आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

व्हाटसअप सर्वांत मोठे सोशल मेसेंजर अप्लिकेशनने आपल्या नवीन अपडेटमध्ये एक मोठी सुविधा दिली  जाणर आहे.
व्हाटसअपच्या या अपडेटमध्ये त्यांनी “डिसैपीयरिंग मैसेज” चे नवीन ऑप्शन आपल्या ग्राहकांसाठी दिले  जाणर आहे.
ज्याचा खूप मोठा फायदा व्हाटसअप वापरकर्त्यांना होणार आहे.

फेसबुक कडे मालकी हक्क असलेले व्हाटसअप सध्या सोशल मिडियावरील नंबर एकचे मेसेंजर आहे. ते फक्त त्याच्यामध्ये करण्यात येणाऱ्या वेळच्या वेळीअपडेट्समुळे. व्हाटसअप प्रत्येक अपडेट मध्ये वापरकर्त्यांसाठी काहीतरी विशेष आणि उपयोगी पडेल असे फिचर देत असतो. त्यामुळेच व्हाटसअपची लोकप्रियता वरचेवर वाढत चालली आहे.

व्हाटसअप

काय आहे नक्की “डिसैपीयरिंग मैसेज” ?

 

“डिसैपीयरिंग मैसेज” हे ऑप्शन जर तुम्ही सेटिंग मधून एनेबल केले तर तुमच्याट आणि इतर मित्रांसोबट अथवा कस्टमरसोबत झालेले ७ दिवसापुर्वीचे  मेसेज ऑटोमाटिक डीलेट केले जातील.

 

व्हाटसअपचे म्हणणे आहे कि,या नवीन अपडेट्समुळे लोकांच्या चॅट प्रायवेट ठेवण्यासाठी त्यांना मोठा फायदा होणार आहे.

व्हाटसअप

 

 

७ दिवसानंतर मेसेज डिलीट झाल्यानंतर समोरचा व्यक्ती तुमचे मेसेज वाचू अथवा पाहू शकणार नाही. अपडेट्सनंतर व्हाटसअपने हे जाहीर केले आहे कि, जर मेसेज ज्यांना मिळाला ते तो मिडिया ७ दिवसाच्या नंतरसुद्धा त्यांच्याजवळ ठेवू इच्छित असला तर त्यांनी त्या मेसेजला ७ दिवस होण्याअगोदर अन्य कोणत्याही नंबरवर फोरवर्ड करावा अथवा स्क्रीनशॉट घ्यावा.

 

म्हणजे जरी तुम्ही डिसैपीयरिंग मैसेज चा पर्याय निवडला असला तरीसुद्धा समोरचा व्यक्ती तो मेसेज फोरवर्ड करून अथवा स्क्रीनशॉट घेऊन ७ दिवसाच्या नंतरसुद्धा तो मेसेज वाचू, पाहू शकतो.

 

“डिसैपीयरिंग मैसेज” चा पर्याय नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत येणार..

 

एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कंपनीने सांगितले आहे कि,मेसेज ७ दिवसानंतर डिलीट होण्याचा पर्याय मिळणार असल्यामुळे लोकांना शांतीमिळेल कि त्यांचे कोणतेही मेसेज ७ दिवसानंतर कोणीही पाहू शकणार नाही.आणि त्यांची कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी अप्सवर राहणार नाहीये. शिवाय तुम्ही फिजिकली एक्तीव्ह राहाल आणि हे विसरणार नाहीत कि कोणत्या विषयावर तुम्ही कधी चॅट केले होते.

व्हाटसअप

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी एप्रिल मधेच वापरकर्त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आणि खात्यांना सुरक्षा देण्यासाठी सोशल नेटवर्कमध्ये अनेक बदल करणार असल्याच सांगितले होते. त्यांच्या या प्रस्तावित बदलांद्वारे वापरकर्त्यांचा पर्सनल डेटा कमीतकमी वेळासाठी सोशल मिडीयावर जमा केला जाणार असल्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. डिसैपीयरिंग मैसेज हा याच निर्णयातील एक भाग आहे जो लवकरच व्हाटसअप वापरकर्त्यांना वापरण्यास मिळणार आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here