आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

दिवाळी चालू असल्यामुळे स्वयपाकात पंचपकवान सर्वच घरात सध्या बनत आहेत. फराळाचे असो अथवा आपले रोजचे जेवण दिवाळीच्या काळात स्वयपाक घरात वेगळाच  गर्दा सुरु असतो. जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा साहजिक आहे स्वयपाकघर अस्वच्छ होणारच..

अश्या स्वयपाक घरांना साफ करण्याच एक मोठ आव्हान घरातील स्त्रियांसमोर असते. कारण तेलाचे डाग, मसाल्याचे डाग ,आणि भाजीपाल्याचे तुकडे हे सर्व किचनला खराब करतात.त्यामुळे चांगल्यात चांगले स्वयपाकघर सुद्धा अस्वच्छ बनते.

जर तुमच्यासोबत सुद्धा असचं होत असेल तर घाबरायची काहीही गरज नाहीये. आज आम्ही तुम्हाला तुमचे किचन साफ ठेवण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्हाला या दिवाळीमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. आणि तुमचे स्वयपाकघर एकदम स्वच्छ व निटनेटके राहील.

किचन

सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका..

जेवण बनवल्यानंतर कोणत्याही खरकट्या भांड्यांना जास्त वेळासाठी किचनमधील सिंक मध्ये ठेवू नका.
असं केल्याने त्या भांड्यामध्ये असलेले उरलेले जेवण वाळून त्यामुळे अस्वछता तयार होते. त्यामुळे किचन साफ ठेवण्यासाठी खरकट्या भांड्यांना जास्त काळासाठी बेसिनमध्ये ठेवू नका. शक्य तेवढ्या लवकर त्यांना धुवून टाका.

डब्बे व्यवस्थित लावून ठेवा.

किचन मधील सगळ्या डब्यांना व्यवस्थित करून ठेवा कारण सनासुदिच्या वेळी गोष्टींचा स्टोक केला जातो. ज्यामुळे किचन रोजच्या  पेक्षा जास्त गर्दा असतो. या गोष्टीमुळे किचन मध्ये झुरळ, किडे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रत्येक वस्तूला व्यवस्थित डब्ब्यामध्ये चांगल्या पद्धतीने ठेवा. जेणेकरून तुमचा वेळ आणि वस्तू दोन्हीही वाचतील.

 

किचन
किचन लगेच साफ करा..

जेव्हा आपण काही चांगले आणि स्वादिष्ट जेवण बनवत असतो त्यावेळी साफसफाईकडे थोडंस दुर्लक्ष होतेच.
आणि तुमच्या द्वारे बनवल्या जाणऱ्या रेसेपिचे डाग कधी किचनवट्यावर पडतात हे आपल्याला सुद्धा समजत नाहीये.
त्यामुळे डाग पडू शकतात. त्यासाठी डागांना जमू न देण्यासठी क्लीनर वापरून किचन लगेच साफ करायला पाहिजे.
याशिवाय आपण सिंक, माईक्रोवेवची सुद्धा साफसफाई वेळच्या वेळी करायला हव्या.

 

काही भांड्यांना लगेच धुऊन टाका..

 

साफ आणि स्वच्छ किचन ठेवण्यासाठी नियमित वापरात येणारे भांडे जसे चाकू,चाळणी,आणो तेलतवा
वगैरे लगेच धुवून वेळच्या वेळी साफ ठेवायला पाहिजे.

जेवण वाढण्याचे चमचे असो अथवा ताटात उरलेलं अन्न असो हे चुकुनही बेसिनमध्ये न टाकता त्याला योग्य रित्या
कचऱ्यामध्ये टाका. बेसिनमध्ये अडकलेल्या अश्या गोष्टींमुळे किचनमध्ये झुरळे जास्त प्रमणात वाढले जातात.
शिवाय ओला कचरा आणि सुका कचरा रोजच्या रोज योग्य योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावा.

 

ओला कचरा आणि सुका कचरा जास्त दिवस किचन मध्ये राहिल्यास ते वास मारण्यास सुरवात करते, ज्यामुळे किचनमधील वातावरण अस्वच्छ होऊ लागते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे पण अवश्य वाचा :

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here