आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

भाऊबीज साजरी कारण्यामागचे हे कारण तुम्हाला माहिती असायलाच हवे..

 

हिंदू धर्मात सणांना विशेष असे महत्व आहे.
खास करून दिवाळीमधील या 5 सणांना तर हिंदू संस्कृतीमध्ये विशेष असे महत्वाचे स्थान आहे. दरवर्षी येणाऱ्या बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सणाचा हिंदू संस्कृतीमधील इतिहास. एक अतिशय रंजक असा इतिहास असलेला भाऊबीज हा सन दिवाळीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

भाऊबीज
भाऊबीज

दीपावलीच्या मुख्य सणांपैकी एक असलेला भाऊबीज हा बहिन – भावाच्या प्रेमळ नात्याचा सन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. दिवाळीच्या 5 दिवसातील शेवटचा सन एवढा महत्वपूर्ण का आहे याच्याविषयी आज आम्ही तुम्हाला या लेखामाध्ये सांगणार आहोत.

तसें तर भाऊबीज या सणाविषयी अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. परंतु मुख्य आणि सर्वांत जास्त माहितीपूर्ण असलेल्या कथापैकी 2 कथा जास्त सांगितल्या जातात. यातील एक म्हणजे पौराणिक कथा आणि दुसरी म्हणजे लोककथा.

जाणून घेऊया पौराणिक कथेविषयी..

पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्यांची पत्नी संध्या यांना दोन संतान होत्या. ज्यात मुलाचे नांव यम आणि मुलीचे नांव यमुना असे होते.

मुलांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात सूर्यदेव यांची पत्नी संध्या सूर्यदेवाचे तेज सहन होत नसल्यामुळे आपली छाया मुलांजवळ सोडून तेथून निघून गेली. संध्याची प्रतिकृती असलेल्या छायाच्या मनात त्या मुलांप्रती कोणतेही प्रेम, स्नेह नव्हते. परंतु मुलांमध्ये बहिन भावात खप प्रेम आणि आदर होता.

भाऊबीज
भाऊबीज

लग्नानंतर सुद्धा यमुनाचे आपल्या भावाप्रती प्रेम कधीही कमी झाले नाही. ती प्रत्येक वेळी भावाला भेटण्यासाठी आपल्याकडे बोलवत असे कधी स्वतः जाऊन भाऊ यमाला भेटत असे. यम जास्त व्यस्त असल्यामुळे तो बहिणीला जास्त वेळ देऊ शकत नसे.

एके दिवशी अचानक यम आपल्या बहिणीच्या घरी पोहचला. आपल्या लाडक्या भावाला दरवाज्यावर पाहताच यमुना एकदम खुश झाली. तिने यमाचे आदरातिथ्याने स्वागत केले. बहिणीचे आपल्याप्रति प्रेम पाहून यम खुश झाले आणि त्यांनी बहिणीला काही वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनाने यमाकडे दरवर्षी याच तिथीला न चुकता माझ्या घरी येण्याचा आशीर्वाद मागितला.

यमाने सुद्धा आपल्या बहिनीचे प्रेम पाहून बहिणीला वाचन दिले की तो दरवर्षी न चुकता या दिवशी आपल्या बहिणीकडे येत जाईल. आणि तेव्हापासूनच यम दरवर्षी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी न चुकता जाऊ लागले. ही तिथीच पुढे भाऊबीज म्हणून प्रसिद्ध झाली.यम आणि यशोधा या बहीण भावाच्या प्रेमळ नात्यातून निर्माण झालेला हा सन आजसुद्धा सर्व बहीण-भाऊ मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा करतात.

असंही म्हटलं जाते की, या दिवशी ज्या भावाला बाहिनेने ओवाळले औक्षण केले, त्या भावाचे आयुष्य नक्कीच वाढते.

आता जाणून घेऊया भाऊबीज या सनाबद्दल प्रचलित असलेल्या लोककथेबद्दल…
भाऊबीज
भाऊबीज

 

लोककथेनुसार एक वृद्ध महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी होती.मुलगी ही मुलापेक्षा मोठी होती. बहिणीच्या लग्नाच्या काहीच दिवसानंतर छोट्या भावाने बहिणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आईने म्हटले की तुझ्या बहिणीच्या व्यवहार थोडा अडसर आहे.

ती खुप छोट्या छोट्या गोष्टीमुळे रुसल्या जाते. माझ्या मते तुला आताच तिच्या घरी नको जायला. परंतु मुलाच्या हट्टामुळे शेवटी तिने मुलाला बहिणीकडे जाण्यास परवानगी दिली. जेव्हा भाऊ आपल्या मोठया बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घराकडे निघाला तेव्हा त्याला वाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

 

सर्वांत आधी त्याच्या रस्त्यात एक नदी आली. नदिने म्हटले की मी तुझ्या रस्त्यात तुझा मृत्यू बनून आले आहे. तुला माझ्यामध्ये सामावे लागेल. तेव्हा भावाने म्हटले की मी खुपण दिवसापासून माझ्या बहिणीला भेटलो नाहीये. जेव्हा मी तीला भेटून येईल तेव्हा तुम्ही मला बुडवून टाका. पण कृपा करून मला एकदा माझ्या बहिणीला भेटून येउद्या.

नदीने सोडल्यानंतर समोर त्याचा रस्ता एक सापाने अडवला. साप त्याला म्हटला की मी तुझा मृत्यू बनून आलो आहे. मी तुला आता डसणार आहे. भावाने नदीला सांगितलेलीच गोष्ट परत एकदा सापाला सांगितली आणि मी बहिणीला भेटून वापस येताना तू मला चाव असं सापाला सांगितलं. हे ऐकून सापानेसुद्धा त्याला समोर जाण्यास अनुमती दिली.

काही लांब चालल्यानंतर पुन्हा एकदा एका वाघाने त्याचा रस्ता रोखला. जसे वाघाने त्याच्यावर हल्ला करण्यासाठी समोर आला तसे भावाने पुन्हा तीच विनती वाघापुढेही केली की मला एकदा बहिणीला भेटून येउदे नंतर मी स्वतःहून तुझ्यापूढे स्वतःला समर्पित करेल. त्याची गोष्ट ऐकून वाघानेही त्याला समोर जाण्यास मोकळीक दिली.

भाऊबीज
भाऊबीज

शेवटी अनेक संकटातून निघून भाऊ आपल्या बहिणीच्या घरी एकदाचा पोहचला. तेथे पोहचल्यावर भावाने बाहेरूनच बहिणीला आवाज दिला. जेव्हा तो तेथे पोहचला तेव्हा बहीण चरख्यावर सूत कातत होती. त्याच्या आवाजामुळे सूत तुटले. आणि प्राचीन मान्यतेनुसार जोपर्यंत तुटलेले सूत जोडले जात नाही तोपर्यंत बहीण भावाला बोलू शकत नव्हती. अन्यथा काहीतरी अशुभ घडण्याची शक्यता असते.

त्यामुळे बहिणीने भावाचा आवाज ऐकून सुद्धा त्याला उत्तर दिले नाही. हे पाहून भावाला खूप दुःख झाले. त्याला वाटले की मी निर्धन आहे त्यामुळे माझी बहीण माझ्यासोबत बोलत नाहीये. बहुतेक आई खरंच सांगत होती.मला इकडे यायला नको होते.

असा विचार करून दुःखी मनाने भाऊ वापस जायला निघाला. एवढ्या वेळात बहिणीचे चारख्यवरील सूत जुळले आणि ती पळतच भावाकडे आली. आणि तिने भावाला सांगितले की ती का त्याच्या आवाजाला उत्तर देऊ शकली नाही.

त्यांनतर मोठ्या प्रेमाने बहिणीने भावाला आपल्या घरामध्ये आणले. त्याचं आदराने स्वागत केले. भावाला पंचपकवान बनवून जेऊ घातले. असेच 7/8 दिवस दोघांनी आनंदाने व्यतीत केले. एका दिवशी भावाणे बहिणीला म्हटले की आता मला जायला हवे. आई घरी बरेच दिवस झाले एकटीच आहे. ती माझी वाट पाहत असेल.

भावाने दुसऱ्याच दिवशी निघण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी बहिणीने सकाळीच उठून त्याच्यासाठी लड्डू बनवले. आणि जसा भाऊ जायला निघाला तसें तिने ते लड्डू भावाच्या पिशवीत टाकले. त्यातील काही लड्डू हे तिने आपल्या मुलांसाठी सुद्धा ठेवून घेतले.

जेव्हा भाऊ गेल्यानंतर तिने ते ठेवलेले लड्डू आपल्या मुलाना देण्यासाठी काढले तर बघितले की लड्डूचा कलर हिरवा पडला आहे. बहिणीने लड्डूसाठी दळलेल्या जात्याकडे जाऊन पहिल्यानंतर तीला कळाले की लड्डूसाठी केलेल्या पिठामध्ये जात्यात साप सुद्धा दळल्या गेला होता.

हे पाहुन ती खूप घाबरली. तिने विचार केला की जर हे लड्डू तिच्या भावाने आणि आईने खाल्ले तर त्यांचं काही बरेवाईट व्हायचं. लगेच ती भावाला शोधत निघाली. खुप शोधल्यानंतर तीला रस्तात तिचा भाऊ एका झाडाखाली विश्राम करताना दिसून आला.

भाऊबीज
भाऊबीज

तिने भावाला गरबडीत विचारले की जे लड्डू मी तुला सोबत दिले होते ते कोठे आहेत? तेव्हा भावाने ते लाडु तीला दिले आणि बहिणीने ते सर्व लड्डू जमिनीत पुरले. आणि भावाला सर्व गोष्ट सांगितली.

तेव्हा भावाने बहिणीला म्हटले की तू यावेळी तर मला मृत्यूपासून वाचवलेस. परंतु मी येताना अनेक जणांना मृत्यूचार वाचन देऊन आलो आहे. हे ऐकून बहीण विचारात पडली.  तेवढ्यात तीला तहान लागली आणि तिने भावाला म्हटले की तू येथेच थांब मी पाणी पिऊन आलेच.

जेव्हा ती पाणी पिण्यासाठी नदीकडे आली तेव्हा तीला नदीच्या काठावर एक वृद्ध महिला बसलेली दिसली. तिने त्या महिलेला विचारले की, तुम्ही येथे एकट्या का बसल्या आहेत?

तेव्हा त्या वृद्ध महिलेने सांगितले की मी नदी आहे आणि एका बहिणीच्या भावाची वाट पाहत आहे! बहिणीने त्या वृद्ध महिलेला पुन्हा विचारले की, कोण आहे तो भाऊ ज्याची तुम्ही एवढ्या दिवसापासून वाट पाहत आहात?

तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली की तो भाऊ ज्याच्या बहिणीने आपल्या प्रेमापोटी एका सापाची हत्या केली. हे ऐकून बहीण समजून गेली की ही महिला माझ्याच भावाबद्दल बोलत आहे.

बहिणीने त्या वृद्ध महिलेला विचारले की त्या बहिणीने आपल्या भावाला वाचवण्यासाठी काय करायला हवे? तेव्हा त्या म्हाताऱ्या महिलेने सांगितले की जर ती बहीण आपल्या भावाला शिव्या देईल आणि जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं रक्षण करेल तर त्या भावाचं आयुष्य नक्कीच संरक्षित राहील.

हे ऐकून बहीण नदीचे पाणी पिऊन भावाकडे निघून गेली. आणि तिने भावाला संगीतले की मी तुला सोडण्यासाठी स्वतः घरापर्यंत येईल. मी बस थोड्याच वेळात वापस येते तोपर्यंत तू येथेच माझी वाट बघत बस.

बहीण घरी जाऊन वाघासाठी मांस, नदीसाठी ओढणी आणि सापासाठी दूध सोबत घेऊन आली आणि भावाला घेऊन घराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. रस्त्यात वाघ भेटल्यानंतर वाघाने भावावर हल्ला करण्याच्या अगोदरच तिने मासाचा तुकडा वाघापुढे टाकला. वाघ मांस खात बसला आणि ती भावाला घेऊन पुढे निघून गेली.

पुढे गेल्यानंतर त्यांना साप भेटला. जसे साप भावाला चावण्यासाठी समोर आला तसें बाहिनिने दूध सापापुढे ठेवले. असंच पुढे जाऊन नदीला बहीण ओढणी अर्पण करते ज्यामुळे नदी प्रसन्न होऊन त्यांना जाऊ देते.

जसेही बहीण भाऊ घरी पोहचतात. तसें बहीण भावला शिव्या घालण्यास सुरवात करते. आईने हे पाहून रागात भावाला म्हटले की तू हिला का सोबत घेऊन आला आहेस? भावाने सांगीतल की बहिन तर येईपर्यंत खूप चांगले व्यवहार करत होती पण आता अचानक असे काय झाले की ही मला शिव्या द्यायला लागली.

तिने सर्व हकिकत आईला सांगितली आणि लवकरात लवकर भावाचे लग्न लावण्यास सांगितले. काही दिवसातच भावाचे लग्नही झाले आणि त्याच्यावरील सर्व संकटसुद्धा दूर झाले. बहिणीने आपल्या भावाचे प्राण वाचवन्यासाठी केलेली एवढी खटाटोप पाहून सर्वांना तिचा अभिमान वाटू लागला आणि तेव्हापासून त्या दिवशी प्रत्येक बहीणभाऊ या दिवसाला भाऊबीज
साजरी करतात आणि एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here