आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

“स्टेचू ऑफ लिबर्टी” अमेरिकेला या देशाने भेट म्हणून दिला होता..

अमेरिकेतील “स्टेचू ऑफ लिबर्टी” हि त्यांच्यासाठी स्वतंत्रता इतिहासाची आठवण म्हणून ओळखल्या जाते. गेल्या १३५ वर्षापासून हि अमेरिकेत मोठ्या मानाने उभी आहे. परंतु तुम्हाला  “स्टेचू ऑफ लिबर्टी” अमेरिकेत कसा आला आणि त्याचे विशेष असे वैशिष्ट्ये माहिती आहेत का?

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया कि जगप्रसिद्ध “स्टेचू ऑफ लिबर्टीच्या अमेरिकेत येण्यापासून प्रसिद्ध होण्यापर्यंतच्या खास गोष्टी.

स्टेचू ऑफ लिबर्टी

“स्टेचू ऑफ लिबर्टी” हा अमेरिकेने स्वतः बनवलेला नाहीये. बऱ्याच जणांना असे वाटते कि “स्टेचू ऑफ लिबर्टी हे अमेरिकेचा आहे म्हणजे त्यानी स्वतः बनवून घेतला असावा. परंतु तसे नसून  १८८६ मध्ये फ्रांसने हि मूर्ती अमेरिकेला भेट म्हणून दिला होता.दरवर्षी या मूर्तीला पाहण्यासाठी जगभरातून ३० ते ३५ लाख लोक येत असतात. जेव्हा हि मूर्ती तयार होऊन उभी करण्यात आली,त्या वेळी हि लोखंडाची सर्वांत मोठी रचना होती.

 

“स्टेचू ऑफ लिबर्टी” विषयीच्या काही खास गोष्टी.

“स्टेचू ऑफ लिबर्टी” कोणत्या पुरुषाची नाही तर एका महिलेची मूर्ती आहे, जिला मूर्तीकाराने आपल्या स्वतःच्या आईच्या चेहऱ्यासारखा चेहरा दिला होता.स्टेचू ऑफ लिबर्टी” च संपूर्ण नाव “lIBERTY ENLIGHTENING THE WORLD” असे आहे.

“स्टेचू ऑफ लिबर्टी” हि जगासमोर सर्वप्रथम २८ ऑक्टोबर १८८६ मध्ये लोकांना पाहण्यास खुली करण्यात आली.परंतु अस असले तरी या मूर्तीचे मुंडके हे १८७८ मध्येपॅरीसच्या विश्वयात्रेत प्रथम दाखवण्यात आले होते. “स्टेचू ऑफ लिबर्टी”ला बनून तयार होण्यासाठी लगभग ९ वर्षांपेक्षा जास्त काळ लागला होता.

या मूर्तीच्या एका हातात जळती मशाल तर दुसर्या हातात एक पुस्तक आहे. पुस्तक डाव्या हातात पकडळे आहे तर त्यावर JULY IV MDCCLXVI (रोमन भाषेत ४ जुले १७७६) लिहलेले आहे.हि अमेरिकेच्या स्वतंत्रता दिनाची तारीख आहे. त्यामुळे या मूर्तीला अमेरिकेच्या स्वतंत्रता दिनाच्या दिवशी जगभरातील लोक मोठ्या संखेने लोक भेट देतात.

“स्टेचू ऑफ लिबर्टी”ची उंची हि २२ मजल्याच्या इमारतीएवढी आहे. जमिनीपासून ते हातातील मशालीच्या टोकापर्यंत ३०५ फुट ६ इंच आणि मूर्तीच्या पायापासून वरपर्यंत ११ फुट ६ इंच आहे. मूर्तीचे एकूण वजन हे २०४११६ किलो आहे. मूर्तीच्या कमरेचा घेरा हा ३५ फुटाचा आहे. मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटापर्यंत पोहचण्यासाठी लोकांना ३५४ पायऱ्या चढाव्या लागतात.

“स्टेचू ऑफ लिबर्टी” बनवण्याची आयडिया EDOUARD DE LABOULAYE ने दिली होती तर , हि मूर्ती FREDERIC AUGUSTE BARTHOLDIने डिझाईन केली होती. या विशाल मूर्तीच्या पायातील बुटांचा  नंबर ८७९ आहे. मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटात ७ खिळे आहेत जे सात लक्षद्वीप आणि समुद्र यांच्याकडे लक्ष दर्शवतात. तसेच मुकुटात २५ खिडक्या सुद्धा आहेत जे जमिनीवरील रत्नाकडे लक्ष दर्शवतात.

 

हि गोष्ट १९८२ मध्ये समजली कि “स्टेचू ऑफ लिबर्टी”चा चेहरा तिच्या लावण्यात येणाऱ्या मेन जागेपेक्षा २ फुट मागे सरकून प्रस्थापित करण्यात आला. चेहऱ्याची लांबी ८ फुट असल्यामुळे नंतर हा चेहरा असंच ठेवण्यात आला.

स्टेचू ऑफ लिबर्टी

 

महत्वाची गोष्ट म्हणजे “स्टेचू ऑफ लिबर्टी”वर दरवर्षी ३०० वेळा वीज पडते.जर या सर्व पवार ला मोजले तर ती ६०० होल्टच्या वर भरते. यावर वीज पडताना पहिला फोटो २०१० मध्ये काढला गेला होता. ज्या ठिकाणी या मूर्तीला बनवण्यात आले आहे ती जागा म्हणजे BEDLOEआयलंड. १९५६ नंतर या आयलंड चे नाव बदलून “लिबर्टी आयलंड” असे ठेवण्यात आले.

आतापर्यंत एकूण २ लोकांनी या मूर्तीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यापैकी एक १९२९ मध्ये आणि दुसरी आत्महत्या १९३२ मध्ये केली गेली होती.

हि मूर्ती रोमन देवीची प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे कारण रोमन देवीला अमेरिकेत स्वतंत्रता देवी मानल्या जाते. या मूर्तीचे २ फोटो दहा डॉलरच्या नोटेवर सुद्धा छापण्यात आले होते तसेच डाक तिकिटावर असलेले या मूर्तीचे फोटो हे ओरीजनल मूर्तीचे नसून लॉस वेगासच्या डुप्लिकेट मूर्तीचे आहेत.

मूर्तीसारख्या हुबेहूब डूप्लिकेट मुर्त्या पाकिस्तान, मलेशिया, तैवान,ब्राजिल, आणि चीन मध्ये सुद्धा निर्माण करण्यात आल्या आहेत.

 

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here