आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपण पक्षासारखे का उडू शकत नाही?

लहान असताना आपल्या सर्वांना पक्षांसारखे हवेमध्ये उडण्याची इच्छा झाली असेल..? त्याच्याबद्दल जेव्हापण घरातील मोठ्या व्यक्तीना विचारायचं तेव्हा ते आपल्याला समाधानकारक उत्तर देत नसत. आजही जर आपल्याला कोणी विचारलं की आपण पक्षासारखे हवेमध्ये का उडू शकत नाही तर आपण त्यांना काय उत्तर देणार.

आजही हा प्रश्न प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो की लहान पक्षी हवेमध्ये उडू शकतात तर माणूस का उडू शकत नाही . आज आपण हेच जाणून घेणार आहोत की माणूस पक्षासारखा हवेमध्ये का उडू शकत नाही.

१. माणसाला पंख नाहीत

आपण हवे मध्ये का उडू शकत नाही या प्रश्नाचं जास्तकरून उत्तर असं ऐकायला मिळतं की आपल्याला पंख नाहीत ज्यामुळे मनुष्य हवेमध्ये उडू शकत नाही. जर आपण पक्ष्यांसारखे पंख बसवले तर पृथ्वी आपल्याला तिच्याकडे खेचते परंतु पक्षी जेव्हा पंख फडफडतात तेव्हा हवेमध्ये उडायला लागतात .पक्षांचे पंख अशाप्रकारे असतात की ते हवेच्या दाबाला पार करू शकतात. त्यामुळे हवेमध्ये उडण्याची प्रक्रिया यशस्वी होते.

पक्षा

२. तर मग आपण पंख बसवून उडू शकतो का ?

प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की जर माणसाला पंख बसवले तर माणूस हवेमध्ये उडू शकेल का? ह्याच्या उत्तरामध्ये असे सांगता येईल की या प्रश्नाचा संबंध आपल्या वजनाची आहे. पक्ष्यांचे वजन खूप कमी असते त्यामुळे त्यांचे पंख त्यांना हवेमध्ये उडण्यास सक्षम असतात.

(हेही वाचा. याठिकाणी पक्षी आत्महत्या करतात)

तुम्ही पाहिले असेल की पक्षी जेवढा मोठा असेल त्याचे वजन जितके जास्त असेल इतके त्याचे पंख ही मोठे असतात . म्हणजे आपण पाहतो की कबूतराचे पंख आणि मोराचे पंख त्यांच्या वजनानुसार आहेत.

पक्षी जेव्हा हवेमध्ये उडायला लागतात तेव्हा त्यांच्या पंखाच्या वरून आणि खालून दोन्ही कडून हवा वाहत असते. पक्षांचे पंख अशाप्रकारे बनलेले असतात कीं त्यांच्या वरून वाहणाऱ्या हवेची गती ही पंका खालुन वहाणार्‍या हवेच्या दाबा पेक्षा जास्त असते. याचा परिणाम असा होतो की पंखाच्या खालच्या भागापेक्षा वरच्या भागावर दबाव कमी असतो . याच कारणामुळे पक्षी उडताना खाली पडू शकत नाहीत.

3) कोणत्या गोष्टी पक्षाना उडण्यास मदत करतात..?

◆ पक्ष्यांचे वजन खूप कमी असते आणि त्याच बरोबर त्यांचे पंख खूप मऊ असतात.

◆ जाडजुड तोंडापेक्षा पक्षांना टोकदार चोच असते जी त्यांच्या शरीराला खूप हलकं बनवते.

◆ त्याचबरोबर पक्ष्यांची हाडे हि वजनाने खूप कमी असतात.

◆ पक्षांची शरीररचना अशाप्रकारे असते की त्यांच्यामार्फत उडताना जास्त हवा अडवली जाणार नाही.

◆ पक्षी हवेत उडताना त्यांच्या पंखांच फडफडन मोठी क्रिया असते. या क्रियेमध्ये पक्षी हवेला मागे दाबतात आणि समोर झुकांडी घेतात.पंखाच्या फडफडण्यामुळे पक्षी खूप उंचावर जाऊ शकतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.   (हेही वाचा. याठिकाणी पक्षी आत्महत्या करतात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here