आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

धीरू भाई अंबानी यांचे भाऊ सध्या करतात हे काम. वाचा सविस्तर..


धीरू भाई अं बानी म्हणजे नाव, पैसा, प्रसिद्धी हे ठरलेलं समीकरण आहे. बिजनेसमधील बादशाह म्हणून सुद्धा त्यांना ओळखतात. पण धीरूभाई अंबानी याना किती भाऊ आहेत आणि ते काय करतात हे फारच कमी लोकांना माहित आहे. आशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला धीरू भाई अंबानी यांच्या भावांचीच ओळख करुन देणार आहोत तर चला जाणून घेऊया.

अंबानी

धीरूभाई अंबानी यांच्या वडिलांचे नाव हिराचंद गोरधनभाई अंबानी होते. ते व्यवसायाने शिक्षक होते आणि धीरूभाई अंबानी यांच्या आईचे नाव जमनाबेन होतेतर त्या गृहिणी होत्या. धीरूभाई अंबानी यांना चार भावंडं होती. रमणिकभाऊ आणि नथुभाई अशी त्यांच्या भावांची नावे आहेत, तर त्यांच्या बहिणींची नावे त्रिलोचनाबेन आणि जसुमिताबेन होती.

रमणिकभाई आणि कुटुंबीय:-

रमणिकभाई, जे धीरुभाई अंबानी यांचे थोरले बंधू होते, त्यांचे पद्माबेनशी लग्न झाले होते. विमल अंबानी हा रमणिकभाई अं बानी यांचा मुलगा आहे, ज्यांचे नाव घेऊन अहमदाबादजवळील नरोदा येथे १९७० मध्ये विमल ब्रँड सुरू झाला होता. विमल अंबानी यांचे वडील रमणिकभाई हे त्यांच्या स्थापनेत महत्त्वाचे घटक होते.

२०१४ पर्यंत विमल हा रिलायन्स इंडस्ट्रीचा सुद्धा सदस्य होता.

वयाच्या ९० व्या वर्षानंतर रमणिकभाईं रिलायन्स इंडस्ट्रीमधून बाहेर पडले तेव्हा मुकेश अं बानी यांची पत्नी नीता अंबानी यांना रिलायन्समध्ये समाविष्ट केले गेले आणि २८ ऑगस्ट रोजी रमणिकभाई जगाला निरोप देऊन देवाघरी गेले. रमणिकभाई आणि पद्माबेन यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलींचे नाव निता, मीना आणि इला आहे तर त्यांच्या मुलाचे नाव विमल अं बानी आहे. २००१ मध्ये रमणिकभाईंची पत्नी पद्माबेन यांचे निधन झाले.

अंबानी

आज करोडो रुपये मिळवत आहेत विमल अं बानी:-

टॉवर ओव्हरसीज लिमिटेडची जबाबदारी आज विमल अं बानी सांभाळत आहेत. रिअल इस्टेट गुंतवणूकीसह ही कंपनी स्टार्टअप गुंतवणूक आणि स्टॉक दलाली क्षेत्रात काम करत आहे. विमल अं बानी यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वस्त्रोद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी होते. टाटा ओव्हरसीजशिवाय विमल अं बानी यांचे अनेक कंपन्यांशी संबंध आहेत.

वस्त्रोद्योग आणि चामड्याच्या वस्तूंचा सौदा करणाऱ्या सिंटॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ते कार्यकारी संचालक म्हणून सुद्धा काम पाहतात. विमल अं बानीचे लग्न सोनल अंबानीशी झाले आहे, त्यांच्याबरोबर त्यांना अमर अंबानी नावाचा एक मुलगा आणि अंजली अंबानी नावाची एक मुलगी आहे. दोघेही सध्या शिक्षण घेत आहेत.

विमल अं बानीच्या बहिणीचे नाव इला अं बानी असून तिचे लग्न राजकारणी सौरभ पटेल यांच्याशी झाले आहे. सौरभ पटेल हे गुजरात सरकारचे कॅबिनेट मंत्री आहेत.

 

नथुभाई अं बानी आणि त्यांचे कुटुंबीय:-

नथूभाई अं बानी हे धीरूभाई अंबानी यांचे धाकटे बंधू आहेत. त्याचे स्मिताबेन याच्याशी लग्न झाले होते. नथुभाई अं बानी यांचे पुत्र विपुल नाथूभाई अं बानी आहेत. २००९ मध्ये त्यांनी प्रीती अं बानीशी लग्न केले आहे. विपुल आणि प्रीती अनेक कंपन्यांमध्ये सहसचिव म्हणून आज काम करत आहेत.

तसे, विपुल देखील एक केमिकल इंजीनियर आहे. विपुल यांनी मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. विपुलने आपल्या करिअरची सुरुवात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी प्रोजेक्ट आणि इंडस्ट्रियल इंजीनियरिंग ग्रुपमधून केली होती. व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांनी या कंपनीत आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. टॉवर कॅपिटल अँड सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने विपुल याची स्वत:ची कंपनी सुद्धा आहे.

अंबानी

 

असे म्हटले जाते की सध्या विपुल अं बानी हे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. प्रीती अं बानी याच कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ब्रोकरेजची सुविधा पुरवते. तसेच आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारची कर्जे देखील उपलब्ध करून देते.

विपुल अं बानी यांनी २०१४ मध्ये नीरव मोदी यांच्याबरोबर काम सुरू केले. हेच कारण आहे की नीरव मोदी यांच्या फसवणूकीच्या कनेक्शनच्या चौकशीत सीबीआय विपुल अं बानीशी सं-बंधित गोष्टी देखील तपासत आहे. विपुल अं बानी आणि प्रीती अं बानी यांची मुलं कोण आहेत आणि ते काय करतात याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

तसे, धीरूभाई अं बानी यांनी व्यवसाय जगातात एक स्थान मिळविले जे त्यांचे भाऊ साध्य करण्यात अपयशी ठरले. हेच कारण आहे की प्रत्येकाला त्याच्या भावांची नावे माहित नाहीत परंतु धीरूभाई अं बानी यांचे नाव आज जवळजवळ प्रत्येकजण ओळखत आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here