आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

चांगल्या आरोग्यासाठी हिवाळ्यात करा या आहाराचे सेवन…!

 

हिवाळ्यामध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे आहाराची काळजी करणे अत्यंत गरजेचे आहे. थंडीमध्ये काय खायला हवे आणि काय खाऊ नये या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. हिवाळ्यामध्ये वातावरणात सतत बदल होत असतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

 

आज आपण हिवाळ्यामध्ये आहार घेत असताना कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याबद्दल जाणून घेणार आहोत . या गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश केल्यावर आपले शरीर सदृढ राहण्यास मदत होते.

 

हिवाळ्यामध्ये आपण जे पाणी पितो ते थोडेसे गरम किंवा कोमट असणे अत्यंत गरजेचे असते. जर आपण जेवण करत असताना थोड्या गरम पाण्याचे सेवन केल्यास त्याचा अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरास उबही मिळते.

 

हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश असायला हवा दूध, दही, लोणी ,ताक ,तूप हे रोजच्या खाण्यात असावेत. अशा पदार्थांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा आणि शरीरास उब मिळावी म्हणून आपण दुधात सुंठ, केशर असे पदार्थ देखील घालता येतात. लोणी मध्ये काळी मिरी, आले ,थोडासा लसूण, कोथिंबीर घातली कि ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला गरज आज असलेले स्निग्धता आणि ऊर्जाही मिळते

 

हिवाळ्यामध्ये डाळिंब खाण्याचे अतिशय फायद्याचे ठरते. आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवण्याकरिता डाळिंबाची खूप मदत होते.जर इतर फळांशी तुलना करायची झाली तर डाळिंबामध्ये इतर फळांच्या तुलनेत सर्वाधिक अँटी ऑक्सीडटस असतात . थंडीच्या दिवसांमध्ये डाळिंबाचा ज्यूस पिणे अत्यंत गुणकारी ठरते.

आहार

बदामामध्ये उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात . काही प्रकारचे कर्करोग, रक्ताल्पता , हृदयाच्या विविध व्याधी , केसांच्या व त्याच्या विविध तक्रारी ,मधुमेह इत्यादी अनेक व्याधी मध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो. बदाम रात्री भिजत घालून सकाळी त्याच्या साली काढून खाल्ल्याने शरीरास चांगला फायदा मिळतो.

 

हिवाळ्यात आपल्या आहारामध्ये ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गुळ तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी , ओली हळद -आंबेहळद यांच्यापासून बनवलेल्या लोणचे यांचा समावेश असणे गरजेचे आहे.

 

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुंठ गुळ किंवा तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचे लाडू किंवा अळीवाचे लाडू खाणे. जेवणानंतर ओवा तीळ किंवा सुपारी खाणे अतिशय फायदेशीर ठरते. मनुक्यामध्ये अतिशय तंतुमय पदार्थ असतात. यामुळे रक्ताल्पता ,मलबद्धता , शरीरातील अतिरिक्त उष्णता , हाडांचे विकार , स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.

आहार


पिस्ता खाल्ल्यामुळे डोळ्यांचे विकार ,मधुमेह, हृदयविकार मलबद्धता, कोलेस्ट्रॉलच्या तक्रारी अशा अनेक व्याधींमध्ये त्याचा उपयोग होतो.

 

हिवाळ्यामध्ये काजू चे सेवन केल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने मिळतात. तसेच हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे -हाडांचे विकार, रक्तवाहिन्यांचे विकार ,मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधी मध्ये काजूचे चांगले उपयोग आहेत.

 

=== आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : अश्वधामा आजपर्यंत जिवंत आहे, वाचा सविस्तर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here