आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

इमरान खान सरकारमुळेच पाकिस्तानात सर्वत्र अशांतता?

गिलगिट-बाल्टिस्तान मध्ये १५ नोव्हेंबर रोजी निवडणुका घेण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वी मतांची धांदली केली जात असून, लोकांनी त्यांच्या मतांचे रक्षण केले पहिले, तसेच त्यांना चोरी होण्यापासून वाचवले पाहिजे, असा आरोप मरियम नवाज यांनी केला आहे.

 

इमरान खान
इमरान खान- मरियम नवाज

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन ) च्या उपाध्यक्षा आणि नवाज शरीफ यांची कन्या, मरियम नवाज शरीफ यांनी इमरान खान यांच्यावर तंज कसत म्हटले आहे की पंतप्रधान

इमरान खान हे त्यांचे राजनैतिक कारकिर्दीचे शेवटचे दिवस मोजत आहेत आणि त्यांचे ‘बनावट सरकार’ लवकरच संपणार आहे.

 

चिलास येथील निवडणुकीच्या मेळाव्याला संबोधित करताना मरियम म्हणाली की आता पाकिस्तानची जनता त्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. ‘बनावट राज्यकर्त्यांचे दिवस आता पूर्ण झाले असून त्यांना सर्वात मोठा धक्का १५नोव्हेंबरला बसणार आहे.

निवडणुका होण्यापूर्वीच मतांची हेराफेरी होण्याची शक्यता: मरियम नवाज

 

इमरान खान
इमरान खान- मरियम नवाज

निवडणुकीच्या धामधुमीत गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकांना संबोधित करताना पीएमएल-एन चे उपाध्यक्ष मरियम नवाज म्हणाल्या की, “गिलगिट-बाल्टिस्तानचे लोक हिमालयातील पर्वतांइतकेच बलवान आहेत आणि इथल्या लोकांनी नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे.” आणि यामुळेच इमरान सरकारचे काळे दिवस आता संपुष्टात येणार आहेत.

इमरान खान सरकारने पाकिस्तानात सर्वत्र अशांतता पसरवली आहे.

निवडणूक सभेला संबोधित करताना मरियम यांनी आश्वासन दिले की जर त्यांचा पक्ष गिलगिट-बाल्टिस्तानमधून जिंकला तर प्रदेशातून जाणारे विकास प्रकल्प आणि रस्ते पुन्हा तयार केले जातील आणि याचा फायदा येथील जनतेला होईल.

इमरान खान
इमरान खान- मरियम नवाज

पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री जाणीवपूर्वक अशांतता पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री हाफिज हाफिजुर रहमान यांनी केला आहे. तसेच येथे होणाऱ्या निवडणुकांमध्ये गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याप्रकरणी निकाल देताना कोर्टाने मंत्री आणि पाक सरकारच्या अधिकार्यांना तीन दिवसांच्या आत गिलगिट-बाल्टिस्तान सोडून जाण्याचे आदेशही दिले आहेत. कारण या अधिकाऱ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एका प्रकारे इमरान खान सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे या प्रकरणावरून समजले जाऊ शकते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here