्हाला कोणीतरी स्लो पॉयझनिंग( मंद विष) देत आहे. जेव्हा त्या आजारी पडल्या तेव्हा त्यांचा स्वयंपाक बनवणारा स्वयंपाकी पळून गेला.
हे गाणे ऐकून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात आले पाणी…
जेव्हा भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा आपले बरेच जवान शहीद झाले. तेव्हा त्यांनी शहिदांना सलाम करण्यासाठी “ये मेरे वतन के लोगो” हे गाणं गायले. हे गाणे ऐकताना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यामध्ये पाणी आले
पुरस्कार च्या बाबतीत सर्वोच्च स्थानी आहेत त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे.)