आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 हे रहस्यमस्य शिवमंदिर आहे प्रत्येक शिवभक्तांसाठी खास..

आपल्या देशात प्राचीन काळातील अनेक अदभूत उदाहरण आज सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळतात. ज्यांना पाहून आमचे वैज्ञानिक आणि इंजिनीअर सुद्धा चकित होतात. प्राचीन विज्ञान आजच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अश्चर्यकारक होते. अजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका रहस्यमयी शिवमंदिराबाबत ज्याने विज्ञान युगातील मोठं-मोठ्या संशोधकांना कोड्यात टाकले आहे.

हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्यातील एलोराच्या गुहेमध्ये स्थित आहे. त्या मंदिराचे नांव आहे ” कैलास मंदिर “. तुमचा विश्वास नाही बसणार परंतु या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल 18 वर्ष लागले होते. जवळपास 7000 मजदुरांनी 18 वर्ष काम करून या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले होते.

हे विशाल कैलास मंदिर ” त्या कालच्याही अतुलनीय कलेचे एक विशेष उदाहरण आहे. या मंदिरामध्ये हिमालयातील कैलास पर्वतासारखे रूप देण्यात आले आहे.

एलोराच्या 16व्या गुहेमध्ये असलेले हे मंदिर पर्वताच्या उंच दगडांना भेदून बनवण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट तर ही आहे की हे संपूर्ण मंदिर फक्त एकाच दगडावर बनवण्यात आले आहे. जे या मंदिराला विशेष मंदिरामध्ये समाविष्ट करते.

काही संशोधकांच्या मते हे मंदिर जवळपास 1900 वर्ष जुने असेल. तर काहींच्या मते हे मंदिर 6000 वर्षांपेक्षाही जुने असावे.

मंदिर

 

या मंदिराच्या निर्मितीवेळेस कोणत्याही अश्या वस्तूचा उपयोग केला गेला नाहीये, ज्यामुळे हे समजू शकेल की हे मंदिर कोणत्या वेळी बनवण्यात आले आहे. बांधकामाच्या शैलीच्या अंदाजावरून संशोधकांनी या मंदिराला किती दिवस झाले असतील याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी एक महत्वाची आणि आच्छर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराचे बांधकाम हे वरून खाली करण्यात आले आहे. केलेल्या संशोधनानुसार सर्वप्रथम मंदिराच्या शिखराचे काम केले गेले आणि त्यानंतर मंदिराच्या पायाकडे काम करत वाटचाल केली गेली.

संशोधकांच्या मते या मंदिराच्या खोदकामावेळी जवळपास 5लाख टन दगड निघाले असावेत.

दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!

जर एक मजदूर दररोज 12 तास काम करत असेल तर दररोज 150 टन दगडं काढू शकत होते. परंतु संशोधकांच्या मते आजच्या टेक्निकनुसार या मंदिराचे बांधकाम 18 वर्षात पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे. आजच्या आधुनिक सुविधा असताना सुद्धा या मंदिराला बनवण्यास 200 वर्षापेक्षाही जास्त अवधी लागला असता.

वेदांमध्ये “बॉम्बअस्त्र” नावाच्या एका अस्त्राचा उल्लेख आहे. संशोधन केल्यानंतर या गोष्टीवर प्रकाश पडला की या अस्त्राच्या मदतीनेच या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले असावे.

मंदिर

या मंदिराच्या गुहा सुद्धा एका रहस्यांपेक्षा कमी नाहीयेत. या गुहांमध्ये जाण्यास सरकारने बंदी आणली आहे.

कैलास मंदिराची कलाकृती आणि बांधकाम शैली या गोष्टीचा पुरावा आहे की प्राचीन बांधकाम संस्कृती ही आजच्या शैलीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. आजच्या विज्ञान युगापेक्षा कितीतरी पटीने सरस असे त्या काळील बांधकाम आपणास
अनेक ठिकणी पाहावयास मिळते.

मंदिराच्या याच खास गोष्टीमुळे हे मंदिर शिवभक्तांसाठी एक मोठे धार्मिक स्थळ आहे. एलोराचे हे शिवमंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण तर आहेच परंतु येथील काही आच्छर्यकारक गोष्टीमुळे आणि याच्या निर्मितीमागील संशोधनामुळे हे मंदिर आजच्या विज्ञान युगातील संशोधकांसाठी सुद्धा एक मोठे आव्हान बनून उभे आहे.

या मंदिराच्या निर्मितीबाबत अनेक दावे केले गेले असून आजपर्यंत त्यावर कोणतेही संशोधन खरे ठरले नाहीये.

थोडक्यात मंदिर जरी कोणत्याही वर्षीचे अथवा कोणत्याही शैलीतील असेल परंतु शिवभक्तांसाठी
श्रीमहादेवांचे स्थान हे नेहमीच श्रद्धेचे ठिकाण आहे पुढेही असेच राहणार…

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here