आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुकइंस्टाग्राम | युट्यूब

===

जगातील पाच जीवघेणे रस्ते….

हे जग  खूप विस्तीर्ण आहे. असं मानलं जात की स्वप्न पूर्ण होतात परंतु रस्ते कधी संपत नाहित. जगामध्ये खूप सारे रस्ते आहेत. काही काही साधारण आहेत तर काही अनन्यसाधारण आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच काही रस्त्याबद्दल. ज्या ठिकाणी जाणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं अस आहे. या रस्त्यावर मृत्यू सतत तुमचा पाठलाग करत असतो.

मित्रांनो तुम्ही तर हे गाणं ऐकलं असेल, ” सुहाना सफर और ये मौसम हसी, हमे डर है की हम खोना जाये कही”. जगातील काही रस्ते खूप यानक आहेत. त्या रस्त्यावर केलेल्या प्रवासात कधीच यशस्वी होऊ नाही शकत. आपण केलेल्या एका चुकी मुळे आपण आपलं आयुष्य गमवू शकतो.

तर आपण जाणून घेऊया ते कोणते भयानक पाच रस्ते आहेत.

रस्ते

जेम्स डेल्टॉन हायवे अलास्का

अलास्का हा रस्ता अमेरिकेत आहे व का खतरनाक आहे खरं तर शब्दांत सांगता नाही येतं कारण त्याची भयानक कारणे आहेत. ज्याला सगळ्यात चांगली ड्रायव्हिंग करता येते तो ही कधी धाडस नाही करू शकतं नाही. ६५० किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण बर्फाचा आहे.त्यामुळे ह्या रस्त्यावर कायम घसरण असते. हेच कारण आहे की गाडी चालण्या ऐवजी घसरताना बघायला मिळतील. आश्चर्य हे आहे की तुम्ही प्रवास करताना बर्फाचे वादळ सुरु झालेलं बघायला मिळू नये. वादळामुळे दररोज काहीना काही होतच असते.

कधी कधी तर वादळामुळे पुढचा न पाठीमागचा रस्ताच गायब होतो. अश्या अवस्थेत आपल्याला फक्त मदतीचा हात हवा असतो मदत मिळायला आपल्याला कधी कधी तीन ते चार दिवस लागतात. तर तीन ते चार दिवस जिवंत राहायला लागणारे उपयुक्त सामान नसेल तर आपण मुळीच जगणार नाही. चार ही बाजुनी बर्फ असल्यामुळं आपण आंधळं होऊ शकतो त्यामुळे काळ्या रंगाचा चष्मा असणं गरजेचं आहे.

स्कीपर्स कॅनयोन रोड (युझीलँड )

रस्ते

स्कीपर्स कॅनयोन रोड हा जेवढा पहायला सुंदर वाटतो त्यापेक्षा जास्त तो जीवघेणा आहे. पर्वताला फोडून हा रस्ता तयार केला आहे. तो जास्त घातक आहे त्याच्या डाव्या बाजूला असल्यामुळे असलेल्या भयानक खोल दरीमुळ. दरीत पडण्याची भिती कायम असते.

एकदा जर तुम्ही या रस्त्यावर आला की परत माघारी फिरता येत नाही. तुम्हाला फक्त समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.या रस्त्यावरती दरड कोसळणे साधारण आहे. याच कारणामुळे हा रस्ता खूप वेळा बंद करावा लागतो.

पॅसेज दे गोईस.( फ्रांस )

पहिल्या नजरेत तुम्हाला वाटेल की हा रस्ता खूप मस्त आहे. तुम्हाला अस वाटणार सुद्धा नाही की एक धोकादायक रस्ता आहे. तुम्हाला असंही वाटेल की या रस्त्यावरून गाडी चालवणे खूप सोपं आहे. हा रस्ता पाहताच तुम्हाला रामायणातील राम सेतूची आठवण होईल. हा रस्ता पूर्णपणे रामसेतू सारखा समुद्रात आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य इतर रस्त्यापासून वेगळे आहे कारण हा रस्ता दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जातो.

भरती आणि ओहोटीच्या कारणामुळे हा रस्ता पाण्याखाली असतो. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला हीच भीती असते की रस्ता पाण्याखाली जायच्या आधी हा रस्ता पार करून जायला पाहिजे. कारण रस्त्यावर पाणी आल्यानंतर हा रस्ता अतिशय धोकादायक होतो. बर्फा पेक्षा जास्त घसरण या रोडवर तयार होते.

सिक्युअन तिबेट हायवे (चीन )

रस्ते

हा रस्ता अत्यंत जीवघेणा आणि वळणावळणाचा आहे या रस्त्यावरून दरवर्षी प्रवास करणारे जवळपास ७५०० पेक्षा जास्त प्रवासी अपघात, दरड कोसळणे किंवा खराब वातावरणामुळे मरण पावतात. एकदा दरड कोसळली की जवळपास एक आठवडा हा रस्ता बंद करण्यात येतो. या रस्त्यावर खूप अनुभव असणारा वाहन चालक गाडी चालू शकतो.या रस्त्यावर इतके जीवघेणे वळणे आहेत की तुम्हाला समजणार सुद्धा नाही की समोर वळण आहे आणि तुम्ही चुकला तर थेट दरीमध्ये.

तरोको जॉर्ज रोड तैवान

जगातील खतरनाक रस्त्यामध्ये ‘तरोको जॉर्ज रोड ‘ सगळ्यात जास्त धोकादायक मानला जातो. या रस्त्यावरून गाडी चालवताना खूप मस्त वाटतं पण त्याच्या कितीतरी जास्त पटीने हा रस्ता घातक आहे. वेगवेगळ्या डोंगरातून जाणारा हा रस्ता त्याच्या तीव्र वळणामुळे धोकादायक होत जातो.

रस्त्यावर सगळ्यात खतरनाक वळण केव्हा येते जेव्हा रस्ता एका मोठ्या दगडाला पोखरून तयार केलेल्या बोगद्यामध्ये जातो.

त्या दगडाच्या खाली उभ्या असलेल्या माणसांना असे वाटत राहते की आता हा रस्ता कोसळणार आहे. या रस्त्यावर काही वळणे अशी आहेत ती समोरून आलेले वाहन अजिबात दिसत नाही त्यामुळे येथे जास्त अपघात होत असतात आणि हीच गोष्ट या रस्त्याला खतरनाक बनवते.या रस्त्यावर जास्त पावसामुळे कायम दरड कोसळत असते.हा रस्ता जास्त धोकादायक आहे कारण हा रस्ता खूप अरुंद आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:- टिपू सुलतान कोण होता? नायक कि खलनायक? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here