आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या कारणामुळे “चंगेज खान” जगातील सर्वांत क्रूर शासक मानल्या जायचा.

जेव्हा आपण आपल्या समोर चंगेज खान असे नाव येते तेव्हा आपल्या मनामध्ये एक क्रूर आणि निर्दय शासक अशी प्रतिमा तयार होते.

लाखो करोडो लोकांची हत्या करणारा चंगेज खान हा एक मुस्लिम मुगल साम्राज्याचा सम्राट होता. चंगेज खानाने आपल्या युद्धनितीचा वापर करून इ.स.१२०६ ते इ.स.१२२७ च्या दरम्यान आशिया आणि युरोप खंडातील एका मोठ्या साम्राज्याला जिंकले होते. चंगेज खान चे नाव ऐकताच त्याकडे मोठमोठ्या बलाढ्य सम्राटांना सुद्धा घाम फुटायचा.

आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासातील सर्वात क्रूर आणि घातक सम्राट चंगेज खान बद्दल…….

चंगेज खानाचा जन्म इ.स.११६५ च्या आसपास मंगोलियाच्या खानाबडोस छावणी मध्ये झाला होता. चंगेज खानचे वडील यंगोसी बागातूर हे त्या छावणीचे प्रमुख सरदार होते. चंगेज खान दहा वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला .चंगेज खानाला एकूण सहा भावंडे होती. अनाथ असला तरी चंगेज खान खूप मेहनती होता.

चंगेज खान

चंगेज खान हा छावणीच्या प्रमुख सरदाराचा मुलगा असल्यामुळे युद्धाच्या प्रत्येक लहान गोष्टी तो शिकलेला होता, असे म्हटले जाते की चंगेज खान खूप रागीट होता. लहानपणी मासे पकडायला गेल्यावर त्याचा एक मासा त्याच्या भावाने घेतला तर त्याने त्याचा खून केला . यावरून तुम्ही चंगेज खान किती क्रूर होता याचा अंदाज लावू शकता.

चंगेज खानाच्या धर्माबद्दल बोलायचं झालं तर चंगेज नावासमोर खान असल्यामुळे बहुतेक करून सर्वजण असे म्हणतात कि तो मुसलमान होता .परंतु असे काहीच नाही .चंगेज खान चे खरे नाव तेमुजीन होते .चंगेज खानाने आपल्या कौशल्याचा वापर करून एक चांगला प्रभाव छावणीतील सरदारा वरती पाडला होता.

एक दिवस मंगोलियाच्या सभेमध्ये सर्वांनी त्याला आपला सरदार घोषित केले ,आणि त्याला कागान अशी उपाधी दिली. पुढे जाऊन ही उपाधी खान अशी रूपांतरित झाली कागान चा अर्थ होतो ‘सम्राट किंवा सरदार’ चंगेज खानाने आपल्या पराक्रमाने सर्वांवर आपली दहशत बनवली होती .चंगेज हे नाव त्याला तेव्हा मिळाले जेव्हा त्याने अनेक छावण्या वर प्रभुत्व मिळवले होते ,आणि जगाचा एक मोठा भूभाग त्याने काबीज केला होता .

चंगेज खान

तेमुजिन जेंव्हा कागान किंवा खान बनला तेंव्हा त्याचे वय ५१ वर्ष होते. या वयामध्ये जास्त करून लोक शांती आणि आरामाने जगणे पसंत करतात . परंतु चंगेज खानासाठी तो काळ म्हणजे जगावर राज्य करायचे सुरुवात होती.
इ.स. १२०६ ते इ.स१२२७ दरम्यान चंगेज खानाने एका एक विशाल साम्राज्य उभे केले होते .क्षेत्रफळ तीन लाख तीस करोड किलोमीटर वर्ग इतके होते .पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी २२ टक्के क्षेत्रफळ इतके होते. म्हणजे आज आपण ज्या भारतात राहत आहोत असे १० भारत देश बसतील इतका मोठे साम्राज्य. चीन ,रुस,अफगाणिस्तान, इराक ,इराण ,बल्गेरिया आणि हंग्री इतक्या दूर पर्यंत चंगेज खान चे साम्राज्य पसरले होते .

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

इतके भले मोठे साम्राज्य आजपर्यंत कोणीच जिंकू शकले नाही . चंगेश खानाच्या युद्धनीती बद्दल जाणून घ्यायचा झाला, तर मंगोलिया चे लोक जास्त ताकदवर असत .परंतु यांची ताकद यांच्या उपयोगी आली नसती, जर त्यांनी चंगेश खाना चे सरदार केले नसते .चंगेज खान अत्यंत बारकाईने विचार करून आणि सावधगिरी बाळगून युद्ध करत असे . सैनिकांना त्याने युद्धाचे महत्त्वपूर्ण शिक्षण दिले होते . त्याचबरोबर विद्युत वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना ही शिक्षण दिले जात असे . प्रशिक्षणामध्ये असे नियोजन केले होते, की युध्दामध्ये घोडा ठार झाला तर त्याच्या जागी दुसरा घोडा सैनिकाजवळ जाऊन थांबत असे .कारण युद्धामध्ये जलद गतीचा वापर करण्यासाठी घोड्यांचा मोठा हात असे.

इतिहासामध्ये चंगे खानाला एक म्हणजे त्याने पसरलेल्या विशाल साम्राज्या मुळे आणि दुसरे म्हणजे त्याच्या क्रूर आणि निर्दयी स्वभावामुळे ओळखले जाते .लढाईच्या वेळी तो कोणत्याही साम्राज्यावर हल्ला करत असे . तेव्हा ते साम्राज्य उद्ध्वस्त करत असे , आणि मोठ्या प्रमाणात रक्तपात करत असे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here