आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
सोशल मिडियाचा योग्य वापर करून अनेक जणांनी आपली प्रगती साधून घेतली तर दुसरीकडे अनेकांना याचे वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागले आहेत. सोशल मीडियातील शक्तीचा आपण आजपर्यंत अनेक वेळा प्रभाव पहिला. असंच सोशल मिडीयाच्या ताकतीमुळे एका वयस्कर जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
सोशल मिडीयावर दिल्लीतील एका वयस्कर जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्या व्हिडीओमध्ये वयस्कर जोडप्याने सांगतले होते कि ते मालवीय नगर मध्ये धाबा चालवतात. परंतु ग्राहक जास्त नसल्यामुळे त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्या धाब्यावर अक्षरशा लोकांची गर्दी होत आहे.

अनेक लोकांनी या वयस्कर जोडप्यांचा धाबा “बाबा का धाबा” याठिकाणी लोकांनि येण्यासाठी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.दिल्लीतील त्यांच्या धाब्यावर मोठ्या संख्येने लोक धाब्यावर येत आहेत. ज्यामुळे वयस्कर जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झाल्या नंतर आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती हे सुद्धा बाबा का धाबा येथे पोहचले आणि त्यांनी त्या वयस्कर जोडप्याची विचारपूस केली.
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे कि ,जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर “बाबा का धाबा ” वर नक्की जा आणि त्याचे मनोधेर्य वाढवा.
अभिनेत्री रविना टंडनने सुद्धा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे कि, जर तुम्ही बाबा का धाबा वर गेले तर तुमचा तेथील फोटोमाझ्यासोबत नक्की शेअर करा. मी एका संदेशासोबत तुमची फोटो पोस्ट करेल.
#बाबाकाढाबा #dilliwalon #dil #dikhao. Whoever eats here, sends me pic, I shall put up a sweet message with your pics ! ♥️ #supportlocalbusiness #localvendors https://t.co/5DH73wz3SD
— Raveena Tandon (@TandonRaveena) October 8, 2020
कोण आहेत बाबा का धाबा चालवणारे वयस्कर जोडपे?
“बाबा का धाबा” चालवणाऱ्या वयस्कर व्यक्तीचे नाव आहे कांताप्रसाद आणि त्यांच्या पत्नीचे नाव आहे बादामीदेवी. कांताप्रसद यांनी सांगितले कि त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे परंतु तिन्हीपैकी कोनीही त्यांची मदत करत नाही. ते सर्व काम स्वतः करतात आणि धाबा सुद्धा चालवतात.
कांताप्रसद आणि त्यांच्या पत्नी मिळून धाब्याचे सर्व काम करतात. लॉकडाऊन पूर्वी सर्व काही व्यवस्थित चालू होते परंतु लॉकडाऊन मुळे त्यांच्या कमाईचा मेन स्त्रोत बंद पडला होता. अश्यात त्यांनी आपल्या वेदना
एका व्हिडीओच्या माधमातून सोशल मिडियावर मांडल्या ज्याला लोकांनी मोठ्या प्रमाणत शेअर केला.
इतक्या दिवस शुकशुकाट असणाऱ्या बाबा का धाबा वर आज मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. जे पाहून या
वयस्कर जोडप्यांच्या डोळ्यातून आनंदआश्रू वाहत होते. सोशल मिडीयाच्या ताकतीमुळे या वृद्ध जोडप्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा हसू फुलले आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!