आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
==
बिहार निवडणूकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे, या निवडणूकीत २४३ जागांसाठी तीन टप्यात मतदान झाले. आज मतमोजणी होणार होती म्हणून सर्व प्रसार माध्यमांमध्ये या विषयीच्या बातम्यांनी धुमाकूळ केला आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांसारख्या नेत्यांसह ३७३३ उमेदवारांचा फैसला आज होणार आहे.
कोरोना महामारीनंतरची हि सर्वात मोठी निवडणूक आहे. बिहारमध्ये मतमोजणीसाठी ३८ जिल्ह्यांमध्ये ५५ मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार परत सत्तेत येणार कि त्यांना तेजस्वी पछाड देणार हे सर्व आज स्पष्ठ होणार आहे. बिहार मध्ये सुरुवातीपासून भाजप-जेडीयू हि युती आघाडीवर आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादवचा दबदबा राहून महागठबंधनला बहुमत मिळेल असा दावा सर्वच प्रसार माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता.
जेंव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेंव्हा हेच चित्र दिसत होते परंतु १० वाजेनंतर दुपारी २.३० वाजेपर्यंत नितीश कुमारच्या एनडीए ने आघाडी कायम ठेवली आहे.
नितीश कुमार यांच्या दमदार नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने आता मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आता बदलत असलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे.

यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.
हि निवडणूक जाहीर झाली तेंव्हापासूनच शिवसेनेने मोठा गाजावाजा करत बिहारमध्ये आपणही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. आता मात्र चित्र याउलट दिसत आहेत, शिवसेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव होणार असे स्पष्ठ दिसत आहे.
बिहारमध्ये सत्ताधारी असलेल्या जेडीयू पक्षाने शिवसेनेच्या “धनुष्यबाण” या चिन्हाला आक्षेप घेतल्याने, शिवसेनेने उपलब्ध असेल त्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती.

बिहार निवडणुकीत एवढी तयारी असूनही शिवसेनेची कामगिरी समाधानकारक दिसत नाहीये. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होतील असे चित्र सध्या दिसत आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार शिवसेना लढवत असलेल्या २३ पैकी २१ जागांवर तर शिवसेनेला “नोटा” पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
शिवसेनेने प्रथम ५० उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात २३ जागांवर निवडणूक लढवली आहे. शिवसेनेने कितपत तयारी करून बिहार निवडणूक लढवली हे या निकालावरून समोर येत आहे.
विजयाचा विक्रम होवो किंवा नाही परंतु नोटा पेक्षाही कमी मते मिळवण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. या निवडणुकीचा निकाल संध्याकाळी उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
- ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!
- मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!
- या कारणामुळे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकालेश्वर पडले