आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
या कारणामुळे ऑपरेशन करतांना डॉक्टर्स फक्त हिरव्या आणि निळ्याचं रंगाचे कपडे घालतात…
तुम्ही दवाखान्यामध्ये डॉक्टरांना किंवा निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहिले असेल. हे कपडे डॉक्टर तेव्हाच घालतात जेव्हा कोणत्या पेशंटचे ऑपरेशन करायचे असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डॉक्टर ऑपरेशन करताना हिरवा किंवा निळ्या रंगाचाच कपडा का घालतात ..?
या रंगा ऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडे का घालत नाहीत…?
असे म्हटले जाते की पहिले डॉक्टरांपासून दवाखान्यातील सर्व कर्मचारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालत असत. परंतु सण 1914 मध्ये प्रभावशाली डॉक्टरांनी या पारंपारिक पोषाखाला हिरव्या रंगांमध्ये रूपांतरित केले ,तेव्हापासून सर्व डॉक्टर हिरव्या रंगाचा पोशाख ऑपरेशन करताना वापरू लागले तुम्ही पाहिले असेल काही डॉक्टर्स निळ्या रंगाचा पोशाख सुद्धा वापरतात.
दवाखान्यामध्ये तुम्ही जर लक्ष देऊन पाहिले असेल तर पडद्यांचा रंग हिरवा किंवा निळा असतो . याशिवाय दवाखान्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा मास्क आणि कपडे हे ही निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असतात. हे सगळे पाहता असा प्रश्न मनामध्ये येतो की हिरव्या निळ्या रंगामध्ये अशी काय खास गोष्ट आहे जी इतर रंगांमध्ये नाही..?
१९९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, ऑपरेशन करताना डॉक्टरांनी हिरव्या रंगाचा पोशाख घालण्यास सुरुवात केली कारण हे डोळ्यांना आराम देतात. कायम असं होतं की जर आपण एकाच रंगाला बघत राहिलो तर आपल्या डोळ्यांना एक प्रकारचा थकवा जाणवायला सुरुवात होते.
आपण जर सूर्याकडे किंवा एखाद्या चमकदार वस्तू कडे पाहिल्यास आपले डोळे दिपतात,त्यांना त्रास होतो पण आपण लगेच हिरव्या रंगाला पाहिले तर आपल्या डोळ्याला आराम भेटतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पहायला गेलो तर आपल्या डोळ्यांची निर्मिती अशी प्रकारे झाली आहे की आपले डोळे लाल,हिरवा आणि पिवळा रंग पाहायला खूप सक्षम आहेत. या रंगच्या मिश्रणातून बनलेले करोडो रंग डोळे पाहू शकतात मात्र जर तुलना करायची झाली तर आपले डोळे हिरव्या किंवा निळ्या रंगाला चांगल्या प्रकारे पाहू शकतात.
आपल्या डोळ्याला लाल आणि पिवळा रंग पाहताना जितका त्रास होतो तेवढा त्रास हिरवा किंवा निळा रंग पाहताना होत नाही. या कारणामुळे दवाखान्यामध्ये लावलेल्या पडद्याचा आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या कपड्यांचा रंग हिरवा किंवा निळा असतो जो की हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या आणि राहणाऱ्या रुग्णांच्या डोळ्याला आराम देतो.
डॉक्टर ऑपरेशनच्या वेळेला हिरच्या रंगाचे कपडे घालतात कारण ते सतत रक्त आणि मानवी शरीराच्या अंतरभागाला पाहून मानसिक तणावात येऊ शकतात आणि हिरवा किंवा निळा रंग ,त्यांचा हा तणाव कमी करण्यात आधी सक्षम असतात.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
-
या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!
-
दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!