आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

उंची आहे केवळ ३ फुट ३ इंच पण खुर्ची आहे खूप मोठी, आपल्या मेहनतीने आरती बनली खूप मोठी IAS ऑफिसर.


 

देवाने सर्वांना वेगळे वेगळे रंग रूप दिले आहे याच रंगा रुपासोबत आपण आपले जीवन जगतो. सहसा काही लोकं आपले रंग,रूप,शरीर रचना(डालडौल)बाबतीत चिंतेत असतात.आणि त्यांना वाटते की आयुष्यामध्ये काहीतरी बनण्यासाठी चांगलं रूप, चांगली उंची,आणि गोरा रंग असणे खुप महत्वाचे आहे पण ही गोष्ट थोडी देखील बरोबर नाही.

माणसाची शरीर रचना,रंग,रूप कसेही असुदे जर काही करायची इच्छा मनामध्ये बाळगली तर सर्व लक्ष्य सोपी होऊन जातात.आज आम्ही तुम्हाला अशीच एक मुलगी आरती डोग्रा ची खरी कहाणी सांगणार आहोत. आरतीची शरीर रचना खूप छोटे असले तरी तिच्या इच्छा खूप मोठ्या होत्या.त्याच इच्छेने तिने IAS आधिकारी पद मिळवून आपले छोटे शरीर या बाबतीत जोडलेल्या सर्व लोकांच्या मनातील भ्रांत विरुद्ध उदाहरण दाखवले आहे.

उंची

३ फुट ३ इंच उंची.

उत्तराखंड स्थित डेहराडून मध्ये आरतीचा जन्म झाला.तिच्या वडिलांचे नाव राजेंद्र डोग्रा आहे जे भारतीय सैन्यामध्ये कर्नल च्या पदावर कार्यरत आहेत तसेच आईचे नाव श्रीमती.कुमकुम डोग्रा ज्या एका विद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

ज्यावेळी आरतीचा जन्म झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना सांगितले होते की आरती शारीरिक रूपाने कमजोर आहे.तेव्हा आरतीच्या आईवडिलांनी निर्णय घेतला की ते आता दुसरे मुल जन्माला घालणार नाहीत केवळ आरतीचे च योग्य प्रकारे ध्यान राखतील आणि तिला सर्व सुख सुविधा देऊन तिला चांगले शिक्षण देतील.

ग्रॅज्युएशन नंतर UPSC ची तयारी सुरू केली.

आरतीचे सुरुवातीचे शिक्षण उत्तराखंड मधील डेहराडून येथील एक नामवंत विद्यालय वेल्हम गर्ल्स स्कूल मधून झाले.नंतर तिने दिल्ली University स्थित लेडी श्रीराम कॉलेज commerce शाखेत admission घेऊन अर्थशास्त्र विषय ठेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केले.त्यानंतर तिने UPSC च्या परीक्षेची तयारी सुरू केली.

 २००६ या वर्षात तिने आपल्या पहिल्याच चान्स मध्ये IAS ची परीक्षा पास होऊन आपल्या सर्व नातेवाईकांची मान गर्वाने उंच केली.हे पद मिळवून तिने एक मिसाल प्रस्तुत केली.

स्वच्छतेसाठी चालविले ‘बंको बिकानो’ अभियान.

तिची पोस्टिंग ज्यावेळी बिकानेर मधे झाली त्यावेळी तिने तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी ‘बंको बिकानो’ अभियान चालू केले होते.याच्या अंतर्गत तिने तेथील रहिवाशांना स्वच्छता ठेवण्याचा आदेश दिला आणि उघड्यावर शोचास जाण्यासाठी देखील मनाई केली.या अभियानांतर्गत गावामध्ये शौचालयाची निर्मिती केली यामध्ये जवळ जवळ १९५ ग्रामपंचायतींना कवर केले होते.

हे अभियान खूप सफल झाले होते ज्याचे अनुसुरून अन्य जिल्ह्यांमध्ये देखील केले होते,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अभियानाला खूप मदत केली होती.

उंची

सफलतेच्या आडवे आले देऊ नाही शरीर रचना (डाल-डौल).

IAS आरती डोग्रा ची उंची कमी असल्यामुळे जिथे जाईल तिथे लोक तीला वेगवेगळ्या negative गोष्टी ऐकायला मिळायच्या,पण तिने या सर्वकडे लक्ष न देता आपल्या लक्ष्य ला च आपली इच्छा बनविले होते आणि त्यासाठीच मेहनत करत होती.तिने ठरविले च होते की आपण आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवायचे कारण अश्या संकीर्ण मानसिकता असणाऱ्या लोकांना शिकवण मिळून जाईल.

लोकांनी जाणले पाहिजे की प्रत्येक मनुष्य आपल्या बळावर मोठ्यात मोठा बनू शकतो त्याची शरीर रचना कशी का असेना.तिने आपल्या ध्येयाला मनात ठेवले आणि सर्व गोष्टी विसरून त्यासाठी मेहनत केली.

यांच्यासारखे सारखे खूप कमी उंचीचे लाखो लोक देशामध्ये आहेत जे आपल्या उंचीसाठी उदास राहतात. आणि खूप वेळ हिन भावनेचे शिकार होतात. त्या सर्वांनी आरती डोग्रा कडून शिकले पाहिजे आणि आत्म् विश्वास ठेऊन आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी मेहनत केली पाहिजे. तसेच आपल्या ध्येयासमोर कायम समर्पित आणि प्रामाणिक राहिले पाहिजे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here