आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 नवरात्री उत्सवादरम्यान चुकूनही करू नका ह्या चुका..

नवरात्रीच्या 9 दिवसात देवींची मनोभावाने आराधना केली जाते. या दिवसात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्तजण पूजापाठ व वृत करतात. धार्मिक मान्यतेनुसार या 9 दिवसात देवीच्या,, रूपाची भक्तिभावाने पूजा- अर्चना केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि माता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

नवरात्रीदरम्यान 9 दिवस वृत आणि नवस करण्यास काही धार्मिक मान्यतासुद्धा आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमाच्या विरुद्ध वागल्यास देवी माता रुष्ट होऊ शकते. शाश्त्रात सांगितलेल्या खालील नियमांचे पालन करून पूजा -अर्चना केल्यास देवीची कृपा होऊन घरात सुख, समृद्धी नांदते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

नवरात्री

तसेच काही काम सुद्धा या दिवसात केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होत नाहीत.

नवरात्रीत चुकूनही करू नका ही कामे.

1) मुलींचे मन दुखवणे.

भारतीय परंपरेमध्ये मुलींना मा दुर्गाचे स्वरूप मानल्या जाते. हेच कारण आहे की नवरात्रीत कन्यापूजन करून अनेक लोक मा दुर्गाची पूजा करतात आणि माता सुद्धा त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करते.
असं ही म्हटलं जाते की नवरात्र उत्सवादरम्यन कोणत्याही मुलीसोबत अथवा महिलेसोबत गैरवर्तन करू नये, अथवा तसे भाव सुद्धा मनात येऊ देऊ नये. शास्त्रात हे सांगितले आहे कि नवरात्र दरम्यान कोणत्याही मुलीचा अपमान झाल्यास
माता दुर्गा नाराज होउ शकते आणि तुम्हाला त्या अनुचित कार्याचा दंड मिळू शकतो.

 

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

२) घर एकटे सोडू नका..

नवरात्रोत्सव मध्ये प्रत्येकाच्या घरी ९ दिवस माता दुर्गाचा शुभ कळस स्थापन केलेला असतो. काही भक्त नवस करून तेथे ९ दिवस दिवा तेवत ठेवतात. अश्या वेळी घर एकटे सोडून अथवा दर बंद करून बाहेर जाण्यास टाळावे. घरात कोणी नसल्यामुळे आदिशक्तीचे वास्तव्य आपल्या घरात जास्त काळ टिकून राहत नाही. तसेच ९ दिवस दिवसा झोपणे सुद्धा टाळावे.

३) मतभेदांपासून दूर रहा

नवरात्रीच्या दिवसांत जास्तीत जास्त लोक वृत करत असतात. अश्यावेळी आपसात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शक्य तोपर्यंत मतभेत होण्यासारखी  परीस्थीती बनण्यास टाळावे.कारण मतभेद झाल्यास वृत करणाऱ्या व्यक्तीच मन दुखावले जाते ज्यामुळे दुर्गा माता रुष्ट होते.

त्यामुळे या काळात जास्तीत जास्त मतभेदापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्यामुळे कोणाचे मन दुखवले जाणार नाही याचीही काळजी घ्यावी.प्रभू श्रीराम यांच्या चरित्रात सुद्धा येका ठिकाणी म्हटले आहे कि, “जहां सुमती तहां संपत्ती नाना,जहां कुमती तहां विपती निदाना” अर्थात भांडण करणाऱ्या घरामध्ये माता लक्ष्मी थांबत नाही.

नवरात्री

४) धार्मिक गोष्टीत मन लावा.

नवरात्रीमध्ये आपण इतर कोणत्या गोष्टीवर जास्त विचार न करता धार्मिक गोष्टीत मन लावले पाहिजेत. व्रत करणाऱ्या लोकांनी तर मा दुर्गा चालीसा, सप्तपदीचे वाचन केले पाहिजे.

५) लसून आणि कांद्याचा आहारात समावेश टाळा.

नवरात्रीच्या पावन उत्सवात जास्तीत जास्त सात्विक भोजनास प्राधान्य द्या. आहार, विचार आणि व्यवहार हे सर्व या दिवसांत सात्विक असणे गरजेचे आहे. अशा वेळी आपल्याला नवरात्रीच्या केलेल्या वृताचे योग्य फळ मिळते. या दिवसांत कांदा, लसून , दारूचे सेवन आणि मांसाहार टाळावा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here