आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या रक्तगटाच्या लोकांना डास चावल्यामुळे होत आहेत गंभीर रोग, अशी घ्या काळजी.!

डास चावल्यामुळे अनेक रोग होतात आणि बर्‍याच वेळा माणसाला आपला जीवही गमवावा लागतो. पावसाळ्यात डास जास्त असतात आणि त्यामुळे आजार होण्याचा धोकाही खूप वाढतो. म्हणून, पावसाळ्यात डासांपासून खूप सावध राहिले पाहिजे आणि आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.

डासांवरही बरेच संशोधन केले गेले आहे. ज्यामध्ये असे आढळले आहे की डास काही ठराविक रक्तगटाच्या लोकांना अधिक चावतात. प्रत्यक्षात रक्त गटांचे चार प्रकार आहेत. ज्याला ए, बी, एबी आणि ओ म्हणून ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीचा या चार रक्त गटांपैकी एक रक्तगट असतो.

रोग

बर्‍याच संशोधनात असे आढळले आहे की डास ‘ओ’ रक्तगटाच्या लोकांना अधिक चावतात. त्याच वेळी, ए रक्तगटाच्या लोकांना डास कमी चावतात. तर एबी ग्रुपच्या लोकांना सामान्य प्रमाणात डास चावतात.

मानवी गंधामुळे सुद्धा अनेक डास आपल्याकडे आकर्षित होत असतात म्हणूनच, जा लोकांना जास्त प्रमाणात घाम येत असतो, त्या लोकांना सुद्धा डास अधिक प्रमाणात चावतात. वास्तविक, घामात लैक्टिक ए-सिड, यूरिक ए-सिड, अमोनिया इत्यादी असतात आणि त्यांच्या वासामुळे डास अधिक प्रमाणात चावतात.

गर्भवती महिलांनाही असतो धोका.

बर्‍याच संशोधनात असेही आढळले आहे की डास जास्त गर्भवती महिलांना चावतात. वास्तविक गर्भवती महिला वेगवान श्वास घेत असतात आणि डास CO2 वायूकडे जास्त आकर्षित होत असतात. याशिवाय शरीराचे तापमान उष्ण व उबदार असल्यावरही डास जास्त चावतात.

आयसोल्यूसीन जास्त असणे.

डास त्याच लोकांना चावतात ज्यांच्या शरीरात जास्त आइसोलिसिन असते. या व्यतिरिक्त असेही मानले जाते की जे लोक जास्त बीयर प्यायतात त्यांना देखील डास खूप त्रास देतात. तरी या विषयावर अद्याप संशोधन चालू आहे.

डास मारण्याचे उपाय.

१) कापुर किंवा कापुरचा धूर हा डास मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी योग्य आहे. घरात दारे खिडक्या बंद करून कापुर जाळा, १० – १५ मिनीट हा धूर घरात राहुद्या. डास मारतील किंवा पळून जातील. डास मारण्याचे जे काही घरगुती उपाय आहेत त्यातील हा सर्वात सोपा आणि किफायतशीर उपाय आहे.

यांखेरीस कापुर वापरुन डास मारण्याचे आणखी बरेच घरगुती उपाय तुम्ही करू शकता. जसे की कापुर बारीक करून त्यामध्ये हार्डवेअर च्या दुकानात मिळणारे तरपिन तेल मिसळा. कापुरची केलेली पुड त्या तेलात पुर्णपणे विरघळली आहे का याची खात्री करून घ्या आणि हे तयार केलेलं मिश्रण घरातील जुण्या एखाद्या ऑल आऊट च्या किंवा इतर कोणत्या कंपनीच्या रिफील मध्ये भरा आणि रिफील लाऊन टाका. हा उपाय तुमच्या आरोग्यास हानिकारक नसून या मधील कापुर डासांबरोबर इतर किटके देखील मारेल.

रोग

२) लसूण. 

लसूण हे मानवी शरीरासाठी गुणकारी आहे. हार्ट अटॅक च्या पेशंट ला लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, ज्यांचा शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त आहे आशांनी लसूण नियमित खाल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. यांसारख्या अनेक गोष्टींसाठी लसूण उपयुक्त आहे. पण त्याच बरोबर डास मारण्याचे घरगुती उपाय जे तुम्ही करू इच्छिता त्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.

३) झेंडू 

झेंडू चे फूल जितके सुगंधित आणि आकर्षक असते त्याच प्रमाणे झेंडूचे झाड देखील. झेंडूचे झाड जर दारात किंवा घराच्या अंगणात असल्याने देखील घरात घरात डासांचे प्रमाण कमी होते. डास नियंत्रणा साठी झेंडू गुणकारी आहेच पण झेंडूचे झाड दारात असल्याने झेंडूच्या फुलाच्या सुगंधाने तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल.

४)नारळ

वाळलेला नारळ ज्यावेळी आपण सोलतो, आणि त्याच्या वरील आवरण काढून फेकून देतो. ते फेकून न देता ते जाळावे आणि त्याचा धूर घरात करावा. हा उपाय देखील बरेच जण डास मारण्याचे घरगुती उपाय म्हणून करतात. याने प्रत्यक्ष्यात किती प्रमाणात डासांवर नियंत्रण मिळते हे शाश्वत जारी नसले तरी बहुतांश डासांपासून वैतागलेले लोक हा उपाय देखील करतात.

डासांच्या चावण्याबद्दल अजून संशोधन चालू आहे आणि डास मानवांना का चावतात याचा अधिक शोध घेतला जात आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here