आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

देवीच्या दर्शनासाठी  सदैव भक्त आतुर असतात. देवी- देवतांवर असलेल्या अतूट श्रद्धेमुळे त्यांच्यातील आणि भक्तांमधील नाते आजून  घट्ट होते. अश्याच एक आजीबाई सध्या आपल्या लाडक्या देवीच्या दर्शनास आतुर झाल्या असून दर्शनासाठी त्या चक्क सायकलवरून २२०० किमी लांबचा प्रवास करण्यास निघाल्या आहेत.

त्यांच्या या अनोख्या कार्यामुळे  सध्यासोशल मिडीयावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मिडिया वरती सध्या एका आजीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ६८ वर्षाची हि आजी  चक्क सायकल वरून वैष्णोदेवी दर्शनासाठी २२०० किलोमिटर ची यात्रा करत आहे. हा व्हिडीओ कोणीतरी त्यांच्या प्रवासादरम्यान बनवला असून,लोक आजीची प्रसंशा करत आहेत.

देवी

तरुण मुले सुद्धा एवढा प्रवास सायकलवरून करायचा असल्यास हजार वेळा विचार करतील , परंतु भक्तीपुढे काहीही मोठे नसते.  असे मानून आजीबाई चक्क सायकलवरून देवीच्या भेटीसाठी रवाना झाल्या आहेत.

कोण आहेत ह्या आज्जी?

सायकलवरून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या ह्या आजी आहेत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील. त्या २४ जुलैला आपल्या घरून एकट्या सायकलवरून तब्बल २२०० किमी अंतर पार करून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत.

त्या दररोज ४० किमी अंतर पार करतात आणि ज्या ठिकाणी दिवस मावळेल तेथे वास्तव्यास राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तश्याच पद्धतीने प्रवास करतात.

#मातृशक्ती या नावने त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड होत आहे. मनात भक्तीभाव असेल तर कोणताही अडथळा दूर होऊ शकतो हे आजीने पुन्हा एकदा नव्याने सिद्ध केले आहे. सोशल मिदियावर सुद्धा ह्या आजीबाई ट्रेंडमध्ये आहेत. लोक त्यांची खूप प्रसंशा करत आहेत.

 

एकाने लिहले आहे कि , आजी तुम्ही तरुण पिढी समोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यासाठी तुमचे विचार प्रेरणादायी आहेत.एकटा व्यक्ती काय नाही करू शकत,फक्त मनात इच्छाशक्ती असायला हवी . असं आजीबाई सांगतात.

तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहले आहे कि आई जगदंबा सदैव या आजीबाईचे रक्षण करो. आजीकडे पाहून वाटते कि, दृढनिश्चय करून विचार केल्यास सर्व काही संभव आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here