आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जाणून घ्या कंबर दुखीची कारणे आणि उपाय…

कंबर दुखी हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे . आपल्याला कंबरदुखीच्या त्रासाने त्रस्त असलेली अनेक माणसे पाहायला मिळतील. कंबर दुखी होण्या मागची कारणे आपण टाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो. जर तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित आणि तंतोतंत पाळल्या तर तुम्हांला कंबर दुखीचा त्रास कधीही होणार नाही.

मांस पेशी वर झालेला तणाव हे कंबर दुखी होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. आपण अचानक उठताना,बसताना किंवा कोणते काम करत असताना, आपण पायऱ्यावरून चडत किंवा उतरत असताना मांस पेशी वर त्यांना होऊ शकतो ही समस्या जास्त काळासाठी आपल्याला कंबरदुखीचा त्रास येते.

कंबर

खाली काही कंबर दुखीची कारणे आणि त्यांचे उपाय दिले आहेत….!

कंबर दुखीचे कारण..

मांस पेशीचा कमजोरपणा..

वयाच्या चाळीस वर्षाच्या आसपास किंवा त्यानंतर मांस पेशी अशक्त व्हायला सुरुवात होते . पाठीच्या कण्याला काही कारणामुळे मार लागला असेल ,तर अशा लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते . कमरेच्या मांस पेशी अशक्त झाल्यावर कमरेमध्ये जास्त त्रास व्हायला सुरुवात होते .

 

उतरत्या वयानुसार तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे . विटामिन-ई ,मिनरल्स आणि काही पोषक जीवनसत्व असलेल्या आहार ग्रहण करावा . त्याचबरोबर तुम्ही दररोज योगासने करायला हवेत . मांस पेशी मजबूत करणारे व्यायाम तुम्ही दररोज करायला हवेत .

 

चुकीच्या पद्धतीने उठणे किंवा बसणे

शरीराचा पवित्रा म्हणजेच आपल्या उठण्याचा,बसण्याचा खाण्याचा, झोपण्याचा प्रकारे आपल्याला कंबरदुखी चे कारण होऊ शकतो. घरातून काम करत असताना नेहमी आपण खुर्चीवर ,सोप्यावर बसून किंवा बेडवर झोपून लॅपटॉप चालवत काम करत असतो. ऑफिस मध्ये आहे, आपण पण एकाच अवस्थेमध्ये बसून राहतो आणि याच कारणामुळे कंबरदुखीची समस्या होते.

 कंबर दुखी

उपाय.

◆ तुम्ही एकाच ठिकाणी बसून काम करत असताना अधून मधून उठून ब्रेक घेतला पाहिजे. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नका.

◆ आपला झोपण्याचा प्रकार बरोबर असणे गरजेचे आहे

◆ जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे ,हे तर अशावेळी एका अंगावर झोपणे फायद्याचे ठरते . त्यामुळे आपली कंबर सरळ राहते आणि शरीराला आराम मिळतो .

◆ जर तुम्ही कमरेवर भर देऊन झोपणार असाल तर तुमची कंबर सरळ ठेवण्यासाठी गुडघ्याच्या खाली उशीचा वापर करा .

◆ जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर तुमच्या पोटाखाली एक पातळ उशी ठेवा या करण मुळे कंबर सरळ राहते.

◆ तुमचे वजन तुमच्या वयोमानानुसार ठेवा.

◆ पायऱ्या चढत , उतरत असताना तुम्ही व्यवस्थित पणे काळजी घेतली पाहिजे.

◆ जर तुम्ही एकाच ठिकाणी खूप वेळा पासून बसून राहिला आहात ,तर तुम्ही त्या ठिकाणाहून अचानक उठले नाही पाहिजे.

◆ जर एखादे काम करत असताना तुम्हाला मांस पेशीवर तणाव जाणवला, तर अशा कामापासून दूर राहा .

◆ जर तुम्हाला तुमच्या कमरेवर जोर पडल्यासारखे किंवा झटका लागल्यासारखे जाणवत असेल ,तर एका चांगल्या डॉक्टर कडे ते दाखवून घ्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here