आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कमीत कमी घरच्या सामानामध्ये सोप्या पद्धतीने उत्कृष्ट केक बनवा…

केक बनवण्यासाठी चे साहित्य..

सर्वात आधी एक कप मैदा घ्या. एक चमचा कोको पावडर, एक चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा.
एका बाउल मध्ये तीन चमचे बटर, ८० ग्रॅम च्या आसपास कंडेन्स मिल्क. ज्या कपाने मैदा घेतला आहे त्याच कपाने कंडेन्स मिल्क घ्या. थोडंसं कपाला कमी असं प्रमाण ठेवा. आणि अर्धा कप पाणी त्यामध्ये हे मिश्रण छान असं मिक्स करा. जे आपण एक कप मैदा ,कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सगळं मिश्रण चळणीने चाळून घेऊन बाऊलमध्ये घ्या. ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे.

हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्या छान असं मिक्स होते हे बॅटर. कुकर च्या डब्याला बटर लावून घ्या डब्यामध्ये थोडासा मैदा टाकून घ्या जेणेकरून आपला केक चिकटणार नाही. तयार केलेले बॅटर डब्यामध्ये काढून घ्या. गॅस वरती कुकर गरम होण्यासाठी ठेवून द्या . कुकर गरम करताना कुकरची शिट्टी व रबर काढून घ्या. १० मिनिटांसाठी कुकर मध्यम ग्यासवरती गरम करून घ्या. कुकरच्या आत स्टँड ठेवून ,त्यावरती आपला डब्बा ठेवा. कमीत-कमी २०मिनिट ते ३०मिनिटे आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे.

३० मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून केक बघून घ्या. तसेच चाकू च्या साहाय्याने केक तयार झाला आहे का? पहा. जर चाकू ला थोडासा ही केक लागला नसेल तर आपला केक तयार झाला आहे . नंतर केक थंड होण्यासाठी ठेवून द्या .

केक थंड होईपर्यंत जे शुगर सिरप आहे तो करून घ्या.

एक कप पाणी त्यामध्ये २५ ते ३० ग्रॅम साखर घाला तुम्हाला कितपत गोड हवा आहे तेवढी साखर कमी जास्त करू शकता त्याला एक उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्या. चॉकलेट ची चिप्स तयार करून घ्या. त्यासाठी डार्क चॉकलेट घ्या व आपण जे बटाट्याचे चिप्स करण्यासाठी जी स्लाईस वापरतो त्यानेच चॉकलेट च्या स्लाईस करून घ्या .चॉकलेट च्या स्लाईस पटकन पॅक करून फिज मध्ये ठेवून द्या नाहीतर हाताला चिपकायला लागतील .

केक
केक

क्रीम तयार करण्यासाठी सामग्री …

क्रीम तयार करण्यासाठी ट्रोपोलेट डेरी क्रीम घ्या. ह्या क्रीम ला विपिंग क्रीम ही म्हणतात. दोन कप क्रीम म्हणजेच जवळपास २००ग्रॅम घ्या. क्रीम घेताना फ्रिजरमध्ये फ्रिजर करून ठेवा. ज्यावेळेस क्रीम करायची आहे, त्याच्या दोन ते तीन तास तुम्ही फ्रिज मध्ये काढून ठेवायची आहे . जेणेकरून ती पातळ होईल .जेव्हा तुम्ही क्रीम कराल तेव्हा , क्रीम ची कंसिस्टंसी पातळ असायला हवी.

 (हेही वाचा- महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामुळे ‘ह्या’ देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.)

ग्रीपिंग मशीनच्या सहायाने ग्रीप करून घ्या .सुरुवातीला २-३ मिनिटे मध्यम स्पीडवरती फिरवून घ्या. त्यांनतर एकदा थोडीशी घट्ट व्हायला लागली की फास्ट स्पीड वरती क्रीम फेटून घ्या. खूप मस्त अशी क्रीम ग्रीप व्हायला चालू होते . ग्रीप करताना क्रीम ही थंडच असायला हवी . जर क्रीम ही सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली तर आपली क्रीम झाली आहे. थंड झालेला केक हा डब्यातून चाकूच्या साह्याने काढून घ्यायचा आहे. केक टर्न टेबल वर ठेवून द्या.जर टर्न टेबल नसेल तर प्लेट मध्ये काढून घ्या केक चे कट करून घ्या व ते कट समान तीन भागामध्ये करून घ्यायचे आहेत .जर टर्न टेबल नसेल तर तुम्ही प्लेट चा वापर करू शकता ,पातेलं घ्या व प्लेट उलट ठेवून करू शकता.

 

केक चे तीन समान भाग करायचे आहेत. केक वरती हलका हात ठेवून समान भाग करून घ्या .लगेच कट होतात, त्यामुळं पटकन करून घ्या. शुगर सिरप, चॉकलेट चे चिप्स तयार आहेत .क्रीम तयार आहे. केकचे आसिंग कसे कारायचे .
जो सुरुवातीचा केक चा बेस आहे. त्यावर शुगर सिरप लावून घ्या .चमच्याने सगळीकडे शुगर सिरप घालून घ्या व हाताने चेक करा .जर हाताला चिटकत असेल तर शुगर सिरप गेलेला आहे.

केक

त्याच्यानंतर क्रीम लावून घ्यायची आहे. चाकू च्या साह्याने थोडी थोडी क्रीम लावून घ्या. क्रीमची लेव्हल करून घ्या , कारण मस्त शेपमध्ये दिसून येईल याच्यावरती आपण जे चॉकलेटचे चिप्स केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत.तुमच्याकडे जर डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही कोणताही चॉकलेट वापरू शकता.

जो दुसरा लेयर आहे तो ठेवून द्या व त्यावर सेम प्रकारे शुगर सिरप लावून घ्या .शुगर सिरपमुळे जो मार्केटमध्ये केक मिळतो, गोड लागतो .तसाच केक शुगर सिरप मुळे लागतो. पुन्हा त्यावर ती क्रीम लावून घ्या . क्रीम ही तुम्ही तुमच्या चॉईस नाही लावू शकता,कारण कोणाला जास्त क्रीम आवडते व कोणाला जास्त आवडत नाही .त्यामुळे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. नॉर्मली जेवढी केकची बेस साईज आहे .तेवढी तरी क्रीम लावा.व लेवल करून घ्या, व नंतर चॉकलेट चिप्स लावा.

जी आपली लास्ट फिनिशिंग ची साईट असणार आहे ती लावून घ्या. व त्यावरती सेम शुगर सिरप लावून घ्या. क्रीम लावून घेताना, क्रीम वरच्या सगळ्या बाजूने व्यवस्थिततीत लावून घ्या. व नंतर साईट च्या बाजूने लावून घ्या. सुरुवातीला सगळ्या केक ला क्रीम लावून घ्या व नंतर फिनिशिंग करू शकता. क्रीम लावून झाली की,जे फायनल टचप म्हणजेच फिनिशिंग करून घ्या. फिनिशिंग करताना फक्त टर्न टेबल फिरवायचा आहे. फिनिशिंग झाल्यानंतर केक वरती लाइनिंग करण्यासाठी जो आपला काट्याचा चमचा आहे त्याचा वापर करा .

लाइनिंग करण्यासाठी डिझाईन स्क्यापर असतो. पण घरामध्ये काट्याचा चमचा सहज उपलब्ध असतो. त्यामुळे चमच्याने करून घ्या. हे लाइनिंग करणे आवश्यकच आहे असं नाही. चॉकलेट मेअलट करून घ्या व नंतर पॉली बॅग मध्ये भरून घेऊन केकवरती वरच्या साईडला डिजाईन करून घ्या. तुम्ही कशीही डिझाईन करू शकता. तसेच क्रीम ने स्टार करून घ्या व क्रीम वरती चेरी ठेवा कारण अजून सुंदर दिसते. जे शिल्लक राहिलेले चॉकलेट चिप्स आहेत ते खालुन लावून घ्या.
केक तयार…..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here