आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

दिवाळी हा भारताचा सर्वात मोठा आणि आकर्षक सन आहे. दिवाळीची रात्र हि अमावशेची रात्र असते त्यामुळे सर्व लोकं आपापल्या घरासमोर दिवे पेटवतात जेणेकरून त्या दिव्यांच्या प्रकाशाने सर्व जगात असणारा अंधकार सदासर्वदा साठी दूर व्हावा.

दिवाळी हा एक महत्वाचा सन आहे जो अतिशय विनम्रतापूर्ण साजरा केला जातो, परंतु आजकाल या दिवसाला अनेक लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने साजरा करत आहेत ज्यामुळे खूप घाण पसरवल्या जाते आणि वातावरण प्रदूषित होते. आज आपण या लेखामध्ये जाणून घेवूया दिवाळी हि योग्यरित्या कशी साजरी करावी.

सर्वप्रथम आपन हे जाणून घेवूया कि, आपण दिवाळी नेमकी कशासाठी साजरी करतो?

 

सुरक्षित दिवाळी साजरी करताना ...
सुरक्षित दिवाळी साजरी करताना …

दिवाळी का साजरी करावी?

पौराणिक मान्यतेनुसार, जेंव्हा राजा दशरथ पुत्र प्रभू श्रीराम यांनी पापी रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या कैदेतून सोडून आणले आणि चौदा वर्षानंतर वनवासावरून अयोध्या नगरीत परतले, त्यावेळी अयोध्या निवाशी आपल्या प्रिय राजा श्रीराम यांच्या आगमनाने हर्षित होवून सर्व नगर वाशियांनी अयोध्येमध्ये दिवे पेटवले होते. म्हणूनच दरवर्षी कार्तिक अमावशेला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी का साजरी करतात हे आपण जाणून घेतले आहे आता जाणून घेवूया

दिवाळी कशी साजरी करावी?

आता आपल्या सर्वांना वाटत असेल कि सर्वांनाच माहित आहे दिवाळी कशी साजरी करावी ? परंतु आज आपणास काही महत्वाच्या गोष्ठी सांगणार आहोत ज्यामुळे आपली दिवाळी हि खुशहाल आणि सुरक्षित साजरी होईल.

आपल्या घरातील लहान मुले दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात कारण त्यांना या दिवशी खूप सारे फटाके फोडण्यास मिळतात. लहान मुलांच्या खुशीमुळे आपण पण खुश होतो म्हणूनच आपण त्यांना बाजारातून फटाके खरेदी करून देतो.

सुरक्षित दिवाळी साजरी करताना ...
सुरक्षित दिवाळी साजरी करताना …

लहान मुले तर समजदार नसतात त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे माहित नसते परंतु आपण तर समजदार आहोत त्यामुळे आपली जबाबदारी समजून आपण काळजी घ्यायला पाहिजे. फटक्यांमध्ये अनेक प्रकारचे घातक रसायन असतात
जे लहान मुलांसाठी नुकसानदायक असतात.

फटाके जळल्यानंतर त्यामधून बाहेर पडणारा धुर हवेत मिसळून वातावरण प्रदूषित होते (कोरोना महामारीमध्ये हि मोठी समस्या राहणार आहे ) यामुळे अनेक प्रकारचे विकारही उद्भवतात.

हा विषारी धूर आपल्यासाठीच नव्हे तर निसर्ग आणि जनावरांसाठीही तेवढाच घातक आहे. आपण ख़ुशी जाहीर करतो पण त्याची सजा निष्पाप जनावरांनाही भोगावी लागते. सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे याला सहकार्य करावे. परंतु सोबतच  आपण फटाके अजिबात फोडू नये असे आम्ही अजिबात सांगत नाही,परंतु मोठे आणि कर्कश आवाज करणारे तसेच धूर जास्त पसरवणारे फटाके टाळणेच बरे.

सुरक्षित दिवाळी साजरी करताना ...
सुरक्षित दिवाळी साजरी करताना …

लहान लहान फटाके जसे कि, अनार, चक्कर , सुरसुरी, फुलझाड यांसारखे फटाके वापरावे यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी प्रमाणात होईल. मोठ्या फटक्यांपासून लहान मुलांना दूरच ठेवावे यामुळे त्यांना इजा पोहचू शकते. मोठ्यांनी पण हे फटाके सावधगिरीने फोडावे कारण या फटक्यांमुळे शरीरास इजा होऊ शकते.

आपण पहिले असेल कि फटाके फोडल्यानंतर त्यातून निघणारा कचरा हा रस्त्यावरच सोडला जातो. हि घाण कोण साफ करणार? आपल्यालाच करावी लागणार. आपण आपल्या घरात घाण ठेवत नाही तर मग घराबाहेर का ठेवावी? हा परिसर पण आपलाच आहे आणि याची साफसफाई करण्याची जबाबदारी पण आपल्यालाच घ्यावी लागणार.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त प्रमाणात एकत्र होऊ नये. शक्य असेल तर घराबाहेर पाणी ठेवावे जेणेकरून घरी येणारे सार्वजन हात पाय धुवूनच घरात येतील. सॅनीटायजर हाताला लावून दिवे आणि फटाके जाळू नये हे आपल्यासाठी हानिकारक होऊ शकते.

हे सर्व आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे त्यामुळे आपले कर्तव्य पूर्ण करा, आपली दिवाळी हि नक्कीच सुखमय, मंगलमय, आणि सुरक्षित साजरी होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here