आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
वकील काळाच कोट का घालतात? जाणून घ्या कारणे..
तुम्ही कधी विचार केला आहे का की वकील काळात कोट का घालत असतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये कधी ना कधी नक्कीच आला असेल! त्याचबरोबर हाही प्रश्न असतो की वकील काळ्या कोटा ऐवजी दुसऱ्या कोणत्या रंगाचा कोट का घालत नाहीत.
तुम्ही चित्रपटांमध्ये तर पहिलेच असेल की कोर्टामध्ये बोलत असताना सर्वच वकिलांनी काळा कोट घातलेला असतो. ही चित्रपटाची गोष्ट झाली परंतु हकीकत मध्ये सुद्धा सगळे वकील पांढरा शर्ट आणि काळा कोट घालत असतात.
तुम्ही कधी कोर्टामध्ये पहिले असेल किंवा कोर्टाच्या बाहेर जेवढे पण वकील असतात हे सगळे तुम्हाला याच पोशाखमध्ये दिसतील. वकिलामार्फत घातला जाणारा हा काळा कोट हे कोणत्याही प्रकारचे फॅशन नसून त्याच्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे ! चला याच्याबद्दल विचार मध्ये जाणून घेऊया.
वकालत करण्याची सन १३२७ मध्ये तिसरे एडवर्डने केली होती. त्यावेळी पोषाखा वरती आधारित न्यायाधीशांची वेशभूषा तयार केली गेली होती. परंतु सुरुवातीला वकिलांची वेशभूषा काळ्या रंगाची नव्हती. त्यावेळी न्यायाधीश आपल्या डोक्यावर केसांचा टोप घालत असत . सुरुवातीच्या काळी वकील न्यायालयामध्ये सोनेरी लाल आणि मातकट रंगाचा पोषाख घालत असत.

सन १६३७ मध्ये वकिलांच्या पोषक मध्ये बदल करण्यात यावा असा प्रस्ताव करण्यात आला . या प्रस्तावानुसार वकील आणि न्यायाधीश यांना इतर सामान्य जनतेपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काळ रंगामध्ये असणाऱ्या वेशभूषेला परवानगी देण्यात आली.
(हेही वाचा. याठिकाणी पक्षी आत्महत्या करतात)
सन १६९४ मध्ये ब्रिटनची महाराणी ‘ मेरी ‘चा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर राणीचा पती राजा विल्ययम्स त्याने सर्व न्यायाधीशांना आणि आणि वकिलांना सार्वजनिक पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या रंगाचा पायघोळ घालण्याचा आदेश दिला. तेव्हापासून वकिलांनी आणि न्यायाधीशांनी काळा कोट घालण्याची प्रथा चालत आली आहे आणि आजची ही प्रथ सुरू आहे.
आजच्या काळामध्ये काळा कोट की वकिलांची ओळख बनली आहे. सन १९६१ मध्ये कायद्यानुसार न्यायालयामध्ये पांढऱ्या रंगाच्या ‘टाई’ सोबत काळा कोट घालणे हे सर्व वकील आणि न्यायाधीशांना अनिवार्य करण्यात आले . तेव्हापासून भारतामध्ये सर्व वकील काळा कोट घालून केस लढतात. असे म्हणले जाते की हा काळा कोट आणि पांढरा रंगाचा शर्ट सर्व वकीला मध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण होते. हा पोशाख वकिलांना एक वेगळ्या प्रकारची ओळख देऊन जातो.
काय रंगला ताकद आणि अधिकाराचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर काळा रंग आता दृष्टिहीन म्हणजेच आंधळ्याचे हे प्रतीक मानले जाते कारण दृष्टिहीन माणूस कधी कोणत्याच प्रकारचा पक्षपात करत नाही.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved. (हेही वाचा. याठिकाणी पक्षी आत्महत्या करतात)