आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल ऐवजी पाणी वापरू शकण्याचा दावा या कंपन्यांनी केला होता..


आपल्या डोक्यामध्ये कायम एक प्रश्न येत असतो की कोणतेही वाहन चालवायचे झाले तर पेट्रोल किंवा डिझेल यांचा वापर का करावा लागतो..?  त्यांची अशी काही गरज आहे की त्यांच्याशिवाय वाहन चालू शकत नाही..? आपण पण पेट्रोल आणि डिझेल ऐवजी पाण्याचा वापर वाहन चालवण्यासाठी का करू शकत नाही.?

कोणतेही वाहन चालवायचे झाल्यास ,त्या वाहनास एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची गरज असते. तर मग ही ऊर्जा आपल्याला पाण्यापासून मिळू शकते का .? असे अनेक प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडत असतात.जगामध्ये आज पर्यंत असे कोणतेही वाहन बनवले गेले नाही जे पाण्याचा वापर करून चालवता येईल.

चला तर आज जाणून घेऊया की अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे आपण वाहन चालवण्यासाठी इंधन म्हणून पाण्याचा वापर करू शकत नाही.

पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही पेट्रोलियम पदार्थ आहेत . त्यांना जीवाश्म इंधन असे म्हटले जाते .हायड्रोकार्बनचा वापर करून पेट्रोलियमचे पदार्थ बनवले जातात. हायड्रोकार्बन मध्ये जास्त करून कार्बन आणि हायड्रोजन अणू असतात. त्याचबरोबर पेट्रोलियम इंधन मध्ये असणाऱ्या संयुगांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध असतो.

पाणी
पाणी

फक्त पेट्रोल आणि डिझेल मध्येच नाही तर लाकूड, कोळसा ,कागद असे अनेक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना जाळून आपण त्यांचे ऊर्जा मध्ये रूपांतर करू शकतो.

हजारो वर्षापासून हायड्रोकार्बन चा वापर ऊर्जा बनवण्यासाठी होत आहे .जेव्हापासून माणूस आग तयार करायला शिकला तेव्हापासून हायड्रोकार्बन चा वापर ऊर्जा तयार करण्यासाठी केला जात आहे. पण जर आपण वाहनांच्या बाबतीत विचार केला तर हे थोडं वेगळं आहे. वाहनांना चालण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची गरज असते.

वाहनांना हायड्रोकार्बन पासून तयार केलेली ऊर्जा त्यांना उष्णतेच्या रूपात लागत नाही ही ऊर्जा त्यांना अशा स्वरूपात पाहिजे ज्यावर यंत्रे चालायला हवीत.

आपण गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकतो त्याचे ज्वलन प्रक्रिया एका बंदिस्त आवरणात म्हणजे इंजिन मध्ये होत असते . ही प्रक्रिया इंजिन अशा पद्धतीने करते की जास्तीत जास्त ऊर्जेचा वापर झाला पाहिजे.

पाण्याला पेट्रोल आणि डिझेल सारखे ज्वलन करू शकतो का?

जर पाण्याबद्दल बोलायचं झालं तर पाण्याची कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया होत नसल्यामुळे पाण्याला आपण पेट्रोल आणि डिझेल सारखे जाळू शकत नाही. त्यामुळे त्याचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकत नाही. जरी पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होत असेल तरी त्यासाठी त्याला दुसरे इंधनाची म्हणजेच कोळशाची गरज असते. पाण्याच्या वाफेचा वापर छोट्या प्रकारचे यंत्रसामग्री मध्ये होऊ शकत नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच कंपनीने असा दावा केला होता की आम्ही पाण्यावर चालणारे वाहन तयार केले आहे. परंतु सगळ्या कंपनीचे दावे खोटे ठरले. सन २००२ मध्ये “जेनेसिस वर्ल्ड एनर्जी” त्यांनी असा दावा केला की त्यांनी अशी गाडी तयार केली आहे .त्यासाठी कंपनीच्या लोकांनी त्यांना २५ लाख डॉलर हे दिले होते .परंतु त्यांनी आजपर्यंत अशी कोणती गाडी बाजारात आणली नाही.

त्याचबरोबर सन २००८ मध्ये जपान कंपनी “जेंनपेक्स” ने हवा आणि पाणी यांचा वापर करून गाडी चालवायला आम्ही सक्षम आहोत असा दावा केला पण कंपनीचा हा दावा चौकशीदरम्यान खोटा ठरला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here