आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

PUBG बद्दल लवकरच होणार हा मोठा निर्णय…!

भारत आणि चीन यांच्यातील बिघडत्या संबंधांमुळेभारत सरकारने वापरकर्त्यांच्या डेटाची सुरक्षा व गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त करत अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये लोकप्रिय गेम PUBG मोबाइलचा देखील समावेश आहे.

PUBG या गेमवर चीनी कंपनी Tencent सोबत भागीदारी असल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. PUBG गेम खेळणार्यांची संख्या खूपच होती आता त्यांच्यासाठी एक खुशखबर आली आहे, अर्थातच PUBG मोबाईल हा लोकप्रिय खेळ एका नव्या अवतारात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कंपनी आता बॅटल रॉयल गेमची इंडियाची विशिष्ट आवृत्ती PUBG Mobile India हि भारतात आणणार आहे.

PUBG

PUBG कॉर्पोरेशन भारतात करणार ७५० कोटींची गुंतवणूक:

वास्तविकता PUBG कॉर्पोरेशन साउथ कोरियन कंपनी Kraft on सोबत जुडलेला आहे. याच कंपनीद्वारा Player unknown’s Battlegrounds हा गेम डेवलप करण्यात आला होता. चीनी कंपनी Tencent जवळ केवळ या गेमच्या डिस्ट्रिब्यूशन ची जबाबदारी होती.

PUBG कॉर्पोरेशनच्या वतीने असे सांगण्यात आले आहे, याची मुळ मालकी कंपनी Krafton हि भारतामध्ये ‘लोकल विडियो गेम, ई-स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट आणि IT इंडस्ट्रीज यांना सुधारण्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

PUBG Mobile India या नवीन वर्जन मध्ये नवीन गेमप्ले एक्सपीरियंस:

PUBG

 

या कंपनीने एक स्टेटमेंट देताना म्हटले आहे कि, भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेत PUBG कॉर्पोरेशन रेग्युलर ऑडिट्स आणि वेरिफिकेशंस करत स्टोरेज सिस्टमला अत्याधुनिक करणार ज्यामुळे वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल.

गेमिंग एक्सपीरियंस बद्दल बोलताना PUBG Corporation च्या वतीने सांगण्यात आले आहे कि, या नव्या वर्जनमध्ये वर्चुअल सिमुलेशन ट्रेनिंग ग्राउंड पासुन ते कैरेक्टर्स आणि ग्रीन हिट इफेक्ट्स पाहायला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त इन-गेम टाइमरदेऊन हेल्दी गेमप्ले हैबिट्स यंग प्लेयर्सना देण्याचे वचन पण कंपनीने दिले आहे.

PUBG Mobile India मध्ये स्पेशल एलिमेंट्स आणि मैप्सचा वापर:

या सोबतच इंडिया-एक्सक्लूसिव ई-स्पोर्ट्स इवेंट्स, सर्वात मोठे गेमिंग टूर्नामेंट्स, मोठे प्राइज पूल्स आणि आकर्षक टूर्नामेंट प्रोडक्शंसच्या मदतीने कंपनी परत येणार आहे. PUBG Mobile India च्या वापाशी बद्दलची जास्त माहीती लवकरच समोर येऊ शकते.

भारतामध्ये या गेमचा यूजरबेस करोड़ों गेमर्सचा होता आणि त्यांना परत आपल्यासोबत जोडण्यासाठी PUBG काही भारतीय स्पेसिफिक मैप किंवा स्पेशल गेम एलिमेंट्स सुद्धा अॅड करू शकते.

PUBG कंपनी हि बंदी घातल्यापासून वापसी करण्याच्या प्रतीक्षेतच आहे आणि योग्य वेळी हा गेम लौंच करणार आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here