आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गरिबी दूर करण्यासाठी करा हे उपाय…लक्ष्मीदेवी होईल तुमच्यावर प्रसन्न!

 

पैसा एक अशी गोष्ट आहे ज्याशिवाय जिवन जगणे कठीण होते. पैसे मिळवण्यासाठी लोक दिवसाची रात्र करतात. पण तरीही त्यांना पैसे मिळत नाहीत आणि दारिद्र्यात त्यांचे जीवन जगायला भाग पाडले जाते. बर्‍याच लोकांना पैसे मिळतात, परंतु त्यांच्यासाठी ते पुरेसे पैसे नसतात आणि त्याची वाटचाल गरिबीकडे चालू होते.

आपल्याकडे पैशांची कमतरता असल्यास आपण आम्ही खाली नमूद केलेले उपाय केले पाहिजेत. या उपायांनी आपले पैशांचे नुकसान थांबेल आणि आई लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर सदैव असतील.

आम्ही नमूद केलेले उपाय फारच कमी लोकांना माहिती आहेत. म्हणून आज आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

new google

उपाय

शनि ग्रहाला नेहमी शांत ठेवा:-

प्रत्येकजण शनी ग्रहाला घाबरत असतो. शनीचा प्रकोप आपल्यावर पडला तर आयुष्यात फक्त त्रास उरतो आणि पैशाची हानी सुरू होते. म्हणूनच, जर आपल्या कुंडलीमध्ये हा ग्रह भारी असेल तर तुम्ही घाबरू नका. फक्त हा उपाय करा. या उपाययोजना केल्यास हा ग्रह शांत होईल आणि तुमचे पैशाचे नुकसान थांबेल.

शनिवारी आपण शनिदेवाच्या मंदिरात जा आणि शनिदेवाची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास या दिव्यामध्ये मोहरी घाला. हा उपाय किमान 11 शनिवार करा. हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी नाहीशा होतील. शनि आणि राहू केतूला शांत करण्यासाठी तुम्ही हे करू शकता. वास्तविक हे तीन ग्रह पैसे मिळवताना अडथळे निर्माण करतात. म्हणूनच, हे ग्रह शांत राहणे महत्वाचे असते.

शिवशंकराची पूजा करा:-

पैशाचा लाभ होण्यासाठी आपण सोमवारी शिवलिंगाला जल आणि फुले अर्पण करा. सोमवारी आंघोळ केल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा. त्यानंतर त्यामध्ये थोडे दूध घाला आणि लाल रंगाची फुले घाला. त्यानंतर हे पाणी शिवलिंगाला अर्पण करा. आपल्याला या उपायांचा लवकरच फा-यदा होण्यास सुरवात होईल.

 

दान करा:-

गरीबी दूर करण्यासाठी, ही युक्ती एकदा करून पहा. या युक्तीनुसार आपण दररोज सकाळी उठून धान्य आणि पक्ष्यांना पाणी घाला. दररोज पक्ष्यांना धान्य देऊन आपल्याला सर्व संकटांवर मात करता येते.

उपाय

पितृ दोष:-

जन्मकुंडलीतील पितृ दोषांमुळे आपल्याला कामात यश येत नाही आणि पैशाशी सं-बंधित समस्याही येऊ लागतात. म्हणून, हा दोष लवकरात लवकर दूर केला जाणे फार महत्वाचे असते. पितृ दोष तिळाच्या सहाय्याने सहज नष्ट करता येतो.

ज्या लोकांना पितृ दोष आहे त्यांनी तिळाचे दान करावे. असे केल्याने हा दोष कायमचा नष्ट होईल. त्याशिवाय तुम्ही तीळ पाण्यातही वाहू शकता. तरी, पाण्यात काळे तीळ सोडताना लक्षात ठेवा की कोणीही तुम्हाला पाहत नाही आहे आणि न वळता तेथून घरी परत या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here