आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
या कारणांमुळे माणसाचे आयुष्य जनावरांपेक्षा जास्त असते…!
मृत्यू हा अटळ आहे. मग तो माणूस असो किंवा जनावर . आज पर्यंत झालेल्या संशोधनावर आपण कोणत्याही जनावरांची व माणसांची वयाचा अंदाज लावू शकतो. जनावरांचे वय माणसांपेक्षा कमी असते. माणसांच्या तुलनेत जनावरे लवकर वयस्कर होतात आणि मरून जातात.
आपल्या घरातील पाळीव कुत्रा जर दहा वर्षे जगत असेल तर असे म्हटले जाते की मानवी आयुष्याचे तो ७० वर्ष जगला . असे मानले जाते की कुत्रा त्याच्या एका वर्षाच्या आयुष्यामध्ये मानवी आयुष्याचे सात वर्ष जीवन जगतो. परंतु सध्याच्या नवीन वैज्ञानिक संशोधन वरून कुत्र्यांचे आयुष्य समजणे इतके पण सोपे नाही.

मिलिट्री मिशन साठी वापरण्यात येणाऱ्या कुत्र्यांच्या प्रजातीमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता सहा ते बारा वर्षांमध्ये उत्पन्न होते. त्याचबरोबर कुत्र्यांच्या काही प्रजाती वीस वर्षापर्यंत जगतात. असे मानले जाते की कुत्र्याचे एक वर्ष मानवी आयुष्याच्या सात वर्षा बरोबर असते तर या प्रजातीच्या कुत्र्यांचे आयुष्य १४० वर्ष झाले म्हणजेच मानवी आयुष्याच्या दोन पटीने जास्त असते.
मात्र असे नाही की सर्व प्रगतीच्या कुत्र्यांचे आयुष्य सारखेच असते. त्यांचे आयुष्य त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीवर निर्भर असते. मिशन साठी वापरले जाणारे छोटे कुत्रे जास्त आयुष्याचे असतात आणि मोठ्या कुत्र्यांच्या तुलनेत हे कमी गतीने वयस्कर होतात.
आता असा प्रश्न तयार होतो की वयाशी आपले काय नाते आहे . कोणताही प्राणी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जितकी वर्षे जिवंत राहतो ते त्याचे आयुष्य किंवा जीवनकाळ म्हटले जाते. परंतु वयाची एक कालानुक्रम परिभाषा आहे आणि एक जैविक परिभाषा आहे. जैविक परिभाषा ही आपल्या शरीराच्या स्वास्थ म्हणजेच तंदुरुस्तीच्या गुणवत्तेवर आधारित आहे.
म्हणजे एखाद्या मनुष्याचे आयुष्य वीस वर्षे असेल परंतु त्याचे स्वास्थ खराब असेल तर हे निश्चित आहे की त्याचे शरीर तेजीने कमजोर होईल आणि तो तेजीने वयस्कर व्हायला सुरुवात होईल.
कोणत्याही व्यक्तीचे आजार त्याच्या दिवसभर काम करण्याची पद्धती आणि त्याचे स्वास्थ यावरून ठरवले जातात आणि यनंतर याला दोन वेगळ्या स्तरावरती विभागले जाते. पहिला आहे जीन स्तर. जीन आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची निर्मिती करत असतात.
वयानुसार हे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगळ्या स्तरावरती निर्मित होतात. दुसरा स्तर आहे आपल्या शरीराची प्रतिरोधक क्षमता पेशींच प्रमाण. ज्या पद्धतीने आपल्या जैविक आयुष्य वाढते त्याच्या मध्ये बरेच अनुवंशिक कारणे, माणसाची दिनचर्या आणि त्याचं स्वास्थ या सर्वांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम असतो.
जर एखादा व्यक्ती संतुलित आहार घेत नसेल, जास्त सिगरेट पीत असेल, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसेल तर निश्चितच अशा माणसाचे आयुष्य कमी असते आणि तो वयाच्या चाळीस वर्षांमध्ये तो साठ वर्षाचा असल्यासारखे आयुष्य जगू लागतो. जर दुसरीकडे एखाद्या व्यक्तीने आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो, दररोज व्यायाम करतो तर ती व्यक्ती वयाच्या साठाव्या वर्षीही चाळीस वर्षाची असल्यासारखे आयुष्य जगू लागतो. अशा लोकांची क्वालिटी लाइफ जास्त असते.
जर जनावरांच्या सर्व प्रजातींचे आयुष्याचे अध्ययन करायचे झाले तर जैविक आयुष्याची परिभाषा ही कालानुक्रमे परिभाषे पेक्षा जास्त प्रभावी ठरते. वैज्ञानिकांची मते जैविक आयुष्याचे मोजमापन करणे एक कठीण काम आहे. स्तनधारी प्राण्यांच्या डी एन ए मध्ये वेळोवेळी बदल होत राहतात. डीएनए मिथाईलेशन मुळे वयाचा वयाचा अंदाज लावणे सोपे होते.
वेगवेगळ्या प्रतींच्या प्राण्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे शारीरिक विकास एक समान होतात. कुत्रे अत्यंत तेजीने त्यांच्या मध्यम आयुष्य पर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्यातून हळूहळू वृद्ध वयाकडे जातात.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
-
या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!
-
दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…