आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांना रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे मोठ नुकसान झाले आहे.
जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे आता ९ व्या स्थानी घसरले आहेत.

मुकेश अंबानींची श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण.

 

रिलायंसच्या शेअर घसरणीचा परिणाम मुकेश अंबांनींच्या संपत्तीवरही झाला असून त्यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत चार स्थानाने घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे आणि ती आता 71 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर यादीत मुकेश अंबानी याआधी 6 व्या क्रमांकावर होते.

आता त्यांची 9 व्या स्थानावर घसरण झाली आहे. संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आता गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या खाली ढकलले गेले आहेत. या वर्षी जुलैमध्ये मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचले होते.

मुकेश अंबानी

मबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या अहवालानुसार मुकेश अंबानींची संपत्ती आता 71 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे.
सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे रीलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदाराना तब्बल एक लाख कोटींचा फटका बसला आहे. रिलायन्सच्या शेअरच्या भावातजबरदस्त घसरण झाल्यामुळे शेअरचे भाव १८९० रुपया पर्यंत घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीची एकूण संपत्तीची किंमत शुक्रवार पर्यंत १३,८९,१५९.२०कोटी रुपये इतकी होती.
पण या घसरणीमुळे हि आता तब्बल १.१२ लाख कोटीनी कमी झाली आहे.रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या प्रमोटर्सचा हिस्सा ५०.४९ % एवढा आहे. त्यामुळे त्यांच्या संपतीमध्येसुद्धा आता जवळपास ५५ हजार कोटींची घसरण झाली आहे.

Reliance Industries Shares Fall 1.4% After Reporting Record Profit in Q3

रिलायन्सच्या शेअरमध्ये अचानक ८.६२ % एवढी घट नोंदवली गेल्यामुळे त्यांच्या शेअरचे भाव १८७७ पर्यंत येऊन टेकले.
शुक्रवारी कंपनीने सप्टेंबरच्या तिमाही परिणाम सदर केले ज्यामध्ये कंपनीच्या प्रोफिट मध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचाच परिणाम कंपनीच्या शेअर वर झाला आणि त्यात मोठी घसरण झाली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here