आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कापूर जाळून त्याचा धूर केल्याने खरंच हवा शुध्द होते का? जाणून घ्या…

 

२००९ साली जगभरात स्वाईन फ्ल्यू नावाच्या साथीच्या रोगाने थैमान घातल्याचे तुम्हाला आठवत असेल. सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीइतकं नाही, पण या स्वाईन फ्ल्यूनेही जगाला प्रभावित केलं होतं. भारतात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण सापडू लागल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याची इत्यंभूत माहिती न घेता लोकांनी अर्धवट ज्ञानावर आधारलेले अनेक घरगुती उपाय अवलंबले होते.

 

new google

कापूर सोबत ठेवणे हा त्यातलाच एक उपाय. आता या कापराने स्वाईन फ्ल्यूला नक्की किती फरक पडला याचं खरंतर संशोधन झालं पाहिजे!

 

कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते हे आपण अनेकदा ऐकतो. कापराच्या धुरात आयुर्वेदिक गुणधर्म असतात वगैरे म्हटलं जातं.

 

कापूर

 

 

पण खरंच असं काही असतो का? कापूर जाळून त्याचा धूर केल्याने हवा शुद्ध होते का? जाणून घेऊ…

कापूर म्हणजे काय?

कापराच्या झाडाच्या लाकडावर आणि सालीवर प्रक्रिया करून कापूर बनवला जातो. हे कापराचे झाड जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशात आढळते. लक्षात घ्या, कापूर हा मूळचा भारतीय पदार्थ नाही! दुसरे म्हणजे कापूर काही मूलद्रव्ये एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करूनही बनवता येतो. यासाठी त्या झाडाच्या लाकडाची किंवा सालीचीही गरज लागत नाही.

C10H160 हे अशा कापराचे रासायनिक सूत्र आहे. कार्बनचे १० अणू आणि हायड्रोजनचे १६० अणू मिळून कापूर बनतो. हा पदार्थ नैसर्गिकरित्या ज्वलनशील आहे.

या व्यक्तिरिक्त कापूर बनवण्याची आणखी एक पद्धत आहे. ही पद्धत भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पाईन आणि टरपेन्टीन रेझिनपासून आपल्याकडे कापूर बनवला जातो.

 

कापूर जाळला की काय होतं?

 

आता असा कापूर जाळून नक्की वातावरणात काय फरक पडतो ते पाहू.. एक खूपच सामान्य गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आग लावतो तेव्हा त्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असेल तर आग पेटत नाही. तसंच जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन शोषून घेतला जातो आणि तेवढ्या परिसरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते.

 

 

ही गोष्ट फक्त कापूरच नव्हे तर कोणतीही वस्तू जाळली तरी सारखीच होत असते. कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी घातक असते हे तुम्हाला माहित असेलच.

 

जेव्हा आपण एखाद्या दरवाजा बंद असलेल्या घरात कापूर जाळतो तेव्हा त्याचा परिणाम आणखी वाईट होऊ शकतो. हवा खेळती नसल्याने धूर कोंडून राहतो आणि त्या वातावरणात श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या धुराच्या संपर्कात फार काळ राहिल्यास फुप्फुसांच्या कर्करोगाचाही धोका संभवतो.

 

गर्भवती महिला या धुराच्या फार काळ संपर्कात राहिल्यास अर्भकाच्या जनुकीय रचनेतही बदल संभवतो.

२०१६ साली तामिळनाडू येथील एका हिंदू धार्मिक संघटनेने कापूर विकण्यावर आणि तो मंदिरात जाळण्यावर कायदेशीर बंदी आणावी अशी मागणीही केली होती. प्रामुख्याने देवलायच्या बंद गाभाऱ्यात कापूर जाळल्याने तिथली हवा अशुद्ध होते असे हा संघटनेचे मत होते.

 

यावरून आपल्या लक्षात येईल की हवा शुद्ध करण्यासाठी आपण कापूर जाळत असलो तरी त्याचा परिणाम पूर्णपणे विरुद्ध होत असतो.

कापराने हवा शुद्ध तर होत नाहीच, पण त्याचा धूर हवेत प्रदूषक म्हणून काम करतो. त्यामुळे हवा शुद्ध करण्यासाठी तुम्ही कापूर जाळत असाल तर ते चूक आहे. असे करू नका आणि तुमच्या आजूबाजूला कुणी करत असेल तर त्यांनाही थांबवा!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here