आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
भूकमारी ने वेढलेले जगातील पाच देश..
ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भुक निर्देशकची यावर्षीची यादी नुकतीच जाहीर झाली आहे .या यादीनुसार भूकमारी मध्ये भारत जगामध्ये ९४ व्या नंबरवर आहे . गतवर्षीच्या प्रमाणाची तुलना करायची झाली तर यावर्षी भारताचा भूक निर्देशांक कमी झाला आहे. परंतु इतर देशांचा विचार करायचं झालं तर आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असणारे बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान ज्या देशापेक्षा भारत खूप पिछाडीवर आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स नुसार भारतातील १४ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कुपोषणाचा शिकार झाली आहे .
आज आपण जाणून घेणार आहोत की जागतिक भूक निर्देशांक मध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या पाच देशाबद्दल..!
१. हैती
भूकमारीच्या विळख्यात सापडलेल्या देशांमध्ये हैती हा देश सर्वात अव्वल स्थानी आहे. या देशामध्ये भूकमारी असण्याचं एक कारण म्हणजे या देशाला खूप वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. देशामध्ये एकूण ५५ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली आहे. त्याचबरोबर 25 टक्के पेक्षा जास्त लोकांकडे त्यांचे दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी 140 रुपये पेक्षा कमी आवक होते. याच कारणामुळे या देशाला मोठ्या प्रमाणावर भूकमारीचा सामना करावा लागत आहे.
२. चड
लिबिया आणि सूडान या देशांनी वेढलेला चड हा देश सुद्धा भूकमारी चा शिकार झाला आहे. या देशांमध्ये बहुतांश लोकसंख्येला खाण्यासाठी अन्न सुद्धा मिळेना झाले आहे. दुसरीकडे पाहता या देशांमध्ये कुपोषणाचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की 1 ते 5 वयोगटाच्या मुलांमध्ये मृत्यूदर खूप जास्त आहे. प्रत्येक दहा पैकी एक मुलगा जन्मापासून पाचव्या दिवसा पर्यंत जगू शकत नाही. चड हा देश लागोपाठ तीन वर्ष हंगर इंडेक्स मध्ये अव्वल स्थानी राहिला आहे.
३. तीमोर लेस्ते
या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याच्या कमतरते खाली दबलेली आहे. देशामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन्न घेता येत नाही. लोकांच्या खाण्यापिण्याच्या गुणवत्तेमध्ये आणि शारीरिक स्वस्त मध्ये कोणत्याही प्रकारची जागरूकता नाही. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगामुळे आणि अन्नधान्याच्या कमतरतेमुळे पंधरा टक्के पेक्षा जास्त मुलांचा पाच वर्षाच्या अगोदरच मृत्यू होतो.
४. मेडागास्कर
या देशांमध्ये भूकमारी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये या देशाला धोक्याच्या यादीमध्ये सामील केले आहे. कुपोषणाच्या कारणामुळे या देशांमध्ये जवळपास 40 टक्के पेक्षा जास्त मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्णपणे होऊ शकत नाही. या देशांमध्ये वारंवार होणाऱ्या वादळामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही.
५. मोजम्बिक
दक्षिण आफ्रिका मध्ये असणाऱ्या मोझँबिक हा देश जागतिक भूक निर्देशांक यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. सन 2015 मध्ये या देशाची परिस्थिती सुधारली होती परंतु तेव्हापासून हा देश सलग खालच्या क्रमांकावर येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 32 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या बुक मारी चा शिकार झाली आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
-
या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!
-
दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…