आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

“फटाका-मुक्त दिवाळी”

दीवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमधील प्रदूषणाचा स्तर वाढू नये, आणि प्रदूषणामुळे कोरोना महामारी वापस जास्त पसरू नये त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी फटाके खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. दिल्लीमध्ये तर एकीकडे कोरोना संपत नाहीये आणि दुसरीकडे सरकार आणि न्यायालय प्रदूषण कसे विळख्यात आणावे यासाठी चिंतीत आहेत.

या संदर्भात,काही दिवसांपूर्वीच सरकारने आपल्या अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दिल्लीमध्ये तर अगोदरच फटाक्यांवर बंदी घातलेली आहे दिल्लीप्रमाणेच आता एकेक करून अनेक राज्यांनी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

"फटाका-मुक्त दिवाळी"
“फटाका-मुक्त दिवाळी”
या राज्यांमध्ये  फटाक्यांवर बंदी घातली आहे:

महाराष्ट्र

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत . यावेळी सरकारने महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना फटाके न फोडण्याची विनंती केली आहे. परंतु बृहन्मुंबई नगर निगम या नागरी संस्थेने शहरातील सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. तसेच,

आदेशांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास दंड आकारला जाईल, असेही बीएमसीने म्हटले आहे.

"फटाका-मुक्त दिवाळी"
“फटाका-मुक्त दिवाळी”

कर्नाटक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दिवाळीचा सण आणि देशभर पसरलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की चर्चा झाल्यानंतर आम्ही ठरविले आहे की दीपावलीवर फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली जाईल. कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल

कलकत्तामध्ये दीपावलीचा सण मोठ्या थाटामाट्याने साजरा केला जातो, परंतु यावर्षी या शहराची दिवाळी हि फटाक्यांनविना साजरी होणार आहे. कारण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कलकत्ता उच्च न्यायालयाने दिवाळी, कालीपूजा, जगधत्री पूजा आणि छठ पूजाच्या निमित्ताने फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

राजस्थान

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोमवारी ट्वीट केले की, कोविड १९ रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तसेच फटाक्यांमधून निघणार्‍या विषारी धूरांपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी घालण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला आहे. त्यावेळी ते म्हणाले कि, राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन न  करणाऱ्या व्यक्तीकडून 2000 रुपये दंड आकारला जाईल.

"फटाका-मुक्त दिवाळी"
“फटाका-मुक्त दिवाळी”

सिक्किम

सिक्किम सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गाचे वाढते प्रकरण लक्षात घेता फटाके खरेदी करण्याबरोबरच फटाके फोडण्यासही बंदी घातली आहे.

फटाके कामगारांवर उपासमारीची वेळ:

एकीकडे आरोग्याच्या दृष्टीकोनाने हा निर्णय योग्य वाटतो परंतु फटाके बनवणार्यांपासून त्यांच्या विक्रेत्यांवर याचा काय परिणाम पडेल हेही खूप महत्वाचे आहे.

"फटाका-मुक्त दिवाळी"
“फटाका-मुक्त दिवाळी”

दिल्लीमध्ये तर फटाका विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर प्रदर्शनेही केली आहेत. काही दुकानदारांच्या मते सरकारने प्रथम ग्रीन क्रैकर्सची परवानगी दिलेली होती त्यामुळे त्यांनी लाखो रुपयांचा स्टोक खरेदी करून ठेवला आहे, आता त्याची भरपाई कशी होणार हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

काही दुकानदारांच्या मते त्यांच्याकडे १५-२० कामगार काम करतात लॉकडाऊन नंतर हे लोक कामाला आले आहेत आता हि बंदी म्हणाल्यावर त्यांनी घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here