आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

WHATSAPP जगातील सर्वांत सुरक्षित मेसेंज प्लॅटफोर्म समजल्या जाते ते फक्त त्याच्या एंड टू एंड इंक्रीप्षन टेक्नोलॉजी मुळे. तस असलं तरीसुद्धा सध्या अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीच्या WHATSAPP चॅट प्रसार माध्यमांना मिळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे परत एकदा WHATSAPP च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुम्ही सुद्धा तुमचे अकाऊंट आणि संदेश सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे झाले आहे.
फारच कमी लोकांना माहिती आहे की, WHATSAPP काही असे सुरक्षेसाठी फिचर देत आहे, ज्याने तुम्ही तुमचे अकाऊंट योग्यरीत्या सहज सुरक्षित ठेवू शकता. एवढच नाही तर काही नियम आहेत जे आपण पाळले तर आपले मेसेज चुकीच्या  व्यक्तीच्या हातात पडणार नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया WHATSSAPP बद्दलच्या अश्या काही गोष्टींबद्दल ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे अकाऊंट आणि संदेश हॅकर्स पासून सुरक्षित ठेवू शकता.

WhatsApp

क्लाउड बैकअप डिसेबल करा..

खूप कमी लोकांना हे माहिती आहे कि जेव्हा ते रात्री २ वाजता झोलेलेल असतात तेव्हा WhatsApp जास्त प्रमाणत चालू असते. कारण त्या वेळी ते सर्व चॅटचे बैकअप क्लाउड स्टोरेज मध्ये घेत असतो. यामुळेच जेव्हा कोणता वापरकर्ता अन्य कारणामुळे एका मोबाईल मधील WhatsApp बंद करून दुसऱ्या मोबाईल मध्ये सुरु करतो तेव्हा त्याला जुन्या मेसेज आणि चॅटचा बॅकअप मिळत असतो.

क्लाउड बैकअप डिसेबल का करावे?

WhatsApp वर मेसेज एन्क्रिप्ट केले गेले आहेत. परंतु क्लाउड वर जे काही अपलोड होते ते एन्क्रिप्ट नसते त्यामुळे जर कोणत्याही हॅकर्सला तुमचा बॅकअप हॅक करायचा असेल तर, तो अत्यंत सहजतेने तुमच्या मोबाईल डिवाईसला क्लोन करून तुमचे WhatsApp चॅट आणि मेसेज वाचू शकतो.

असीही शक्यता वर्तवल्या जातेय कि सीबीआयला रिया चक्रवर्तीचे WhatsApp चॅट याच पद्धतीचा वापर करून मिळाले होते. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा असे वाटत कि आपले मेसेज कोणीही वाचू नये तर तुम्ही क्लाउड बैकअप ला डिसएबल
करणे अत्यंत गरजेचे आहे. क्लाउड बैकअप डिसएबल करण्यासाठी WhatsApp मध्ये WhatsApp Settings > Chats > Chat Backup > Back up to Google Drive ऑप्शन निवडा आणिNeverसेलेक्ट करा.

परंतु हे लक्षात असू द्या कि, एकदा क्लाउड बंद केल्यानंतर तुम्ही WhatsApp डिलीट करून परत इंस्टाल केले किवा मोबाईल बदलला तर तुमचे जुने मेसेज आणि चॅट तुम्हाला परत मिळणार नाहीत.WhatsApp

 

स्वहस्ते एनक्रिप्शन तपासा.

whatsappचे म्हणणे आहे कि ते  हे एंड टू एंड एनक्रिप्शन सुविधेसह सेवा प्रदान करते.  तरी सुद्धा तुम्ही  स्वहस्ते मैन्युअली चेक करून त्याच्या विषयी पूर्णपने खात्री करून घेऊ शकता.

तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चॅट वर जाऊन त्याच्या नावावर क्लिक करून नंतर एन्क्रिप्शन वर क्लिक करा. तुम्हाला काही पॉप -अप दिसून येईल. तो तुमचा सिक्योरिटी कोड आहे. हा WhatsApp साठी आपल्या ओळखीच्या पुराव्यासारखे काम करतो.तुम्ही याला इमेल अथवा अन्य मेसेजच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता.

वेरीफाय करण्यासाठी कोड स्कॅन करण्याचा सुद्धा पर्याय दिला गेला आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही कोड शेअर केलाय त्यांना विचारून खात्री करून घ्या कि कोड स्कॅन केल्यानतर तुमचे अकाऊंट डिटेल दिसत आहेत.
यासाठी थोडा समोरच्या व्यक्तीला वेळ द्यावा लागू शकतो परंतु शेवटी गोष्ट तुमच्या सुरक्षिततेची आहे, त्यामुळे हे सुद्धा एकदा करून पाहणे गरजेचे आहे.

 

दोन स्टेप मध्ये वेरीफिकेशन (2 step verification)

हे वेरीफिकेशन निश्चित करते कि जेव्हाही तुम्ही अन्य कोणत्याही मोबाईलवर तुमचे WhatsApp अकाऊंट सुरु करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आपल्याला ६ अंकाचा कोड  द्यावा लागतो जो तुम्ही वेरीफिकेशन करतांना तयार केला असतो. जो फक्त तुम्हालाच माहिती असतो.

भलेही एखाद्या हॅकरला तुमचे अकाऊंट सापडले, तरी सुद्धा तो वेरीफिकेशन प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय तुमचे मेसेज आणि चॅट वाचू शकणार नाही.

 

WhatsApp

 

फिंगरप्रिंट एक्टिवेट करा.

WhatsApp वापरकर्त्यांना आयफोन मध्ये फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी सोबत लॉक करण्याचा ऑप्शन दिला गेला आहे.
एंड्रॉइड यूजर्स WhatsApp की सेटिंग्स> अकाउंट्स> प्राइवेसीमध्ये जाऊन सर्वांत शेवटी फिंगरप्रिंट अनलॉकचा ऑप्शन दिला गेला आहे.

त्या ऑप्शनला चालू केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता कि ,किती वेळासाठी तुम्हाला WhatsApp लॉक करायचे आहे?
अश्याच स्टेप फोलो करून आयफोन वापरकर्ते फेस आयडी अनलॉकचा सुद्धा उपयोग करू शकतात.

 

स्कैम्स मध्ये फसू नका..

शेवटचा आणि सर्वांत महत्वाचा नियम आहे तो म्हणजे WhatsApp वर पसरलेल्या दुसऱ्या ग्रुपच्या लिंक.
जे लोक दुसऱ्यांनी फोरवर्ड केलेल्या लिंकद्वारे एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी होतात. त्यांच्यासाठी हे फार महत्वाचे आहे.
चुकुनही अश्या ग्रुपलिंक वर क्लिक करू नका त्यातील काही लिंक “स्पाईवेअर” सुद्धा असू शकतात. ज्याचा वापर तुमच्या मोबाईल मधून माहिती चोरण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

तसचं दुसऱ्या देशातील अथवा भारतातीलच पण ओळखीच्या नसलेल्या नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यागोदर त्याविषयची सर्व माहिती नक्की चेक करा. कोणत्याही पाठवल्या गेलेल्या फाईल डाऊनलोड करू नका. तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये जोडू शकू नये  यासाठी सेटिंग> Account > Privacy > Groups वर जाऊन nobody वर क्लिक करा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here