आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आजी आजोबांच्या लग्नातील एकही फोटो नसल्यामुळे या नातवाने केलय हे भन्नाट काम..

केरळमधील एका वयस्कर जोडप्याने लग्नाच्या 58 व्या वर्षानंतर त्यांच्या लग्नाचे फोटोशूट केले. या वयोवृद्ध जोडप्याने एका तरुण जोडप्यासारख्या पोज दिल्या आणि स्वतःची अनेक फोटो सुद्धा काढली. असं सांगितलं जातंय की, चिन्म्मा आणि कोचुकुट्टी याच्या लग्नाला 58 वर्ष झाली आणि दोघांनीही आता लग्नाचे फोटोशूट केले आहे.

यामुळे केले फोटोशूट.

चिन्म्मा आणि कोचुकुट्टी याच्या काळातील लग्नाची काहीच छायाचित्रे नव्हती. यामुळेच या दोघांनी लग्नाचे फोटोशूट वयाच्या ५८ व्या वर्षी केले. आश्चर्य म्हणजे त्यांना या लग्नाच्या फोटोशूटची काहीच कल्पना नव्हती त्याच्यासाठी हे फोटोशूट सरप्राईझ म्हणून ठेवले होते.

 

हे सरप्राईझ त्यांना त्याच्या नातवाने दिले. त्यांच्या नातवाच्या म्हणण्यानुसार आजोबांच्या लग्नाचे फोटो नव्हते. त्यामुळेच त्याच्या लग्नाचे फोटोशूट केले. या दाम्पत्याच्या नातवाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि त्यात लिहिले होते की, त्याला आपल्या आजोबांच्या लग्नाचे फोटो पहायचे होते. पण त्या लग्नाचे फोटो नव्हते. म्हणून हे सर्व आता घडले.

 

त्याच वेळी, नातवाच्या या सरप्राईझने चिनम्मा आणि कोचुकुट्टी खूपच खूष झाले आणि या जोडप्याने त्यांचा फोटोशूट अगदी आनंदाने करुन घेतला.

आजी

लग्नाच्या फोटोशूट पूर्वी बरीच तयारी केली गेली होती आणि हे जोडपं अगदी नव्या जोडप्या सारखे दिसत होते. या फोटोशूटसाठी चिन्नम्माने पांढरी आणि गोल्डन जरीची साडी परिधान केली होती आणि तिचा मेकअपही मेकअप आर्टिस्टने चांगलाच आकर्षित केला होता. तर कोचुकुट्टी यांनी काळ्या रंगाचा सूट घातला होता. ज्यामध्ये ते अगदी हँडसम दिसत होते.

 

सर्व तयारी झाल्यानंतर, त्यांना एका अतिशय सुंदर ठिकाणी शूटसाठी नेण्यात आले. फोटो शूट झाल्यानंतर त्याच्या नातवाने इन्स्टाग्रामवर फोटोही टाकले. जे खूपच व्हायरल झाले आणि प्रत्येकाला हे फोटो खूपच आवडले. अशाप्रकारे त्याचे वयाच्या ५८ व्या वर्षी आणि एकदा लग्न झाले असे म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही.

पहा या जोडप्याचे सुंदर फोटो.

आजी

 

आजी

 

आजी

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

INTERESTING FOR YOU.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here