आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या तरुण संशोधकाने तयार केलेल्या पवनचक्कीमुळे भारतीय जवानांना होतोय फायदा!

 

भारतात टॅलेंटची कुठलीच कमतरता नाही हे आपल्याला माहिती आहे. भारतात जगातील सर्वात सुपीक मेंदूचा निवास असल्याचे मागे एका अमेरिकन उद्योगपतीने म्हटले होते, त्याचे म्हणणे सत्य सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी भारतात घडत असतात. नुकतच गुजरातमधल्या एका तरुण संशोधकाने एक असे संशोधन केले आहे, ज्याद्वारे भारतीय सैन्याला मोठी मदत होणार आहे.

 

आपल्याला माहिती आहे की भारत आणि चीन सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती आहे. जुलै महिन्यात झालेल्या चकमकीनंतर आता भारत आणि चीन दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांच्या असंख्य तुकड्या सीमारेषेवर उभ्या केल्या आहेत. भारताने मोठ्या प्रमाणात सैन्याला पुरेल अशी रसद सीमा रेषेवर पोहचवली असून आता लडाखमध्ये हिवाळ्याने चाहूल देण्यास सुरुवात झाली आहे.

संशोधक

लडाखमधील हिवाळा हा फार भीषण स्वरूपाचा असतो, यावेळी तापमान ऋण ४० अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरते, अशावेळी सीमेवर गस्त घालणाऱ्या जवनांसाठी मोठी समस्या निर्माण होते, यासाठीच भारतात लडाखमध्ये सैन्याला पुरेल इतकी रसद उपलब्ध करून देण्यात येत असते. लडाखमधील या भीषण पर्यावरणात गस्त घालणाऱ्या जवानांना वीज पुरवठ्याची समस्या देखील हिवाळ्यात निर्माण होते.

 

परंतु आता या समस्येवर समाधान मिळाले आहे, लडाखमध्ये हजारो फूट उंचीवर ऋण ४० अंश सेल्सियस तापमानात भारतीय सैन्याला विजेचे उत्पादन करणे सहज शक्य आहे. गुजरातमधील एका इंजिनिअर ने केलेल्या पवनचक्कीच्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. गुजरातच्या आनंद नगर जिल्ह्यातील वल्लभविद्यानगरचे रहिवाशी असलेल्या हर्षवर्धन झा यांनी या स्वदेशी पवनचक्कीची निर्मिती केली असून ही पवनचक्की ऋण ४० अंश सेल्सियस आणि पावसाळ्यात देखील वीज निर्मिती करू शकणार आहे.

 

ही भारतीय बनावटीची पहिली पवनचक्की असून याच्या मदतीने भारताच्या सर्वेक्षण उपकरणाला वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. याचा उपयोग दिवाबत्ती आणि अन्न शिजवण्यासाठीच्या उपकरणांना वीजपुरवठा करण्यासाठी देखील केला जाणार आहे. या पवनचक्कीची निर्मिती करणारे हर्षवर्धन झा हे वल्लभविद्यानगर येथे रिन्यूएबल एनर्जीच्या क्षेत्रात पीएचडी करत असून भारतीय सैन्याला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी या नव्या पवनचक्कीची निर्मिती केली आहे. यामुळे ऋण ४० अंशात वीजनिर्मिती आता शक्य झाली आहे.

संशोधक

ऋण तापमान आणि हिम वर्षावात विजेचे उत्पादन करणारी ही एकमेव पवनचक्की आहे. एका सैन्य पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही पवनचक्की आर्मीच्या कॅम्पमध्ये स्थापित करण्यात आली आहे. गुजरात अणि राजस्थानच्य तटिय प्रदेशात मोठ्या प्रमाणवर पवनचक्क्या आढळून येतात पण डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशात हे एक मोठे कठीण कार्य आहे. बर्फाळ प्रदेशात असलेल्या प्रचंड बर्फामुळे पवनचक्कीच्या गतीवर परिणाम होत असतो, शिवाय हवेचा वेग देखील अशा भागात मंद स्वरूपाचा असतो त्यातल्या त्यात लेह लडाखमध्ये जिथे हिमालय आणि बर्फाचे साम्राज्य आहे, तिथे परिस्थिती अजून बिकट आहे.

 

हर्षवर्धन झा म्हणतात की त्यांनी त्यांच्या पित्याचा मार्गदर्शनात या पवनचक्कीची निर्मिती केली असून त्यांचे पिता देखील एक संधोधक आहे.

दोन्ही पिता पुत्रांनी एकत्रितपणे या पवनचक्कीची निर्मिती केली आहे. अशा प्रकारच्या त्यांनी अनेक पवनचक्क्या त्यांनी निर्माण केल्या असून गांधीनगरमधल्या महात्मा मंदिरातील प्रसिद्ध पवनचक्कीची निर्मिती त्यांनी केली आहे. हर्षवर्धन झा म्हणतात बर्फाळ प्रदेशात चालणाऱ्या पवनचक्कीच्या निर्मिती नंतर त्यांनी एक मोठं यश त्यांच्या हाती लागलं आहे.

 

हर्षवर्धन झा आणि त्यांच्यासारख्या संशोधकांमुळे आज भारतीय सैन्याला प्रतिकूल काळात मोठी मदत होत असून, नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला तर भारतीय सैन्याला अजून प्राबल्य मिळणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here