आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

शिवसेना नव्हे हि तर ‘शवसेना’ : अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा “शिवसेनेने बिहारमधील आपल्याच साथीदारांणा ठार मारले” असे सांगत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.

बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केली आहे, म्हणूनच एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. परंतु बिहारमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही आणि त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाली.
यावर कटाक्ष घेत अमृता फडणवीस यांनी हे ट्विट केले आहे.

शिवसेना नव्हे हि तर ‘शवसेना’ : अमृता फडणवीस

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी हे ट्विट केले आहे ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणून संबोधले आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, महाराष्ट्राला कुठेही नेऊन ठेवला असो परंतु बिहारला योग्य ठिकाणी पोहचवल्याबद्दल धन्यवाद.

बिहार निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करत ह्या सर्व गोष्ठी त्यांनी लिहिल्या आहेत आणि सोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीवरही त्यांनी चांगलाच प्रहार केला आहे.

शिवसेना

शिवसेनेला बिहारमध्ये भोपळाही फोडता आला नाही:

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस हे म्हणाले कि, शिवसेनेने ५० ठिकाणी आपले उमेदवार उभे केले परंतु ते भोपळाही फोडू शकले नाही.

शिवसेनेचा समाचार घेत फडणवीस हे म्हणतात कि, “वह अगर औंधे मुंह भी गिरेगी तू बोलेगी कि मेरी उंगली ऊपर है”
शिवसेनेचे सर्व उमेदवारांचे (diposit) पण जप्त झाले आहे. काही ठिकाणी तर त्यांच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपले अस्तित्व गमावले:

याच वेळी फडणवीस म्हणाले की यापूर्वी बिहारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही अस्तित्व होते, पण यावेळी ते संपलेही आहे. बिहारमध्ये स्वतःचे मित्रपक्ष संपवण्याचे काम शिवसेनेने केले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here