आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर ह्या गोष्टी नक्की वाचा…!

आपल्याला माहितच आहे की,राग हा माणसाचा एक प्रकारचा सर्वात मोठा शत्रू आहे .रागांमध्ये माणूस काय करेल ,काय बोलेल हे कोणीच सांगू शकत नाही .रागामध्ये आपण अशा काही गोष्टी करून जातो, की याची आपण कल्पनाही करू शकत नाही .आपण कितीही चांगले असलो ,पण जागा मध्ये आपण काही अशा गोष्टी करतो की समोरचे आपल्याला चुकीचं समजायला लागतात.
समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्ही सांगितलेली गोष्ट ऐकत नसेल तुम्ही सांगेल तसे करत नसेल तर तुम्हाला राग येतो का ..? कोणी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून चिडवत असेल तरी पण राग येतो .

तुम्ही रागाला नियंत्रण करू शकता का ? तुम्ही रागामध्ये अशा काही गोष्टी करून जाता , की त्यांचा तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होतो,आणि तुम्हाला वाटते की ही गोष्ट तुम्ही करायला नको होती.

राग

यासाठी आपण आज जाणून घेणार आहोत रागावर नियंत्रण ठेवायचे उपाय…..

१. बोलण्याच्या आधी विचार करा….

जर तुम्ही रागामध्ये असाल तेव्हा समोरच्या व्यक्तीला काहीही बोलण्याआधी एकदा विचार करा. जे तुम्ही बोलणार आहात ते ऐकून समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील .जे तुम्ही बोलणार आहात ते बरोबर आहे का ? आणि जर बरोबर असेल तर बोलताना कधीही मोठ्या आवाजात बोलू नका .तुम्ही कितीही रागामध्ये असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ,की बोलताना नेहमी हळू आवाजात बोला.

२. राग आलेली जागा सोडा.

जर तुम्ही खूप रागांमध्ये असाल आणि तुम्हाला असे वाटत आहे ,की तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण करू शकत नाही. तेव्हा तुम्ही ती जागा सोडा कोणत्यातरी दुसर्‍या जागेला जा .ज्या व्यक्तीवर तुम्ही रागाला गेला आहात. त्या व्यक्तीला थोड्या वेळासाठी एकटं सोडा .ज्या गोष्टीवर राग आला आहे, त्याबद्दल विचार नका करू. त्या क्षणी तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींचा विचार करा.

ज्या व्यक्तीमुळे या गोष्टीमुळे तुम्हाला राग आला त्याबद्दल विचार करू नका. त्याच्या गोष्टी आठवुन तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका. तुम्ही चांगला विचार करा आणि चुकीच्या गोष्टी विसरून जा. जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा राग आला असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत घालवलेल्या चांगल्या आठवणींचा, क्षणांचा विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

३. माफ करा आणि मोठेपणा घ्या.

ज्याच्यामुळे राग आला. त्याला माफ करा आणि पुढे चला. कोणती गोष्ट मनामध्ये जास्त वेळ ठेवून त्याबद्दल विचार केला की ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी हे चांगले असेल की त्या व्यक्तीला माफ करून पुढे चला.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

राग
राग

४.शांत ठिकाणी जाऊन एकटे बसा.

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे खूप वाईट वाटले असेल किंवा त्यामुळे खूप राग येत आहे .तेव्हा शांत ठिकाणी जाऊन बसल्याने  तुमचा राग शांत होईल आणि तुम्हाला थोडं हलकं वाटायला लागेल.

५. वाईट सवयी बंद करा.

जर तुम्हाला कोणत्या वाईट गोष्टींची सवय असतील ,जसे की तंबाखू ,सिगरेट ,दारू ,ड्रग्स अशा गोष्टींचे सेवण करत असाल, तर या गोष्टी लगेच सोडा. या गोष्टीमुळे तुमचा चिडचिडेपणा जास्त वाढत जातो आणि तुमची सहनशक्ती सुद्धा कमी होऊन जाते.

६. काही बोलण्याच्या आधीच एक ते पन्नास पर्यंत अंक मोजा.

रागांमध्ये काही बोलण्याच्या आधी एक ते पन्नास पर्यंत अंक मोजा. आणि या वेळेमध्ये तुम्ही विचार करा की तुम्हाला कशा पद्धतीने व्यक्त व्हायला हवे .या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला.

७. शांत गाणी ऐका.

रागावर नियंत्रण करायचा हा सर्वात सोपा उपाय आहे .जेव्हा आपल्याला राग येतो पंप.तेव्हा आपण खूप चिडचिड आणि अशांत असतो. तुम्ही बरोबर आणि चूक याचा तंतोतंत अंदाज लावू शकत नाही त्यामुळेच कोणताही निर्णय घ्यायच्या आधी तुमचे मन तुम्हाला शांत ठेवावे लागेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here