आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

समान नागरी कायदा- मागणी आणि विरोध..

आता आपण पाहू या या कायदयाची मागणी आणि विरोध कोणाकोणाकडून झाला. प्रथन नेहरु रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला या कलमाचा.तो असा कि देशव्यापी समान नागरी कायदा बनवण्याच्या संदर्भात विचारधारेस इतिहास आहे.इस.स.१९२८ मध्ये प्रथम नेहरु रिपोर्टमध्ये हा विषय चर्चेस आला.वास्तविक हा रिपोर्ट पंडित मोतीलाल नेहरु ख्यातनाम कायदेतज्ञयांनी तयार केला.

त्यानंतर १९६५ पासून सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशानी याबाबतीत आपले मत व्यक्त केले या कायदयाच्या प्रश्नास येथून सुरूवात झाली. सुप्रीम कोर्ट आॅफ इंडियाचे माजी सरन्यायाधीश श्री.वाय.व्ही.चंद्रचूड यानी निकाल दिला. नंतर १९८५ मध्ये त्यानी मोहम्मद अहमद शाह बानो केसबाबत निकाल दिला.या निकालात त्यांनी असे मत नोंदवले की”घटनेच्या कलम४४नुसार कायदा बनवणे काळाची गरज बनलेली आहे .

हा कायदा राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेसाठी सहाय्यभूत होईल. त्यानंतर १९८५ मध्ये सूप्रीम कोर्टाचे न्यायाधिश चिन्नप्पा रेड्डी यानी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.”हे एक दूसरे उदाहरण आहे कि ज्यावरुन या कायदयाची त्वरीत मलबजावणी करणे आवश्यक आहे.” हीच गोष्ट अधिक सविस्तर आणि कडक शब्दात सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने मे १९९५ मध्ये आपला असाच निर्णय नमूद केला आणि मागणी केली.

समान नागरी कायदा

आता या कायदयाचा स्विकार करणारे न्यायाधिश कुलदीपसिंग यांचा निवाडा असा होता.

ग्रंथावर आधारित धार्मिक आणि विविध विचारप्रणालीनुसार कायदे संमत करण्यात आले.पण देशातील 80% नागरीक  कायदयाच्या कक्षेत आहेत.(हिंदू आडाॅप्शन & मेंटेनन्स अॅक्ट १९५६ मधील पेज क्र.२)

हे म्हणतात घटनाकारानी घटनेत तरतूद केलेल्या कलम४४ची सरकारकडून केव्हा अंमलबजावणी होणार याबद्दल आश्चर्य वाटते. पारंपारिक हिंदू कायदा हा हिंदूचा व्यक्तीगत कायदा वारसाहक्क अाणि विवाहासंबंधी कायदा बनवण्यात आला आहै.हया कायदा संदर्भात विलंब करणे समर्थनीय नाही.

न्यायाधीश कुलदीपसिंग यांच्या निकालाप्रमाणे या देशातील मोठी लोकसंख्या (८०%हून अधिक)या कायद्याखाली आणण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहितेचे व्यापक स्वरुप आहे.याची शहानिशा करणे जरुरी आहे. असे हे म्हणतात
आता येथे या कायदयाची दुसरी बाजूचे समर्थन यापुढे करतात. आपल्या सभोवताली सर्व स्तरावर राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव आहे.

राष्ट्रीयत्व अस्तित्वात नाही. संसदेच्या अधिवेशनातील गदारोळामुळे कामकाज करणे अशक्य होते.या वादाची संख्या न्यायालयात वाढत आहे. एकाच जातीच्या विविध जमातीमध्ये आपसात इतर जातीतील लोकापेक्षा जास्त मतभेद आहेत,राज्यात प्रादेशिक वाद निर्माण झाले आहेत,वेगळया राज्याच्या मागणीसाठी उग्र आदोलने होत आहेत. लोक एकदुस-याविरुध्द गदारोळ करतात.राष्ट्रीय स्थैर्य धोक्यात आहे.

समान नागरी कायदा

आता अंती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांच्या निर्णयाच्या संदर्भात आम्हाला असे वाटते की समान नागरी कायदा ही खरी समस्या नसून अशा प्रकारच्या कायदयाच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून कोणताही सकारात्मक परिणाम दिसून येत नाहि.म्हणून ज्यात अपयश मिळाले तो मार्ग सोडून दुस-या मार्गाचा अवलंब करावा असे म्हणतात.

येथे प्रश्न उभा राहतो की कौरव-पांडव पण नात्यागोत्यातील होते.त्यांची आचारसंहिता एकच होती. तरी पण युध्द झाले. पहिले महायूध्द जर्मनी,इटली,फ्रान्स,ब्रिटानिया यांच्यात झाले.हे सर्व ख्रिश्चन धर्माचे होते.
आजपर्यंत शीख संप्रदायात पण युध्दे झाली.दोघांची आचारसंहिता एकच होती. वस्तुस्थिती अशी आहे की लोकांमध्ये सामंजस्य आणि ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी अशा कायदा निरुपयोगी ठरतो. श्री बलराज पुरी यांच्याही लेखनातून हा कायदा पूर्णत: रद्दबातल केला आहे.आर.एस.एस.चे भूतपुर्व सरसंघचालक गुरू गोळवलकर यांनीही दिल्लीमधील सर्वेक्षणात प्रयोगांती हा कायदा फेटाळला आहे.

आता यावरुन असे दिसून येते की हिंदू आणि बिगर हिंदूमध्ये राष्ट्रीय ऐक्याच्या भावना निर्माण करण्यासाठी अशा कायदयाची जरुरी काय असे म्हणणारा समूह पण अस्तित्वात आहे.
आता प्रश्न उभा राहतो कि हे एक अशक्य स्वप्न आहे तर नाहक प्रयत्न अशा कायदयासाठी करण्यात राष्ट्राचे हित कसे साधेल. वास्तविक पाहता यातील दोन्ही कलमे परस्परविरोधी आहेत.म्हणून असा कायदा करणे असंभव आहे.
म्हणून अशा कायदयामध्ये शक्ती खर्च करणे निरर्थक ठरेल.आता आपण यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करु. कदाचित हा चिंतनशील मार्ग असेल. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी तो आवश्यक आहे. अध्यात्म आणि समाज यांच्यामधून आपण यावर मार्ग शोधला पाहिजे.

लेखिका- मीना पाटील

===

युवाकट्टा या पोर्टलवरील लेख हे विविध लेखकांचे असतात. लेखातील मत हे लेखकांचे स्वतंत्र मत आहे. कदाचित या मताशी संपादक सहमत असेलही.  आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here