आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
कोरोनापेक्षा कितीतरी पटीने घातक होती ही महामारी..
सध्या जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. संपूर्ण जगभर या व्हायरसने अनेक लोकांचा जीव घेतला आहे. कोरोना जेवढा भयंकर आहे तेवढाच अथवा त्यापेक्षा जास्त भयंकर महामारी याआधी सुद्धा जगाने पाहिली आहे. जाणून घेऊया तशाच एका व्हायरसबद्दल ज्याने अक्षरशा मृत्यूचे थैमान घातले होते.
शंभर वर्षापूर्वी पहिले महायुद्ध मध्ये जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाला होता. जगामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती . युद्धाचे परिणाम अत्यंत मोठ्या स्वरूपात होते. या परिणाम मधून संपूर्ण जग सावरत असतानाच पुन्हा एकदा जगाला एका नव्या संकटाने घेरले होते ,आणि संकट होतं ” स्पॅनिश फ्लू “नावाची रोगराई .

‘स्पॅनिश फ्लू’ नावाने ओळखले जाणारे ही रोगराई पश्चिम भागामध्ये असणाऱ्या छोट्या आणि गर्दीच्या सैनिक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये सुरू झाली. या शिबिरामध्ये आणि त्याचबरोबर फ्रान्सच्या सीमेवरती सैनिकांनी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये साठलेल्या घाणीमुळे हि रोगराई उदयास आली .बघता बघता या महामारी सगळीकडे थैमान घातले.
पहिले महायुद्ध सन १९१८ मध्ये समाप्त झाले परंतु युद्धानंतर घरी परतणाऱ्या सैनिकांसोबत हा रोग जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचला. या रोगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली . तेव्हा असे म्हटले गेले की आज पर्यंत आलेल्या मारामारी मध्ये कधी इतक्या माणसांचा मृत्यू नाही झाला. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मृत्यू या स्पॅनिश फ्लू रोगामुळे झाला. या रोगामध्ये जवळपास 40 मिलियन लोकांचा मृत्यू झाला.
या महामारी जी भीषणता इतकी जबरदस्त होती की शहराच्या शहरे ओसाड पडली. काही आकलनानुसार मृत्यूंची संख्या ७० मिलियन पर्यंत पोचली होती. जगामध्ये याच्यानंतर खूप महामारी आल्या पण या महामारी सारखी घातक आणि व्यापक दुसरी कोणतेच नव्हती.
स्पॅनिश फ्लू हा रोग सुरवातीच्या काळामध्ये जास्त भयानक असेल असे कोणाला वाटले नाही. उन्हाळा ऋतूच्या मध्यापर्यंत हा रोग खूप घातक झाला. रोगाच्या संक्रमित लाटेने शहरे, गावे, देश आणि बेटे खचून गेली. सगळीकडे मोठ्या प्रमाणात रोग पसरू लागला. डॉक्टर्स ,नर्स आणि रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांवरती याचा मोठा दबाव निर्माण झाला.
ही महामारी स्पेनमध्ये सुरू झाली होती म्हणून हिचे नाव ‘स्पॅनिश फ्लू” असे ठेवण्यात आले.
सन १९१८ मध्ये आलेल्या या रोगावर कोणताच इलाज उपलब्ध नव्हता. काही संशोधकांनी असे सांगितले की हा रोग व्हायरस मुळे झालेला नसून तो एका जिवाणूमुळे झाला आहे. त्यावेळी अनेक प्रकारच्या रोगासाठी निदान उपलब्ध होते परंतु या रोगावर उपचार होणं खूप दूरची गोष्ट होती.
Covid-19 मुळे मरणारे लोक हे एक प्रकारच्या निमोनियाचा शिकार झाले आहेत. व्हायरसशी लढण्यास कमजोर झालेल शरीर आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या शरीरावर हा रोग प्रभावी ठरत आहे. फ्लू आणि covid-19 यांच्यामध्ये ही एक समानता आहे. स्पेनिश फ्लूशी तुलना करायची झाली तर covid-19 मुळे मरणाऱ्या मृतांची संख्या खूप कमी आहे.
स्पेनिश फ्लू च्या काळात विमानांचा वापर नुकताच सुरु झाला होता. ही महामारी रेल्वे आणि जहाजांच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्फत पसरली. त्यामुळे रोगाचा प्रसार ही मंदगतीने झाला होता .काही जाग्यावरती पोचण्यासाठी र रोगाला काही महिन्यांचा कालावधी तर काही ठिकाणी हि रोगराई पोहोचलीच नाही.
(हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!)
अलास्काच्या “ब्रिस्टेल बे” प्रांतामध्ये ही रोगराई परसली नाही. तेथील लोकांनी शाळा बंद केल्या. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई केली आणि मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पोहोचायचे मार्ग बंद केले.
सध्या जगावरती महामारी पसरली आहे ती म्हणजे covid-19 .वर्तमान मध्ये कोरोनाला रोखण्यासाठी अशाच प्रकारचे आधुनिक उपाय राबवले जात आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्पॅनिश फ्लू सगळ्यात मोठा जनसंहार होता . गोष्ट फक्त एवढीच नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला परंतु यामध्ये काही लोक जवान आणि तंदुरुस्त असूनही त्यांचा मृत्यू झाला.
साधारणपणे तंदुरुस्त लोकांचे रोगप्रतिकारक शक्ती फ्लू ला प्रतिकार करण्यासाठी सक्षम असते मात्र फ्लूचे हे स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात हमला करत की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. फ्लू मुळे जगातील विकसित देशामध्ये आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. सरकार आणि वैज्ञानिक यांना कळून आले की येणाऱ्या काळामध्ये महामारी मोठ्या प्रमाणात पसरेल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!