आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

या २ विद्यार्थिनीने बनवलाय, रोडरोमियोपासून मुलींची सुरक्षा करणारा स्मार्टचाकू…

 

देशामध्ये एकाबाजूला महिला व मुलींवर वाढत्या अत्याचारामुळे महिला सुरक्षित नाहीयेत. दररोज देशाच्या कोणत्या णा कोणत्या कोपऱ्यातून बलात्कार व छेडचाढच्या घटना पाहायला मिळत आहेत.महिलांवर होणाऱ्या या वाढत्या घटनांवर आळा घालायला मदत होईल असं “स्मार्टकाम” वाराणशीच्या २ विद्यार्थिनींनी केले आहे.

पाहूया नक्की काय केले आहे यांनी..

स्मार्टचाकू.

वाराणशीच्या अशोका इन्स्टिटयूट ऑफ कम्प्युटर & सायन्सच्या दोन विद्यार्थिनींनी मिळून  टेकनॉलॉजीचा वापर करून एक स्मार्ट चाकू बनवला आहे. या चाकूच्या वापराने मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि छेडछाडीच्या घटना कमी होणार असल्याचा दावा या विद्यार्थीनीनी केला आहे.  वाराणशी मधील अशोका इन्स्टिटयूट ऑफ कम्प्युटर सायन्स मध्ये शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनी शालिनी आणि दिक्षा यांनी हा अनोखा “स्मार्टचाकू ” बनवला आहे.

असा वाचवेल स्मार्ट चाकू मुलींना.

 

शालिनी आणि दिक्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चाकू सामान्य चाकूपेक्षा खूप वेगळा आहे.  या स्मार्टचाकूमध्ये एक सिमकार्ड सुद्धा लावण्यात आलेले आहे. ज्याच्या मदतीने संकटात सापडलेली मुलगी अथवा महिला आपलं संरक्षण करू शकतात.

स्मार्ट चाकू मध्ये लावल्या गेलेल्या सिमकार्डमध्ये  सेव केलेल्या फीड नंबरवर जेव्हा मुलगी संकटात असेल तेव्हा चाकूवर असलेल्या छोट्याश्या बटणाचा वापर करून मुलगी जवळच्या पोलीस स्टेशन आणि अन्य बचाव यंत्रणाना फोन करू शकतात.

फीड मधील सेव असलेल्या नंबरवर ताबडतोब मुलींचे रिअल टाईम लोकेशन लगेच शेर केले जाते.  त्यामुळे काही मिनिटाच्या आतच पोलिसांना मुलगी कुठे संकटात सापडली आहे याची माहिती मिळणार आहे. लोकेशन मिळाल्यामुळे शक्य तेवढ्या लवकर पोलीस मदत करण्यास त्या ठिकाणी पोहचतील. आणि महिलांवर होणाऱ्या घटना थांबू लागतील.
या चाकूच्या शोधामुळे या 2 विद्यार्थिनींचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

 

 स्मार्टचाकू

महत्वाच म्हणजे स्मार्ट असलेल्या या चाकूच्या वापरामुळे महिलांना सुद्धा सुरक्षिततेची जान होईल. चाकू असल्यामुळे वेळ पडल्यास आत्मरक्षासाठी सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो.

चाकू बनवणाऱ्या शालिनी आणि दिक्षा यांनी पुढे सांगितले की, हा चाकू रेडिओ फ्रिक्वन्सी आणि वायरलेस ब्लुटूथ द्वारे काम करतो. चाकूच्या एका कोपऱ्यावर छोटस एक बटण आहे जे रेडिओ फ्रिक्वन्सी द्वारे मोबाईलशी जोडलेले असेल.
धोक्याच्या वेळी हे बटन दाबताच याट सेव केलेल्या नंबरवरती विद्यार्थीनीचे लोकेशन आणि कॉल सेंड होईल.

या स्मार्टचाकूचे वजन जवळपास 70ग्राम आहे.आणि हा चाकू बनवण्यासाठी या विद्यार्थिनींना लगभग 2 महिन्याचा कालावधी लागला आहे. चाकू फक्त 1500 रुपये खर्चात बनला आहे.हा स्मार्टचाकू बनवण्यासाठी शालिनी आणि दिक्षा या 2 विद्यार्थिनींनी अशोका इन्स्टिटयूट ऑफ कम्प्युटर सायन्सचे इंचार्ज शाम चौरसिया यांनी मार्गदर्शन आणि मदत केली आहे.

या चाकू मुळे निश्चितच महिला आणि मुलींना आपल्या सुरक्षेसाठी एक नवीन पर्याय मिळाला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here