आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
इतके दिवस सरकारलाही न जमलेलं काम या 250 महिलांनी करुन दाखवलय..
“पाणी आडवा पाणी जिरवा” या प्रयोगामुळे जवळपास बऱ्याच ठिकाणी लोकांना पाणी मिळत आहे. परंतु आजसुद्धा अशे अनेक ठिकाण आहेत जेथे पावसाळ्यात पाडलेल पाणी त्या नागरिकांसाठी उन्हाळा लागताच मिळू शकत नाही. पाणी समस्येने त्रस्त असलेल्या मध्यप्रदेशच्या एका गावातील 250 महिलांनी चक्क टेकडी खोदून पाण्यासाठी कालवा बनवला आहे.आणि आपल्या गावातील पाण्याच्या समस्येवर कायमचा उपाय तयार केल आहे.
आज जाणून घेऊया मध्यप्रदेशच्या या 250 “आत्मनिर्भर” महिलांच्या कामगिरीबद्दल…
मध्यप्रदेशच्या महिलांनी गावाची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेऊन हातात फावडा आणि तिकास घेत एका टेकडीला खोदून आपल्या गावात पाणी आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
मध्यप्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यातील अगरोठा गावात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गावकर्यांना हैराण कडून सोडले होते. गावतील तलाव आणि शेजारून गेलेला कालवा यामध्ये गावाशेजारी असलेली टेकडी येत होती ज्यामुळे पाणी चढावरून गावात आणण्यास अडचण निर्माण होत होती. पावसाळ्यातील ४ महिने संपताच गावातील जलसाठा कमी व्हायला सुरवात होत असे. बुंदेलखंड योजनेतून गावात तलाव तर बांधण्यात आला होता परंतु तलावाला भरण्यासाठी त्यात पाणी येत नव्हते. ज्याचा सर्वांत जास्त त्रास गावातील महिलांना होत होता. शेवटी त्रासाला कंटाळून या महिलांनी सरकारच्या भरोश्यावर न बसता कालव्यापासून तलावापर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेतला.

250 महिलांनी यासठी हातात फावडे आणि तिकास घेऊन श्रमदान सुरु केले. टेकडीला खोदून त्यातून एक नाला तयार करून गावात पाणी आणण्याचे काम त्यांनी सुरु केले.
या महिलांनी तब्बल 18 महिने या कामासाठी श्रमदान केले. ज्यासाठी यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही
मजदूरी सोडून खोदत होत्या टेकडी.
गावातील जास्तीत जास्त महिला या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. ज्यांच्या उदार्निर्वाहांचे साधन हे मुख्यत मजदुरी आहे. परंतु महिलांनी पाणी समस्यासोडवण्यासाठी मजदुरी सोडून टेकडी खोदण्याच्या कामास पसंदी दिली.
ज्या दिवशी या महिला टेकडी खोदण्याचे काम करत असत, त्या दिवशी त्यांना मजदुरी मिळत नसे. तरीसुद्धा त्यांनी हर न मानता काम सुरु ठेवले आणि शेवटी एका दिवशी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. गावाच्या तलावापर्यंत कालव्याचे पाणी खोदलेल्या पहाडीमार्गातून गावात पोहचले.
आणि गावातील तलाव संपूर्णपणे भरला….
तब्बल दीड वर्ष या ठिकाणी अपार मेहनत केल्यानंतर या महिलांनी त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले. जसेजसे खोदलेल्या टेकडी मार्गातून कालव्याचे पाणी गावातील तलावात यायला सुरवात झाली तसेतसे या महिलांचा आणि गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. थोड्यचं दिवसात गावातील पाण्याचा तलाव संपूर्णपणे भरला आणि या 250 महिलांच्या कष्टाला मोठे फळ मिळाले.
ज्या ठिकाणी पुरुष मंडळी पुढाकर घेऊन काम करण्यास उत्सुक नव्हते,त्या ठिकाणी या महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आपल्या दृढनिश्चयाच्या जोरावर या महिलांनी आपले नाव संपूर्ण भारतभर मोठे केले आहे. “पाणीमित्र” या नावाने ह्या सर्व महिला सध्या लोकांसमोर येत आहेत.
एका बाजूला सरकार काहीही मदत न करता त्यांच्या संयमाची परीक्षा घेत होते तर दुसऱ्या बाजूला दृढनिश्चय आणि एकीच्या जोरावर गावातील महिलांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय आपल्या गावातील पाणी प्रश्नकायमचा सोडवला आहे.
नारीशक्तीने जर ठरवले तर त्या कोणत्याही मोठ्या संकटाना तोंड देऊन, त्यातून मार्ग काढू शकतात याचे मोठे उदाहरण या महिलांनी जगासमोर मांडले आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
(हेही वाचा..हि महिला डाकू जिवंत लोकांचे डोळे काढून घेत असे