आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हि आहेत भारतातील 9 सर्वात श्रीमंत मंदिरे, एकूण संपत्ती पाहून चक्रावून जालं..!


भारत हा कला धर्म संस्कृती रिती रिवाज या सर्वांनी व्याप असा देश आहे. भारत भूमी ही कायमस्वरूपी साधुसंत आणि महापुरुष व त्यांचे विचार या सर्वांनी परिचीत अशी आहे. भारतामध्ये होऊन गेलेल्या राजांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट अशी कर्तबगारी करून दाखवली आहे. भारतातील माणसे धर्मावरती अतुट विश्वास ठेवून असतात या करणामुळे आपण आपल्या आराध्य देवता वरती खूप विश्वास सुद्धा ठेवतो.

आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील  सर्वात श्रीमंत मंदिरे..

 

१. पद्मनाभ स्वामी मंदिर (केरळ)

या मंदिराच्या कथा पुराणाशी जोडल्या गेल्या आहेत .हे मंदिर केरळ च्या तिरुवनंतपुरममध्ये आहे .हे मंदिर भारतातच नव्हे नंतर संपूर्ण जगामध्ये सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या ठिकाणी सापडलेल्या ६ गुपित दरवाजा पैकी पाच दरवाजे उघडण्यात आले तेव्हा जवळपास एक लाख करोड रुपये इतकी संपत्ती सापडली होती. या ठिकाणी सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती ही जवळपास ५०० करोड रुपये इतकी महाग आहे.

२. तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश)

दहाव्या शतकामध्ये बांधले गेलेले श्री वेंकटेश स्वामी तिरुपती बालाजी मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे .भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये या मंदिराची गणना होते. या ठिकाणी बरेच भक्त आपले केसही दान करतात .

मंदिराची एका वर्षाची कमाई एकूण ६५० करोड रुपये इतकी असून एकूण संपत्ती ३७००० करोड रुपये इतकी आहे. तुम्हाला वाचून विश्वास नाही बसणार परंतु याठिकाणी दरवर्षी जवळपास ३००० किलो फक्त सोनेच दान केले जाते.

३. श्री वैष्णो देवी मंदिर (जम्मू)

जमिनीपासून ५२०० फूट उंचीवर तेथील एका प्राचीन गुहे मध्ये असणारे मंदिर वैष्णो देवीला समर्पित आहे. मंदिराला दरवर्षी ५०) करोड रुपयांच्या आसपास दान दिले जाते.

४.साई मंदिर शिर्डी (नाशिक)

साईबाबांचे भक्त संपूर्ण भारत देशात पसरलेले आहेत. सर्व धर्मातील लोक त्यांना मानतात. हे मंदिर त्याच ठिकाणी बांधले आहे ज्याठिकाणी साईबाबांनी आपले जीवन जगले आहे . साईबाबांची मूर्ती ज्या सिंहासनावर ठेवली आहे ते सिंहासन ९४ किलो सोन्याने बनवले गेले आहे. त्याची किंमत जवळपास दहा करोड रुपये पेक्षाही जास्त आहे .याशिवाय असे म्हटले जाते की साईबाबा ट्रस्ट बँक अकाऊंट मध्ये जवळपास १८०० करोड रुपये , ३५० किलो सोने आणि आणि ४५०० किलो चांदी आहे. मंदिराची वर्षाची कमाई ३२० करोड रुपयांच्या जवळपास आहे.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

५. जगन्नाथ मंदिर (पुरी)

जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन विष्णू मंदिरापैकी एक मानले जाते. देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी लाखो भक्त येत असतात .खासकरून या ठिकाणी जेव्हा वर्षातुन एकदा रथयात्रा निघते तेव्हा येणाऱ्या भक्तांचे मोजमाप आपण करू शकत नाही इतकी गर्दी असते.हे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराचे कोरीव दगडी नक्षीकाम सर्वांचे मन वेधून घेते. या ठिकाणी असलेली भगवान जगन्नाथ यांची मूर्ती २०९ किलो सोन्याने सजवली जाते.

मंदिरामध्ये एका वर्षाला जवळपास १५० ते २०० करोड रुपये जमा होतात. असे म्हटले जाते की या ठिकाणी गुपित तळघर आहेत ज्यामध्ये अफाट संपत्ती आहे परंतु त्यांना आजपर्यंत उघडले गेले नाही.

 

६.सुवर्ण मंदिर (अमृतसर)

जगातल्या प्रसिद्ध पर्यटन त्यामध्ये सुवर्णमंदिराला गणले जाते शीख धर्माच्या लोकांसाठी या मंदिराला एक खास महत्त्व आहे या मंदिराचे एका वर्षाची किती कमी आहे याबद्दल अजूनही गुपित बाळगले गेले आहे पण या मंदिराचे शिखर ज्याच्यावर सोन्याचे पाणी फिरवले गेले आहे यावरून या मंदिराची कमाई किती असेल याचा अंदाज लावता येतो एका दिवशी या ठिकाणी जवळपास ५०००० भक्त येतात मंदिरामध्ये दिवसातून तीन वेळा भक्तांना विनामूल्य जेवण दिले जाते.

७.सबरीमाला मंदिर केरळ

सबरीमाला मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात धर्म आहे हे मंदिर तीन हजार फूट उंच असलेल्या पर्वतावर ती वसलेला आहे याठिकाणी भगवान अय्यपन जय भक्त मोठ्या प्रमाणात येतात असे म्हटले जाते की या ठिकाणी बघतोय इतके दान करतात की याठिकाणी आता माणसे नाही तर रोबोट काम करणार आहेत एका वर्षांमध्ये जवळपास १५ किलो सोने आणि दीडशे करोड रुपये इतके दान जमा होते.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

८ सिद्धिविनायक मंदिर मुंबई

या मंदिरा बद्दल तुम्हाला जास्त काही ओळख करून द्यायची गरज नाही मुंबईचे हे सिद्धिविनायक मंदिर सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एका दिवसाला पंचवीस हजार पासून दोन लाखापर्यंत भक्त येत असतात. मंदिरांमध्ये स्थापन केलेली गणपतीची मूर्ती दोनशे वर्षे जुनी आहे. भगवान गणपतीच्या मूर्तीचा मुकुट जवळपास चार किलो सोन्याने बनवला गेला आहे.  देश-विदेशातून याठिकाणी मोठमोठ्या सेलिब्रिटी धरतात त्यामुळे या ठिकाणी कधी सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते मंदिराची वर्षाची समय एकशे पंचवीस ते दीडशे करोड रुपये इतकी आहे

९. सोमनाथ मंदिर गुजरात

गुजरात मध्ये असलेले हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे मंदिर चालुक्य काळातील बांधकाम स्थापत्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या मंदिराच्या बऱ्याच कलाकृती जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तोडली गेली आहेत .इतिहासात असे सांगितले आहे की या मंदिराचे सातवेळा पुनर्निर्माण करण्यात आले आहे. मंदिराचे शिखर जवळपास पंधरा मीटर उंच आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो भक्त येतात. मंदिराची एक वर्षाची कमाई जवळपास तीस ते पस्तीस करोड रुपये इतकी आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here