आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जाणुन घेऊया पक्षांचा राजा गरुड  बद्दल..

गरुड हा शिकारी पक्षी आहे. गरुड पक्षी हा आपल्या तीक्ष्ण नजरेने शिकार करतो. गरुड पक्षाला पक्षांचा राजा बोलतात. गरुडाच्या एकूण पंधरा जाती आहेत .उदा. काळा गरुड, नेपाळी गरुड, पहाडी गरुड, समुद्री गरुड टकला गरुड इत्यादी.

गरुड पक्षी हा पक्षांची ,प्राण्यांची शिकार करतो. उदाहरणार्थ साप, मासे ,प्राणी ,छोटे पक्षी छोटे-मोठे सस्तन प्राणी इत्यादी.
गरुडाचा आकार १०० सेंटीमीटर असतो .गरुडाचे वजन दहा किलो असते. गरुड पक्षी हा उंच झाडांवर किंवा उंच टेकड्यांवर राहतो.

◆ गरुडाची प्रकृती कशी आहे .तसेच आज गरुड स्वतःच्या आयुष्य कसे लढत आहे का त्यांचे आयुष्य संपुष्टात आले आहे?

गरुड या पक्षाला विष्णूचे वाहन असे म्हणतात. गरुड पक्षाला पवित्र मानले जाते .तसेच बौद्ध धर्माच्या ग्रंथात गरुड पक्षाचे उच्च स्थान आहे .जैन धर्मात ही गरुड पक्षाला खूप महत्त्वाचे मानले जाते .एवढंच नाही तर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या देशात गरुड हे राष्ट्रीय चिन्ह आहे. इंडोनेशियामध्ये एअरलाइन चे नाव सुद्धा गरुडालाईन आहे .तसेच मंगोलिया ,थायलँड, दक्षिण-पूर्व, ईसाई देश ,युरोपीय देश तसेच अनेक अनेक देश सैनिकांचे जे फॉर्मेशन चे चिन्ह असते ते गरुडाचे आहे. अनेक सैनिकांच्या तुकड्याचे नाव सुद्धा गरुड संबोधित आहे .

गरुड
गरुड

आज जगामध्ये  फक्त बाराशे गरुड राहिले आहेत. ज्यातील भारतामध्ये पाचशे गरुड आहेत. भारतातील जे पाचशे गरुड आहेत, त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे. याची काळजी लागून राहिली आहे  जगातील १२८ देश बघत आहेत की कुठून गरुड उडून येतो आहे का? कारण तेथे गरुडाचे अस्तित्व संपले आहे. खूप कमी देशात गरुडांचे अस्तित्व राहिले आहे.

गरुडाची प्रकृती कशी आहे. तसेच आज गरुड स्वतःच्या आयुष्य कसे लढत आहे व का त्यांचे आयुष्य संपुष्टात आले आहे ?
गरुडांचे अस्तित्व का संपुष्टात येत आहे ? याची बरेच कारणे आहेत .आपल्या फोनचे टॉवर, विमान, हेलिकॉप्टर ,पतंग उडवणे किंवा रासायनिक वस्तूमुळे गरूडाचे जीवन धोक्यात येत आहे. यामुळे गरुड हा स्वतःच्या जीवनाची लढत आहे. गरूडाचे संरक्षण प्रत्येक देश करीत आहे .गरुडांची शिकार करणे बंद आहे .

 

आधी इतिहासामध्ये गरुडाचे धार्मिक स्थान होते. गरुड हा विष्णूचे वाहन होते. देवांमध्ये गरुडा ची पूजा केली जायची .अठरा पुराणांमध्ये एक गरुड पुराण आहे. तसेच गरुडा वर प्रार्थना सुद्धा आहेत. कारण देवांना खूष करण्यासाठी या प्रार्थना म्हणल्या जातात. पण ह्या प्रार्थना सुद्धा गरुडाना वाचवू शकत नाहीत.

◆ गरुडाचे रहस्यमय जीवन

गरुड हा सत्तर वर्ष जगतो. त्यातील चाळीस वर्षापासून तो वृद्ध व्हायला सुरवात होते.त्याचे विशाल पंख पंख पाय आणि चोर कमजोर व्हायला लागते त्यामुळे त्याला शिकार करता येत नाही . त्याच्याकडे एकतर संघर्षमय जीवन जगण्याचा किंवा मरणाला सामोरे जाणे असे दोन पर्याय असतात.त्यातील तो संघर्षमय जीवन जगण्याचा पर्याय निवडतो.

गरुड
गरुड

गरुडाचे संघर्षमय जीवन खूप वेदनादायक असते. त्याची भाल्यासारखी टोगदार चोच जी एका मिनिटात ठार करू शकते .वाढत्या वयामुळे चोच वाकत जाते .त्यामुळे तो शिकार ही करू शकत नाही .

वाढत्या वयोमानामुळे त्याच्या मजबूत पंखांना त्याला उंच उडवू शकणाऱ्या पंखांची ही क्षमता कमी होते. त्यामुळे तो शिकारीसाठी उंच उडू शकत नाही. गरुडा समोर या कठीण प्रसंगी फक्त दोनच पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे साक्षात मृत्यू पत्करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे अतिशय कष्टदायक १५० दिवसांना सामोरे जावे लागते . ह्या कठीण प्रसंगात गरुडाला एकांतात जावे लागते .एका उंच पहाडावर जाऊन किंवा टेकड्यांवर जाऊन स्वतःचीच चोच जोराने आपटून आपटून फोडावी लागते .

या व्यथादायक घटनेनंतर त्याला नवीन चोच येईपर्यंत वाट बघावी लागते. त्याच बरोबर आपली वाढलेली नखे घासून घासून काढून टाकतो. एवढाच त्रास नव्हे तर आपल्या नवीन नखाने पंख ओरबाडून काढून टाकतो. नंतर हळूहळू नवीन चोच यायला लागते . पूर्वीच्या पंखाची शिकार करून आपल्याला काहीही उपयोग होत नाही तर गरुड स्वतःचे पंख स्वतः काढून टाकतो तेव्हा त्याचा उपयोग होतो.

जेव्हा गरुडाचे नवीन पंख यायला लागतात तेव्हा तो 33 वर्ष नव्या उमदी ने अजून जगतो. उंच उंच उडायला लागतो. त्याच्या आयुष्यची नव्याने सुरुवात व्हायला लागते. शिकार करायला लागतो आणि जेवढे दिवस जगतो तेवढे दिवस तो स्वाभिमानाने जगतो. हे आपल्याला गरुडाकडून शिकायला मिळते त्यामुळेच भगवान विष्णूने आपले वाहन म्हणून गरुडाला निवडले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.   (हेही वाचा. याठिकाणी पक्षी आत्महत्या करतात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here