आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
==
नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. २०२१ हे वर्ष आतापर्यंत सर्वच राशींच्या लोकांसाठी काही खास असे गेले नाही.
कोरोना काळातील अडचणी असो अथवा अन्य कारणे जास्तीत जास्त लोकांनी २०२१ मध्ये आतापर्यत परेशानीचा सामना केला आहे. परंतु आता हळू हळू वेळ या सगळ्यातून सावण्याची आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीलाच ज्योतिषशास्त्रनुसार काही राशींसाठी अपार यश आणि धनलाभ योग सांगितले आहेत.
ज्योतिष शाश्त्रानुसार मेष, कर्क, कन्या, तुळ आणि मीन या राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर खूप खास असा महिना राहणार आहे.
मेष.
या महिन्यात शुक्र,बृहस्पती,बुध आणि सूर्य आपले स्थान बदलणार आहेत. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी हा महिना नवीन दिशेकडे घेऊन जाणारा असेल आर्थिक जीवनात सुद्धा याचे परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला व्यवसायात खूप मोठा मुनाफा होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला असणारा आहे.
आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीतील लोकांना थोडी काळजी घ्यायची गरज आहे. महत्वाच म्हणजे वडिलांसोबत असलेले गैरसमज-भांडण या महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत नोव्हेंबर हा मेष राशींच्या लोकांसाठी २०२१ मधील सर्वांत चांगला असा महिना असणारा आहे.
कर्क
कर्क राशींच्या कारभारी लोकांसाठी हा महिना चांगला असणारा आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा या महिन्यात मानाचे स्थान असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व समस्या सुटण्याचा योग या महिन्यात कर्क राशींच्या लोकांसाठी आहे. पारिवारिक जीवनात तुम्हाला थोडे सचेत राहावे लागणार आहे. शिवाय प्रेमात पडलेल्या युवक-युवतींसाठी हा महिना चांगल्या पद्धतीने जाणारा असेल.
कन्या.
कन्या राशीच्या लोकांसाठी २०२१ आतापर्यंत तेवढा चांगला असा गेलेला नाहीये. परंतु नोव्हेंबर मध्ये यांना थोडासा दिलासा मिळण्याचे योग आहेत.या राशींच्या लोकांना आपले करियर करताना या महिन्यात अधिक मेहनत करावी लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात परिस्थिती अधिक मजबूत होईल.
परिवाराच्या दृष्टीने केलेल्या चांगल्या कामाची पावती या महिन्यात प्राप्त होईल. आपले बोलणे आणि पैसा या दृष्टीने तुमच्या आयुष्यात हा महिना खूप महत्वाचा असणारा आहे. त्यामुळे पैसा आणि वचन देतांना नक्की विचार करा. शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपल्याला खूप मोठे बदल घडताना दिसून येणार आहेत.
मीन.
२०२० या राशिंसाठी सुद्धा आतापर्यंत विशेष असा राहिलेला नाहीये. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना सुद्धा तेवढा खास असा असणारा नाहीये. तसे असले तरी व्यावसाईक लोकांसाठी मात्र व्यवसायात मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत.
आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचे संकेत या महिन्यात व्यावसायीकांसाठी आहेत कर्जाच्या ओझ्यातून थोडी सुटका मिळेल. या महिन्यात जीवनसाथीदारांसोबत थोडे भांडण-तंटा होण्याचे योग आहेत. प्रेम आणि नातेवाइकांमध्ये चांगले संबंध राहतील. महत्वाच म्हणजे या महिन्यात मीन राशींच्या लोकांसाठी नवीन वाहन खरेदी करण्याचा मोठा योग आहे.
तूळ.
करियरच्या दृष्टीने हा महिना तूळ राशींच्या लोकांसाठी महत्वाचा असणारा आहे. व्यावसायिक लोकांना मागील अडकलेले पैसे, बाकी वसूल होऊन आर्थिक अडचण दूर होईल. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. शिवाय या महिन्यात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कर्जाचे ओझे कमी होईल. पारिवारिक जीवनात आईसोबत मिळून चांगले निर्णय घ्याल. जीवनसाथीसोबत नात्यात गोडवा निर्माण होणार असेल .
या राशिंसाठी असतील साधारण योग..
वृश्चिक.
या महिन्यात कामाच्या ठिकाणी वृश्चिक राशींच्या लोकांना समस्यांना सामोरे जावावे लागेल. समस्यांनपासून सुटकारा मिळवण्यासठी तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वास जागवावा लागेल. पैस्याच्या बाबतीत सुद्धा वृश्चिक राशींच्या लोकांसाठी थोडा अवघड असा महिना असणार आहे. पैसे येतील जरूर परंतु अनावश्यक खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पारिवारिक जीवनात मात्र सुख-समाधान मिळेल परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळेल.
धनु .
या राशींच्या जवळपास सर्वच लोकांना मुख्यतः महिलांना नोकरी आणि व्यवसायात अडचणींना सामोरे जावावे लागणार आहे. आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. पारिवारिक जीवनाट बोलायचं झाल तर आरोग्याशी निगडीत समस्या असू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात सामान्यपणेच असतील.करियर क्षेत्रात चांगल्या परिणामांसाठी संघर्ष करावा लागेल.
धनु आणि वृश्चिक रासिप्रमानेच अन्य राहिलेल्या राशींच्या लोकांसाठी सुद्धा नोव्हेंबर हा फार विशेष असा जाणारा नाहीये.चांगल्या परिणामांसाठी अपार मेहनत व संघर्ष करावा लागणार आहे.
परंतु मेष, कर्क, कन्या, तुळ आणि मीन या ५ राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर खूप खास असा महिना राहणार आहे.आणि २०२१ मधील आतापर्यंतच्या ज्या समस्या होत्या त्यापासून या ५ राशींच्या लोकांना सुटकारा मिळण्याचे योग आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
-
या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले…!